अस नेहमीच कस होत गं ... .. ... मलाही काही कळत नाही !!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

काल संध्याकाळीच तासभर गप्पा मारल्या असताना आज पुन्हा सकाळीच स्वातीचा फोन बघुन मी थोडेसे आच्शर्यानेच 'हॅलो' म्हणाले. माझ्या हॅलो ला तिचा प्रतिसाद च मुळी आला तो, 'अस नेहमीच कस होत ग ?', आणि माझे उत्तर होते 'मलाही काही कळत नाही', बास, पुढची ५ मी. ना मी काही बोलु शकले नाही तिने काही ऐकले. ती फक्त खो - खो - खो हसत राहीली.

लहान पणी एकदा, शेजारचे बिर्‍हाड बदलुन गेले होते आणि दुसरे येण्या आधि त्यांच्या अंगणात सगळे गवत वाढले होते. कधितरी लपंडाव / शिवणापाणी खेळण्याच्या निमीत्ताने त्या अंगणात जाणे झाले, आणि तिथे शेजारी - शेजारीच दोन लिंबाची रोपे उतरलेली दिसली. त्यानंतरच्या रविवारी मी आणि माझी मोठी बहिण असे आम्ही दोघींनी जाउन ती आणली आणि आमच्या बागेत लावली. तुझे आधि मोठे होते की माझे अशी पैज लावल्याचे पण आठवते. माझ्या रोपाभोवती मी आधि विटांचे कुंपण मग एक लोखंडी ड्रम अशी सतत वेगवेगळी सुरक्षा कवचं चढवल्याने अर्थातच माझे रोप टिकले - वाढले आणि तिचे त्याच उंचीचे राहुन पुढे कधितरी मरुन गेले.

पण माझे रोप नुसतेच वाढले. काही केल्या त्याला लिंब येईनात. कंटाळुन एके वर्षी वडिलांनी आपण आता हे झाड तोडुन टाकुया असे सुचवले. पण मी आपले, नको तोडायला ची भुणभुण चालु ठेवल्याने ते वाचले. आणि आच्शर्य म्हणजे पुढच्या वर्षी त्याला भरपुर फुल आली आणि छोटी-छोटी लिब देखिल आली. पण लिंब जरा जास्तच मोठी होऊ लागली. मग मात्र मी थोडी खट्टु झाले, कारण ती लिंब नसुन ईडलिंब असणार याची मला खात्री पटली.

थोडेसे पिवळे झालेले एक लिंबु मी तोडले, नखाने त्याच एक टवका उडवला आणि सवईने फळाचा वास घेतला, लगेच लक्षात आले की हे ईडलिंबु नसुन ही मोसंबी आहे. खुप आनंद झाला. कारण त्याआधी कधिच आमच्या कडे एकही मोसंबीचे झाड नव्हते. बर जात ही एकदम उत्तम निघाली, पातळ सालीची, रसदार आणि चविला अत्यंत गोड अशी ती मोसंबी अचानकच , अपेक्षा नसताना आपल्या बागेत बघुन मजाच वाटली.

त्यानंतर आमच्या घरी हा एक कायमचा चेष्टेचा विषय होऊन बसला, लिंबाचे म्हणुन लावलेल्या, फळाची भरपुर वाट बघायला लावलेल्या झाडाला शेवटी बहर आला तो मोसंबिचा.

*

या वर्षी नोहेंबर च्या सुरुवातीला कचरा साठवलेल्या एका कुंडीत थोडी माती टाकुन दोन गुलाबाच्या काड्या लावल्या. त्या काही फुटल्या नाही, पण रोज पाणी घालत असल्याने, कुंडीत वेगळीच कसली रोपे उतरलेली दिसत होती. थोडी मोठी झाल्यावर पानांच्या आकारवरुन ती दुधी भोपळ्याची असल्याचे लक्षात आले. पाने तशी थोडी लहान वाटत होती पण कुंडीत निट पोसली नसतील असा विचार केला. बराच आठवायचा प्रयत्न करुनही आठवेना, मी भोपळ्याच्या बिया कधी टाकल्या ते. रिलायन्स मधुन आणलेला भोपळा किडका निघाल्याचे आठवत होते, पण तो तर कोवळा होता.

