परवाचीच गोष्ट. माझ्या बायकोच्या डोक्यात चित्रकलेचे खुळ घुसलं. तशी अनेक वेळा अनेक खुळं तिच्या डोक्यात वेगानं घुसतात आणि तितक्याच वेगानं ती काही दिवसांनी बाहेर पडतात. तिच्या २ खुळांच्या मधे माझा मात्र खुळखुळा होतो.
तर यावेळचं खुळ होत चित्रकला. तरातरा दुकानात जाऊन काय काय हत्यारं घेऊन आली. त्यानंतर ते फयान २ दिवस गायब झालं. २ दिवसानंतर खोलीत गेलो. वाटल रस्ता चुकलो की काय. आकाश पाताळ एक झालं होतं खोलीत. मी म्हणालो "काय ग हे?" तर एक कुत्सीत कटाक्ष टाकून मला म्हणाली "तुला नाही कळायचं". पण एवढ्यावर ती थांबली नाही. नंतर मला एक motivational speech पण दिलं. "काय छान relax वाटत चित्र काढून. दिवसभराचा शीणवटा, टेंशन्स, डिप्रेशन कुठ्ल्या कुठे पळून जातं. तू पण ट्राय कर एकदा".
बायको शिव्या देत नाहीये, घालून पाडून बोलत नाहीये हे बघून माझं मोटिव्हेशन "UP" होतच होतं. तेवढ्यात म्हणाली "तसाही नुसताच बसलेला असतोस रिकाम्या बैलासारखा. " ह्या वाक्यानी मात्र तेल टाकण्याचे काम केले...पुढचा अग्नि मात्र माझा मीच दिला ...चित्र काढायला पेन्सिल हातात घेतली ...आणि .....
...आणि .....मला ते आणीबाणीचे दिवस आठवले........
=============================================
१५ वर्षापूर्वीचे ते दिवस ....शाळेत पाचवीपासून चित्रकला हा विषय होता (माझ्या साठी पाचवीला पुजलेला). तशी मला लहानपणापासून कल्पना होतिच आणि शाळेत आल्यावर तर खात्री पटली की चित्रकला हा काही आपला प्रांत नाही. त्यामुळे चित्रकलेच्या तासाला मी आणि माझे ३-४ चित्रकार मित्र मागच्या बाकड्यावर बसून शांतपणे टिवल्या बावल्या करायचो. इथ पर्यंत सगळं काही ठिक चाललं होतं. पण एका दिवशी आमच्या कर्तुत्वाला जरा जास्तीच उधाण आलं आणि एरवी पहिल्या ५ रांगांनाच शिकवणार्या कुलकर्णी मास्तरांच्या टप्प्यात मी आलो.
मास्तर : हसबनीस, उभे राहा
आमच्या वर्गात खरं तर मी एकटाच हसबनीस. त्यात शेवटच्या बाकड्यावर बसलो होतो. पण मास्तरांनी अचानक नाव घेतल्याने इतका गोंधळलो की मास्तरांनी कुठल्यातरी वेगळ्याच "हसबनीस" ला उठवले आहे अशा आविर्भावात मी इकडे तिकडे दोनदा आणि मागे तिनदा पाहिले. (तिनही वेळेस मागे भिंतच)
मास्तर : हां तुम्हिच हसबनीस -- तुम्हिच... उठा. उभे राहा. मागे काय बघताय. तुम्हाला काय वाटले अजून एक हसबनीस ज्ञानेश्वरांसारखे - तुमच्या मागची भिंत चालवत वर्गात आलेत काय!
मी आपला स्लो मोशन मधे उठून उभा राहिलो. मला कळाले की आता आपलेच कर्तुत्व आपल्याच वक्तृत्वा द्वारे सांगायची वेळ आली आहे.
मास्तर : हसबनीस, एका पाळीव प्राण्याचे नाव सांगा.
बँग! बाउन्सर! यॉर्कर! गुगली... आणि परिणाम म्हणून मी क्लीन बोल्ड!
मला वाटले होते की विचारतील 'काय चालले आहे', 'लक्ष का नाहीये' वगैरे वगैरे ...
आधीच ज्ञानेश्वर, ती भिंत आणि त्यात हा प्रश्न ...मी पुरता गोंधळून गेलो .... आणि काही विचार करायच्या आधी माझ्या तोंडातून उत्तर बाहेर पडले "हत्ती"
मास्तरांनी एक फुत्कार टाकला आणि पोरांनी चीत्कार..
