परवाचीच गोष्ट. माझ्या बायकोच्या डोक्यात चित्रकलेचे खुळ घुसलं. तशी अनेक वेळा अनेक खुळं तिच्या डोक्यात वेगानं घुसतात आणि तितक्याच वेगानं ती काही दिवसांनी बाहेर पडतात. तिच्या २ खुळांच्या मधे माझा मात्र खुळखुळा होतो.
तर यावेळचं खुळ होत चित्रकला. तरातरा दुकानात जाऊन काय काय हत्यारं घेऊन आली. त्यानंतर ते फयान २ दिवस गायब झालं. २ दिवसानंतर खोलीत गेलो. वाटल रस्ता चुकलो की काय. आकाश पाताळ एक झालं होतं खोलीत. मी म्हणालो "काय ग हे?" तर एक कुत्सीत कटाक्ष टाकून मला म्हणाली "तुला नाही कळायचं". पण एवढ्यावर ती थांबली नाही. नंतर मला एक motivational speech पण दिलं. "काय छान relax वाटत चित्र काढून. दिवसभराचा शीणवटा, टेंशन्स, डिप्रेशन कुठ्ल्या कुठे पळून जातं. तू पण ट्राय कर एकदा".
बायको शिव्या देत नाहीये, घालून पाडून बोलत नाहीये हे बघून माझं मोटिव्हेशन "UP" होतच होतं. तेवढ्यात म्हणाली "तसाही नुसताच बसलेला असतोस रिकाम्या बैलासारखा. " ह्या वाक्यानी मात्र तेल टाकण्याचे काम केले...पुढचा अग्नि मात्र माझा मीच दिला ...चित्र काढायला पेन्सिल हातात घेतली ...आणि .....
...आणि .....मला ते आणीबाणीचे दिवस आठवले........
=============================================
१५ वर्षापूर्वीचे ते दिवस ....शाळेत पाचवीपासून चित्रकला हा विषय होता (माझ्या साठी पाचवीला पुजलेला). तशी मला लहानपणापासून कल्पना होतिच आणि शाळेत आल्यावर तर खात्री पटली की चित्रकला हा काही आपला प्रांत नाही. त्यामुळे चित्रकलेच्या तासाला मी आणि माझे ३-४ चित्रकार मित्र मागच्या बाकड्यावर बसून शांतपणे टिवल्या बावल्या करायचो. इथ पर्यंत सगळं काही ठिक चाललं होतं. पण एका दिवशी आमच्या कर्तुत्वाला जरा जास्तीच उधाण आलं आणि एरवी पहिल्या ५ रांगांनाच शिकवणार्या कुलकर्णी मास्तरांच्या टप्प्यात मी आलो.
मास्तर : हसबनीस, उभे राहा
आमच्या वर्गात खरं तर मी एकटाच हसबनीस. त्यात शेवटच्या बाकड्यावर बसलो होतो. पण मास्तरांनी अचानक नाव घेतल्याने इतका गोंधळलो की मास्तरांनी कुठल्यातरी वेगळ्याच "हसबनीस" ला उठवले आहे अशा आविर्भावात मी इकडे तिकडे दोनदा आणि मागे तिनदा पाहिले. (तिनही वेळेस मागे भिंतच)
मास्तर : हां तुम्हिच हसबनीस -- तुम्हिच... उठा. उभे राहा. मागे काय बघताय. तुम्हाला काय वाटले अजून एक हसबनीस ज्ञानेश्वरांसारखे - तुमच्या मागची भिंत चालवत वर्गात आलेत काय!
मी आपला स्लो मोशन मधे उठून उभा राहिलो. मला कळाले की आता आपलेच कर्तुत्व आपल्याच वक्तृत्वा द्वारे सांगायची वेळ आली आहे.
मास्तर : हसबनीस, एका पाळीव प्राण्याचे नाव सांगा.
बँग! बाउन्सर! यॉर्कर! गुगली... आणि परिणाम म्हणून मी क्लीन बोल्ड!
मला वाटले होते की विचारतील 'काय चालले आहे', 'लक्ष का नाहीये' वगैरे वगैरे ...
आधीच ज्ञानेश्वर, ती भिंत आणि त्यात हा प्रश्न ...मी पुरता गोंधळून गेलो .... आणि काही विचार करायच्या आधी माझ्या तोंडातून उत्तर बाहेर पडले "हत्ती"
मास्तरांनी एक फुत्कार टाकला आणि पोरांनी चीत्कार..
मी आणखीनच भांबावलो. काय झालं होतं ...काय चाललं होतं - काहीच कळत नव्हतं.
तिकडे मास्तर माझ्या उत्तरामुळे तेलात पडलेल्या पाण्याच्या थेंबासारखे तडतडत होते.
