Submitted by जो_एस on 29 February, 2008 - 05:51
निराशेत वाटलीच कधी छोटीशी आशा
कुणीतरी बोललं चुकून कधी गोड भाषा
गाठता आले चुकून मना जोगते ध्येय
चुकून दिले कोणी कसले अचानक श्रेय
रस्त्या वरच्या गर्दीतूनही मिळे सहज वाट
मावळतीला मना भासे जशी रम्य पहाट
क्वचित घडते चुकून, असे विपरीत काही
क्वचित मिळतो गारवा, बाकी लाही लाही
अंधारात काजवेही जसे तेजस्वी भासतात
असे क्षण आमच्यासाठी बोनसच असतात
कोण जाणे कुठे कसे असतील बोनस लपले
साधण्यासाठी आपणच तर पाहिजे दक्ष असले
सुधीर
गुलमोहर:
शेअर करा
या..
गाठता आले चुकून मना जोगते ध्येय
चुकून दिले कोणी कसले अचानक श्रेय
रस्त्या वरच्या गर्दीतूनही मिळे सहज वाट
मावळतीला मना भासे जशी रम्य पहाट
या द्विपदी आवडल्या
धन्यवाद
श्यामली
अभिप्रायाबद्दल
धन्यवाद
सुधीर