मी आणखीनच भांबावलो. काय झालं होतं ...काय चाललं होतं - काहीच कळत नव्हतं.
तिकडे मास्तर माझ्या उत्तरामुळे तेलात पडलेल्या पाण्याच्या थेंबासारखे तडतडत होते.
खाऊ की गिळू अशा नजरेन ते मास्तर रूपी वादळ रांगांमधून माझ्याकडे घोंघावलं. आमच्या बाकापाशी थडकताच त्यांनी माझे कान धरून ओढायला सुरवात केली. मला वाटलं बहूतेक आता माझे कान हत्तीसारखे 'सुप्पाSSएवढे' करून मगच सोडणार हे. पण काही वेळाने मास्तरांनाही कंटाळा आला माझ्या कानांना लोंबकाळायचा. उरलेला तास त्यांनी मला आधी शारिरीक आणि मग शाब्दिक मार देण्यात घालवला. तो तास एकदाचा संपला आणि मला हुश्श झालं. मास्तर जाताना एक कटाक्ष टाकून गेले. त्यांच्या नजरेत मला "यह तो सिर्फ शुरवात है. अब आगे आगे देखो होता है क्या" असा काहीसा भाव जाणवला.
पुढचे अनेक दिवस मास्तर त्यांच्या नजरेतल्या भावाला जागले. त्या वर्षी आमच्या शाळेतल्या येड्या पोरी भोंडला खेळणार होत्या. वर्गातल्या देशपांडीणीनं भला मोठा पाट आणला होता. कुलकर्णी मास्तरांनी त्यावर हत्तीचं एक मोठ चित्र काढलं आणि खाली लिहिलं हसबनीसांच्या बागेतला हत्ती. मुलींचा भोंडला आणि आमच्या नावाचा तो शिमगा त्या वर्षी चांगलाच गाजला. त्या दिवसापासून शाळेतल्या सगळ्या पोरी समोरून आल्या की फिस्स्सकन हसायच्या आणि पोरं जातायेता हात हत्तीच्या सोंडेसारखी करून सॅल्युट ठोकायची.
असंच एकदा चित्रकलेच्या तासाला मास्तरांनी सांगितले सूर्योदयाचा देखावा काढा. आपल्याला काय ...मी माझ्या परीने चार डोंगर, त्यातून डोकावणारा सूर्य (किरणांसहित), कागदाच्या उजव्या बाजुकडून डाव्या बाजूकडे खाली जाणारी नदी, त्यात चार मासे, आकाशात सुमारे अकरा कावळे, एक नारळाचं झाड, त्याखाली गुराखी आणि चार-पाच म्हशी असे काहीतरी काढले. मास्तरांचा माझ्यावर आणि माझ्या चित्रावर डोळा होताच. माझं चित्र झालं आहे हे बघताच ते डायसेक्शन साठी टेबलावर आणले गेले.
मास्तर : हसबनीस, हे उलट कारंज काय आहे?
मी: सर ते नारळाचं झाड ....तुम्ही चित्र उलट धरलय.
इकडे पोरांना कळलं की 'शो सुरू झाला' आणि ती सरसावून बसली.
मास्तर : अरे व्वा. तुमच्या चित्राला बाजू पण असते तर. मला वाटले 'अॅबस्ट्रॅक्ट' चित्र आहे, कसेही बघा.
मी: नाही म्हणजे ते जरा....
मास्तर : हे रंगीबेरंगी काय आहे?
मी: तो "सूर्य" सर ....
मास्तर : सूर्य ?? रंगीबेरंगी ?????
पुन्हा एकदा फुत्कारांची आणि चित्कारांची देवाणघेवाण झाली....
त्याच काय होत सांगू का तुम्हाला? चित्रकलेच्या तासाला माझं तोंड आणि माझे हात यावर माझा कंट्रोलच रहात नाही हो. चित्र काढले तेव्हा सूर्य बरोबर होता. पण रंगवताना डोंगराचा हिरवा रंग त्यात गेला. अकरा कावळे काढताना ४-५ कावळे त्या सूर्यावर बसले. त्यात नेमके त्या दिवशी आकाश पण निरभ्र होते - त्यामुळे निळा रंगही. नदीचा उगमही नेमका पूर्वेकडे होत होता - आता तुम्हीच सांगा, हा काय माझा दोष होता का!
