Submitted by niraj_kulkarni on 26 February, 2008 - 23:28
मधाळसा हसेन मी... ( गझल )
तुझ्याच आठवांतला, खुमार हा जगेन मी...
उदास पापण्यांतुनी, मधाळसा हसेन मी...
भुलावणे तुला सखे, मला न शक्य व्हायचे;
तुझा सुगंध लाघवी, मनामधे जपेन मी...
निरोप घेतला जरी, करू नकोस काळजी;
तुझ्याच आरशामधे, तुलाच आढळेन मी...
जसा तुझ्यात गुंतलो, पुन्हा तसे न गुंतणे;
असा ठराव मांडला, अखंड राबवेन मी...
नको मनास चंद्रमा, नकोत चांदण्या मला;
तमोमयी नभात या, असाच बागडेन मी...
स्वतःस भासतो अता, उगाच मी अनोळखी;
कधी मलाच पाहुनी, सलाम ही करेन मी...
कशास लावला लळा? नकोस सावरू मला!
मलूल लोचनांतुनी, हळूच पाघळेन मी...
कठोर घाव घालणे, स्वभाव जाहला तुझा!
उरात घालता सुरा, सुखासुखी मरेन मी...
'कलिंदनंदिनी' सखे, मनास वृत्त भावले;
'लगा लगा' च चारदा, गझल अशी रचेन मी...
- निरज कुलकर्णी.
वृत्त - कलिंदनंदिनी
गण - लगालगा लगालगा लगालगा लगालगा
मात्रा - २४
गुलमोहर:
शेअर करा
व्याकरण गजल
तुमच्या गजलचा आल्बम काढा.
मधाळसा
मधाळसा हसेन.. व्वा!
ठराव राबवणे.. मस्त कल्पना आहे.
कलिंदनंदिनी छान समजावलात.
मेघा
मधाळसा.. वा..
खूप छान आहे हा शब्द. त्या एका शब्दावर मी लुब्ध झालो.
सुंदर
वा.. क्या बात है.. बहोत खुब..
- अनिलभाई
सुंदर....
निरोप घेतला जरी, करू नकोस काळजी;
तुझ्याच आरशामधे, तुलाच आढळेन मी...
जसा तुझ्यात गुंतलो, पुन्हा तसे न गुंतणे;
असा ठराव मांडला, अखंड राबवेन मी...
वाचून तबियत खुश झाली...
मस्त
जसा तुझ्यात गुंतलो, पुन्हा तसे न गुंतणे;
असा ठराव मांडला, अखंड राबवेन मी...
नको मनास चंद्रमा, नकोत चांदण्या मला;
तमोमयी नभात या, असाच बागडेन मी...
स्वतःस भासतो अता, उगाच मी अनोळखी;
कधी मलाच पाहुनी, सलाम ही करेन मी...
हे शेर छानच!
क्या बात है!
कठोर घाव घालणे, स्वभाव जाहला तुझा!
उरात घालता सुरा, सुखासुखी मरेन मी...
'कलिंदनंदिनी' सखे, मनास वृत्त भावले;
'लगा लगा' च चारदा, गझल अशी रचेन मी...
सहीसहीच!
निरोप
निरोप घेतला जरी, करू नकोस काळजी;
तुझ्याच आरशामधे, तुलाच आढळेन मी...
>> लाजवाब.. मस्त आहेत या ओळी
व्वा! प्रत्येक द्वीपदी
व्वा!
प्रत्येक द्वीपदी आवडली.
आवडत्या दहामध्ये नोंद केली आहे.
शरद
जसा तुझ्यात गुंतलो, पुन्हा
जसा तुझ्यात गुंतलो, पुन्हा तसे न गुंतणे;
असा ठराव मांडला, अखंड राबवेन मी...
स्वतःस भासतो अता, उगाच मी अनोळखी;
कधी मलाच पाहुनी, सलाम ही करेन मी...
>>>> मस्तच.. गझल एकदम सहज आली आहे.. मस्त लय आहे
मस्त! आवडली.
मस्त! आवडली.
फारच सुंदर गझल..!!
फारच सुंदर गझल..!!
निरज भाई, <<कशास लावला लळा?
निरज भाई,
<<कशास लावला लळा? नकोस सावरू मला!