खाऊ की गिळू अशा नजरेन ते मास्तर रूपी वादळ रांगांमधून माझ्याकडे घोंघावलं. आमच्या बाकापाशी थडकताच त्यांनी माझे कान धरून ओढायला सुरवात केली. मला वाटलं बहूतेक आता माझे कान हत्तीसारखे 'सुप्पाSSएवढे' करून मगच सोडणार हे. पण काही वेळाने मास्तरांनाही कंटाळा आला माझ्या कानांना लोंबकाळायचा. उरलेला तास त्यांनी मला आधी शारिरीक आणि मग शाब्दिक मार देण्यात घालवला. तो तास एकदाचा संपला आणि मला हुश्श झालं. मास्तर जाताना एक कटाक्ष टाकून गेले. त्यांच्या नजरेत मला "यह तो सिर्फ शुरवात है. अब आगे आगे देखो होता है क्या" असा काहीसा भाव जाणवला.
पुढचे अनेक दिवस मास्तर त्यांच्या नजरेतल्या भावाला जागले. त्या वर्षी आमच्या शाळेतल्या येड्या पोरी भोंडला खेळणार होत्या. वर्गातल्या देशपांडीणीनं भला मोठा पाट आणला होता. कुलकर्णी मास्तरांनी त्यावर हत्तीचं एक मोठ चित्र काढलं आणि खाली लिहिलं हसबनीसांच्या बागेतला हत्ती. मुलींचा भोंडला आणि आमच्या नावाचा तो शिमगा त्या वर्षी चांगलाच गाजला. त्या दिवसापासून शाळेतल्या सगळ्या पोरी समोरून आल्या की फिस्स्सकन हसायच्या आणि पोरं जातायेता हात हत्तीच्या सोंडेसारखी करून सॅल्युट ठोकायची.
असंच एकदा चित्रकलेच्या तासाला मास्तरांनी सांगितले सूर्योदयाचा देखावा काढा. आपल्याला काय ...मी माझ्या परीने चार डोंगर, त्यातून डोकावणारा सूर्य (किरणांसहित), कागदाच्या उजव्या बाजुकडून डाव्या बाजूकडे खाली जाणारी नदी, त्यात चार मासे, आकाशात सुमारे अकरा कावळे, एक नारळाचं झाड, त्याखाली गुराखी आणि चार-पाच म्हशी असे काहीतरी काढले. मास्तरांचा माझ्यावर आणि माझ्या चित्रावर डोळा होताच. माझं चित्र झालं आहे हे बघताच ते डायसेक्शन साठी टेबलावर आणले गेले.
मास्तर : हसबनीस, हे उलट कारंज काय आहे?
मी: सर ते नारळाचं झाड ....तुम्ही चित्र उलट धरलय.
इकडे पोरांना कळलं की 'शो सुरू झाला' आणि ती सरसावून बसली.
मास्तर : अरे व्वा. तुमच्या चित्राला बाजू पण असते तर. मला वाटले 'अॅबस्ट्रॅक्ट' चित्र आहे, कसेही बघा.
मी: नाही म्हणजे ते जरा....
मास्तर : हे रंगीबेरंगी काय आहे?
मी: तो "सूर्य" सर ....
मास्तर : सूर्य ?? रंगीबेरंगी ?????
पुन्हा एकदा फुत्कारांची आणि चित्कारांची देवाणघेवाण झाली....
त्याच काय होत सांगू का तुम्हाला? चित्रकलेच्या तासाला माझं तोंड आणि माझे हात यावर माझा कंट्रोलच रहात नाही हो. चित्र काढले तेव्हा सूर्य बरोबर होता. पण रंगवताना डोंगराचा हिरवा रंग त्यात गेला. अकरा कावळे काढताना ४-५ कावळे त्या सूर्यावर बसले. त्यात नेमके त्या दिवशी आकाश पण निरभ्र होते - त्यामुळे निळा रंगही. नदीचा उगमही नेमका पूर्वेकडे होत होता - आता तुम्हीच सांगा, हा काय माझा दोष होता का!
कृष्णानं 'अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ' म्हटल्यावर जयद्रथाचा चेहरा जसा झालेला ना, तसा झाला हो माझा चेहरा (तो रंगपंचमीच्या बनियनसारखा दिसणारा माझाच सूर्य पाहून!) मास्तरांच्या चेहर्यावर अर्थातच अर्जुनासारखा विजयोन्माद!
असा हा उद्धार उत्तरोत्तर वाढतच गेला. दर तासाला माझी चित्रं फळ्यावर लटकायची आणि शाळेच्या कानाकोपर्यात पोहचायची. मास्तर एकदा उपहासाने म्हणालेही "हसबनीस,'चित्रकार' म्हणून मोठ्ठी किर्ती मिळवाल!." यावर वर्गातल्या पोरांनी मला "लिओनार्दो ची चंपी" असं नाव ठेवलं होतं. दर तासाला मी चित्रं काढत गेलो, मास्तर बोलत गेले, पोरं हसत गेली आणि मी एक एक पदवी पादाक्रांत करत गेलो.