वेल फुटभरच वाढला असेल नसेल तर कळ्या आल्या, फुले उमलली आणि भोपळे धरले सुद्धा. पहीला भोपळा मोठा झाला, पण ठराविक लांबी नंतर त्याची लांबी वाढेचना. तो जागच्या जागीच गोल - गोल होऊ लागला. तो लाल भोपळा [डांगर] तर नक्कीच नव्हता. थोड्याच दिवसांत मस्त हिरवागार असा तो भोपळा अचानक सुकु लागला आणि त्याच्या रंग ही बदलु लागला पहिले फळ आहे सुकले असेल म्हणुन मी दुर्लक्ष केले. मधले ८ दिवस कामवाली बाईच झाडांना पाणि घालत होती. त्यामुळे माझी - भोपळ्याची कहीच गाठ-भेट नव्हती. रविवारी सुट्टी म्हणुन निवांत झाडांना पाणि घालत होते. आणि लक्षात आले की भोपळा पुर्ण सुकला आहे. बिचारा म्हणुन प्रेमाने जरा हात फिरवला तर तो हातातच आला. आणि पुन्हा एकदा सवईने मी त्याचा वास घेतला. मस्त गोड वास होता त्याचा. त्या क्षणी लक्षात आले की हा भोपळा नसुन हे खरबुज आहे.

आता मात्र आनंद खरच गगनात मावत नव्हता. भलत्या सिझन मधे, कुंडित भोपळा-भोपळा म्हणुन सांभाळलेल्या वेलाला चक्क खरबुज आले होते. लगेच वडिलांना फोन करुन खुष खबर दिली.

आणि हिच बातमी स्वाती पर्यंत पोहोचल्यामुळे तिने मला फोन केला होता, 'अस नेहमीच कस होत ग ?'.

*

खरबुज कमी बियांचे आणि अतिशय गोड होते. अजुन बरिच आली आहेत मोठे होण्याची वाट बघते आहे.

DSC02443.JPG

विषय: 
प्रकार: 

सायो,mnc, अगो,मॄदुला,स्वाती,सिंडरेला,कविता .. .. सगळ्यांना धन्यवाद Happy

छान! Proud

वॉव टरबूज... मस्तच.
हि अशी फळझाड,वेल लावून टिकवणे व त्याची अशी मस्त फळं काय आनंद ना. इथे एकेक झाड फुले टिकवताना नाकीनऊ येतात थंडीत. प्रेमाने वाढवायचे व थंडीत बहुतेक मरतात.

वॉव टरबूज... मस्तच.>> टरबूज नाही खरबूज आहे ते!

आरती, अनपेक्षित आनंद नक्कीच गगनात मावत नसेल तुझा!!! खूप छान!!!!

मस्त लिहिलं आहेस. मजा आली. Happy
आरती माझ्याकडेही अशीच खरबुजाची वेल वाढली एक दोन आठवड्यात. तिन फळे धरली आहेत. तुला झब्बू देणार Proud

बिया कधी टाकल्या आठ्वत नाही. माझ्या लेकाला हल्ली कसल्याही सीड्स लावाव्याश्या वाटतात. Happy गुलबक्षी, तेरडा, वाटाणे, खरबुज, पॅशन फ्रूट, शेंगदाणे, टोमॅटो, बडिशेप... अन काय अन काय...थोड्याच दिवसांत पाच कुंड्यांमधे पन्नास प्रकार होणार आहेत. Lol

थोड्याच दिवसांत पाच कुंड्यांमधे पन्नास प्रकार होणार आहेत. >> माझही काहिस असच होत :).

मनीष, चिंगी, मेधा, रैना, मनःस्विनी, अशुतोष, बी, सान्वी, चिन्नु ... सगळ्यांचे आभार Happy

वा मस्त, रोज भोपळापुराण ऐकून शेवटी खरबूज हातात आले ते बरे झाले, उलटे झाले असते तर.... खरबूजाच्या आशेने वाट बघत राहिली असतिस आणि शेवटी... ईईईई भोपळा असे झाले असते Happy

Pages