मलूल लोचनांतुनी, हळूच पाघळेन मी...>>
खुप आवडली आपली गझल!!!
आईशप्पथ !! काय सहजता आहे रे
आईशप्पथ !!
काय सहजता आहे रे सर्वच्या सर्व शेरांमधे !! ऑर्कूटवर याआघी कुठेतरी वाचली होती आणि तेव्हांच तुझे नांव ऐकले होते.
मधाळसा हसेन मी
काय लाईन आहे...पोरी मरत असतील लेका तुझ्यावर !!
निरोप घेतला जरी, करू नकोस
निरोप घेतला जरी, करू नकोस काळजी;
तुझ्याच आरशामधे, तुलाच आढळेन मी...
स्वतःस भासतो अता, उगाच मी अनोळखी;
कधी मलाच पाहुनी, सलाम ही करेन मी...
छान.
व्वा ...क्या बात है...अप्रतीम
व्वा ...क्या बात है...अप्रतीम !!!!
निरकुल.. बढिया गझल.. जसा
निरकुल.. बढिया गझल..:)
जसा तुझ्यात गुंतलो, पुन्हा तसे न गुंतणे;
असा ठराव मांडला, अखंड राबवेन मी...
स्वतःस भासतो अता, उगाच मी अनोळखी;
कधी मलाच पाहुनी, सलाम ही करेन मी...
जास्त आवडले..:)
बहोत खूब
बहोत खूब
नको मनास चंद्रमा, नकोत
नको मनास चंद्रमा, नकोत चांदण्या मला;
तमोमयी नभात या, असाच बागडेन मी...
अगदी आवडले.
छान आहे गझल
निरोप घेतला जरी, करू नकोस
निरोप घेतला जरी, करू नकोस काळजी;
तुझ्याच आरशामधे, तुलाच आढळेन मी...
जसा तुझ्यात गुंतलो, पुन्हा तसे न गुंतणे;
असा ठराव मांडला, अखंड राबवेन मी...
>>> वाह क्या बात है....
क्या बात है कुलकर्णी साहेब
क्या बात है कुलकर्णी साहेब !!!
अप्रतिम ....
व्वा! छान! हल्ली कविता प्रांत
व्वा! छान! हल्ली कविता प्रांत पूर्ण सोडलेला.. पण नवर्यानं ही "Too good" आहे, वाचच म्हणून आग्रह केला, म्हणून आले. खरच छान आहे..
खुप सुंदर लय मनातल्या मनात
खुप सुंदर लय
मनातल्या मनात म्हणताना "असेन मी नसेन मी" ची आठवण झाली!
नारीमारक कि काय म्हणतात ना
नारीमारक कि काय म्हणतात ना तसं हसून बघायचा खूप वेळा प्रयत्न करून बघितला पण ते खूपच भीषण हास्य होतं असं आता बायको सांगते...
त्या वेळी जर ही गझल मिळाली असती तर...?
एकदम झकास रे
नारीमारक कि काय म्हणतात ना
नारीमारक कि काय म्हणतात ना तसं हसून बघायचा खूप वेळा प्रयत्न करून बघितला पण ते खूपच भीषण हास्य होतं असं आता बायको सांगते...
त्या वेळी जर ही गझल मिळाली असती तर...?
एकदम झकास रे
निरोप घेतला जरी, करू नकोस
निरोप घेतला जरी, करू नकोस काळजी;
तुझ्याच आरशामधे, तुलाच आढळेन मी... वा सही शेर आहे
-मानस६
व्वा
व्वा
मधाळसा असाच हस, देत रहा
मधाळसा असाच हस, देत रहा अश्याच गझला,
तू फक्त हो म्हण, आल्बम तुझा काढेन मी.
निरोप घेतला जरी, करू नकोस
निरोप घेतला जरी, करू नकोस काळजी;
तुझ्याच आरशामधे, तुलाच आढळेन मी...
जसा तुझ्यात गुंतलो, पुन्हा तसे न गुंतणे;
असा ठराव मांडला, अखंड राबवेन मी...
नको मनास चंद्रमा, नकोत चांदण्या मला;
तमोमयी नभात या, असाच बागडेन मी...>> केवळ अप्रतिम.
)
:-))
Pages