=============================================
ते दिवस आठवले आणि छातीत एक जोरात कळ आली. बायकोने डॉक्टरना बोलावले. डॉक्टर म्हणाले काही नाही जरा BP high झाले आहे. मी म्हणालो किती आहे तर म्हणाले "१२०-३००". असे म्हणून वर स्वतः च्याच जोकवर घोड्यासारखे खिंकाळले.
असा राग आला होता...वाटलं की चित्रच काढावं यांचं. पण मग परत छातीत कळ आली....
त्यानंतर परत साधी पेन्सिल दिसली तरी जीव दडपतो...
----------------------------------------------------------------------------
आज बायकोच्या डोक्यात गाण्याचं खूळ घुसलयं...
बापरे!! भागवत सर!!!.. मला ज्ञानेश्वरांचा रेडा म्हणालेले..
आ.. आ... आई ग! छातीत कळ येतीये!
ह. ह. पु. वा!
ह. ह. पु. वा!
ह. ह. पु. वा!
ह. ह. पु. वा!
बारिश्कर उर्फ हसबनीस ,
बारिश्कर उर्फ हसबनीस , जबरदस्त लिहिलयं
मायबोलीला अजुन एक विनोदी लेखक मिळाला , असचं लिहीत रहा , पु.ले.शु.
(No subject)
हत्ती
हत्ती
"लिओनार्दो ची चंपी"
"लिओनार्दो ची चंपी"
चित्रकलेच मनाला लावून घेऊ नका. लेखन सुरेख करताय.
सॉलिड लिहिलंय. जाम
माझा आणि चित्रकलेचाही छत्तीसचा आकडा आहे. चित्रकलेच्या तासाच्या आदल्या दिवशी मी आईला पिडायचे चित्र काढून दे म्हणून. एकदा असाच पिंजर्यातला वाघ काढून घेतला आईकडून. मार्क देताना सर म्हणाले ,"आईच्या वाघाला सात मार्क." मग वर्गभर असेच चीत्कार, कारंजी वगैरे काय काय
,"आईच्या वाघाला सात मार्क."
,"आईच्या वाघाला सात मार्क." अगो _/\_
कोन गांव पावनं? मायंदाळ लिवलय
कोन गांव पावनं? मायंदाळ लिवलय वो. माय्बोली आत्ता विनोदाने बहरणार. खुप मस्त!!!!
मजा आलि. पुलेशु.आता गाण्याचे येउदेत.
अश्विनी, अगदी-अगदी! माझ्या
अश्विनी, अगदी-अगदी!
माझ्या दहावीच्या चित्रकला सबमिशनच्या वेळेस माझी आई, बाबा, मी, २ मैत्रिणी आणि एक मित्र, सगळे जण हॉल मध्ये बसलेलो. ड्रॉईंगबूक फाडलं आणि प्रत्येकानं दोन दोन चित्र काढून/रंगवून वही पूर्ण केली. पुन्हा चिकटवली..
बारिशकर, आम्ही बी, आम्ही बी!
सन्गीताच्या तासावर अजुन एक
सन्गीताच्या तासावर अजुन एक लेख येउ द्या...
ढासु रे..... जाम जाम हसलो...
ढासु रे.....
जाम जाम हसलो... थांबु नकोस.... लिहित रहा....
आपल्यातच इतकं काही सापडत जातं की.........................
जे मिळेल वाटत रहा....
लय भारी... लोकं सुटलीयेत
लय भारी...
लोकं सुटलीयेत नुसती..
अजुन येउदेत..
बारीशकर.. धम्माल... अजुनहि
बारीशकर..
धम्माल... अजुनहि (न)जमलेल्या कलांवर लिहा.
हा हा हा. आम्हाला शाळेत असतान
हा हा हा.
आम्हाला शाळेत असतान सरडा काढायला सांगितला होता. मी काढुन सरांना दाखवला. सरांनी मला पुढे बोलावुन माझं चित्र सगळ्या वर्गाला दाखवलं. माझी छाती पावणे सव्वा ईंच फुगली. पण फुग्याला टाचणी लागली जेव्हा सर म्हणाले, "गाढवा, सरड्याला कान असतात का रे?"
(No subject)
मस्त.... गान्याची गोष्ट सांगा
मस्त.... गान्याची गोष्ट सांगा आता
मस्तच..
मस्तच..
मस्त रे...
मस्त रे...
आमीबी चित्रकलेच्याच मास्तरचा
आमीबी चित्रकलेच्याच मास्तरचा नेमी मार खात व्हतो.
लेख फर्मास हाय.
(No subject)
(No subject)
लिओनार्दो- लै लै भारी.
लिओनार्दो- लै लै भारी.
(No subject)
मज्ज आली
मज्ज आली
मज्जा आली
मज्जा आली
मस्तच , अजून येउ देत्...
मस्तच , अजून येउ देत्...:हाहा:
हसबनिसान्च्या बागेतला
हसबनिसान्च्या बागेतला हत्ती.....
जबरी
जबरी
<<हसबनिसान्च्या बागेतला
<<हसबनिसान्च्या बागेतला हत्ती..... >> मजा आली
Pages