कृष्णानं 'अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ' म्हटल्यावर जयद्रथाचा चेहरा जसा झालेला ना, तसा झाला हो माझा चेहरा (तो रंगपंचमीच्या बनियनसारखा दिसणारा माझाच सूर्य पाहून!) मास्तरांच्या चेहर्यावर अर्थातच अर्जुनासारखा विजयोन्माद!
असा हा उद्धार उत्तरोत्तर वाढतच गेला. दर तासाला माझी चित्रं फळ्यावर लटकायची आणि शाळेच्या कानाकोपर्यात पोहचायची. मास्तर एकदा उपहासाने म्हणालेही "हसबनीस,'चित्रकार' म्हणून मोठ्ठी किर्ती मिळवाल!." यावर वर्गातल्या पोरांनी मला "लिओनार्दो ची चंपी" असं नाव ठेवलं होतं. दर तासाला मी चित्रं काढत गेलो, मास्तर बोलत गेले, पोरं हसत गेली आणि मी एक एक पदवी पादाक्रांत करत गेलो.
=============================================
ते दिवस आठवले आणि छातीत एक जोरात कळ आली. बायकोने डॉक्टरना बोलावले. डॉक्टर म्हणाले काही नाही जरा BP high झाले आहे. मी म्हणालो किती आहे तर म्हणाले "१२०-३००". असे म्हणून वर स्वतः च्याच जोकवर घोड्यासारखे खिंकाळले.
असा राग आला होता...वाटलं की चित्रच काढावं यांचं. पण मग परत छातीत कळ आली....
त्यानंतर परत साधी पेन्सिल दिसली तरी जीव दडपतो...
----------------------------------------------------------------------------
आज बायकोच्या डोक्यात गाण्याचं खूळ घुसलयं...
बापरे!! भागवत सर!!!.. मला ज्ञानेश्वरांचा रेडा म्हणालेले..
आ.. आ... आई ग! छातीत कळ येतीये!
८ वी त चित्रकलेच्या तसाला
८ वी त चित्रकलेच्या तसाला आम्हाला वर्गामधे बस स्थानकाचे चित्र काढायला सांगितले होते. मला चित्र काढायचा भारी कंटाळा आला होता, मी एक नावापुरती छोटिशि खोलि काढली व त्यावर कुठ्ल्यातरि गावचे नाव टाकुन बस स्थानक असे लिहिले व ३-४ मानवसदॄश आकृत्या काढल्या व त्या चित्राची रंगरंगोटि केलि तोपर्यंत ईतर मुलं स्केचच काढत बसली होति मोठे बस स्टॅंड २-३ बस वगैरे. आमचे चित्रकलेचे शिक्षक जरा खडुसच होते ते मुद्दम माझ्याजवळ आले व माझे चित्र बारकाईने पाहु लागले थोड्या वेळाने मला म्हणाले का रे झालं तुझं. मी होकारार्थी मान हलवली. मग थोडा वेळ विचार करुन ज्या ईमारतीला मि बस स्थानकाचे नाव दिले होते त्यावर बोट ठेउन म्हणाले हे काय?
मी: सर ते बस स्थानक्...........खेड्याकडचे( हे अर्थातच घाबरत घाबरत)
त्यानंतर बर्याच वेळाने ( आमचे गुरुजी वाजपेयींचे पंखे असावेत बहुतेक ) का रे बस कुठे आहे.
मी: सर ते लोक बसची वाट पाहत आहेत.
ह्या उत्तरानंतर सरांनी खाउ का गिळू या नजरेनी मला पाहिले व शक्य तेवढे वेडेवाकडे तोंड करुन निघुन गेले.
तास संपल्यानंतर मी व माझा मित्र बराच वेळ हसत होतो.
धमाल आहे...
धमाल आहे...
(No subject)
सही आहे
सही आहे
अरे इतके दिवस वाचायचे राहूनच
अरे इतके दिवस वाचायचे राहूनच गेले होते. अफलातून आहे.
अमित तू त्या 'राज पिछले जनम का' कार्यक्रमात हजेरी लाउन ये. मला खात्री आहे की तू कोण्या एका जन्मात लिओनार्दो विन्ची असणार. पण त्या जन्मात येशूचे रहस्य फोडल्याबद्दल तुला त्याने शाप दिला असणार - कलियुगात या पृथ्वीतलावर जन्माला येण्याचा. म्हणूनच या जन्मातही तुझ्याकडून इतक्या महान कलाकृती घडल्या. काही दिवसातच मोनालिसासारखेच तुझे हत्ती हे चित्र जगद्विख्यात होणार यात दुमत असण्याचे कारण नाही. मोनालिसाच्या बाबतीत जसे लोकांना बुच्कळ्यात पडायला होते की बाई रडताहेत की हसताहेत तसेच 'हत्ती'च्या बाबतही घडेल - लोकांना प्रश्ण पडेल की हा त्याचा दात आहे की तोंडात अडकलेली मॅगी नूडल.
रच्याकने तू तुझ्या टोपण नावाचे श्रेय कुलकर्णी सरांना देतोस की भागवत सरांना? त्यांनी तुझ्या कलाकृती वापरून इतरांना हसायला शिकवले. पण जे कोणी असेल ते दृष्टे होते. बाळाचे पाय पाळण्यात पाहून हे बाळ लोकांकडून 'हशा' वसूल करणारच हे ओळखून त्यांनी तुला अगदी योग्य टोपणनाव बहाल केले.
राजा, माणसाने इतके विनयशील असू नये - इतके सुंदर लिहिलेस आणि म्हणतोस 'बाकी मी एवढा लेखन, कवितेतला नाही'? आता पुन्हा कधी हसायला येउ तेवढे सांग आणि ज्या व्यक्तीने मला हे वाचायला सांगितले तिला धन्यवाद दे माझे. नाही तर माझे वाचायचे राहून गेले असते.
>>"लिओनार्दो ची चंपी>> लेख
>>"लिओनार्दो ची चंपी>>:खोखो:
लेख एकदम खुसखुशीत !
मस्त लिहिलय
खुप छान लिहिलय बारीशकर
खुप छान लिहिलय बारीशकर ...असेच बरसत रहा....
शिरीषने जर लिंक पाठवली नसती तर सुटल असत वाचायच...
!! छान ! मस्तच लिहिलय !
(No subject)
"लिओनार्दो ची चंपी"
"लिओनार्दो ची चंपी"
(No subject)
लय खास बारिशकर
लय खास बारिशकर
चित्रकार बारिशकर लई भारी.
चित्रकार बारिशकर लई भारी.
मस्तं लिहीलयं... <<<<<<<तो
मस्तं लिहीलयं...
<<<<<<<तो रंगपंचमीच्या बनियनसारखा दिसणारा माझाच सूर्य पाहून!) मास्तरांच्या चेहर्यावर अर्थातच अर्जुनासारखा विजयोन्माद!
एकदम मस्त...
वा ! छान .पु.ले.शु.
वा ! छान .पु.ले.शु.
जबरी काही काही पंचलाईन्स
जबरी
काही काही पंचलाईन्स फारच मस्तयत
आवडलं
छान आवडल.
छान आवडल.
zakkas
zakkas
लय भारी...
लय भारी...
जाम आवडल्...धन्यवाद मला हे
जाम आवडल्...धन्यवाद मला हे लिखान पाठवल
(No subject)
मजा आली.. लै भारी.... आता
मजा आली..
लै भारी.... आता गाण्याचे खुळ...
सही यार. हसून हसून पोट
सही यार. हसून हसून पोट दुखले...
धमाल लिहीलय अगदी :हहपुवा:
धमाल लिहीलय
अगदी :हहपुवा:
भन्नाट भन्नाट !!!!!! जाम हसलो
भन्नाट भन्नाट !!!!!! जाम हसलो
मस्त .....बारिशकर, एकदम
मस्त .....बारिशकर, एकदम धमाल
>>>>तिच्या २ खुळांच्या मधे माझा मात्र खुळखुळा होतो.>>>>
रापचीक....मजा आली.
रापचीक....मजा आली.
ऑफिसात वाचायला नको होतं....
ऑफिसात वाचायला नको होतं.... जाम हसले. खरच सॉल्लिड लिहिलय. त्या संगीतावरचं (किंवा काहीही) लिहायचं मनावर घ्याच, बारिशकर. एकदम सवाई लिहिताय.
खरचं ऑफिसात वाचायला नको
खरचं ऑफिसात वाचायला नको होतं
Pages