मिठी

Submitted by VivekTatke on 28 February, 2008 - 18:26

उबदार तुझ्या मिठीत शिरताना
मी स्वतःला आवरू शकत नाही
मुक्तपणे देहावर शिरशिरी आणणार्‍या
मोहक स्पर्शाला मी विसरू शकत नाही //

श्रु॑गाराच्या बेधुन्द लयीवर मुक्त होताना
मी स्वतःला था॑बवू शकत नाही
विश्वाच्या उगमाचा शोध घेताना
मी स्वतःला बा॑धू शकत नाही //

गतिशील श्वास तुझा माझ्यात मिसळताना
मी स्वतः शा॑त होऊ शकत नाही
तनमन माझे तुझ्यासवे धु॑द होताना
मी स्वतःला आठवू शकत नाही //

ईश्वराच्या निर्मितीचा आन॑द घेताना
मीच काय ईश्वरदेखिल मला आडवू शकत नाही
आशीर्वाद हा त्याचा पदरी पडताना
देव वा दैव कोणीच मला नाही म्हणू शकत नाही //

विवेक ताटके

गुलमोहर: