डोक्याला झीट आला इतिहासात जावून. हे वाच ते वाच. टिपण काढ, सनाव़ळ्या शोध. आणि इतकं करून काय तर एकमत नाहीच. काल बाजारात सोनं मोडायला गेलो तर सराफ म्हणतो हे सोनं नाही. च्यायला, रोकडा मोजून घेतलं आणि हा म्हणतो सोनं नाही ? तासभर वादावादी झाली. शेवटी स्वभाव आडवा आला. निमूट त्याचे म्हणणे मान्य करून घट पदरात घेतली. आमच्या म्हणण्याला विच्चारतंय कोण..
लहानपणापासून शिकलो , शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव. बालभारती मधे चांगली चित्र काढली होती. बालशिवाजी अस्सा हातात तलवार घेऊन उभा आहे, त्याच्या मागे दादाजी ( दादोजी नाही ) कोंडदेव वाकून त्याला तलवार हातात कशी धरायची हे शिकवत आहेत. गुरूजी मग रसाळ वाणीने वर्णनं करीत.. दादाजी आणि शिवाजीच्या गोष्टी रंगवून सांगवत. दादाजींनी आत्मक्लेष केला कि शिवबाच्या डोळ्याला पाणी येई आणि हे ऐकताना आमच्या डोळ्यातून धारा वाहत असत.
भालजीं पेंढारकरांचा शिवकालीन सिनेमा टीव्हीवर असला कि बॅटींग सोडून टिव्ही बघायला जायचो. घरी टीव्ही नव्हता. ऐपत नव्हती. मग कुणातरी ओळखीच्याचा घरात घुसायचे. त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून सिनेमा बघायचा.. अशाच कुठल्या सिनेमात दादाजींना आदिलशहाने कैद केलेले असते. शिवरायांना महत्त्वाच्या स्वारीवर जायचे असते. तिकडून दादाजींचा या परमप्रिय शिष्याला निरोप येतो.." माझी काळजी नसावी, स्वराज्य थोर आहे ". राजांना भरून येते. पण मांसाहेबांना हे मंजूर नसते. त्या राजांच्या वर्मी लागतील असे बोल सुनावून स्वतःच दादाजींच्या सुटकेसाठी निघतात.
राजांना हे समजताच ते मोहीम सोडून मासाहेबांच्या मागे निघतात. तिकडे त्या ही कैद होतात आणि नंतर महाराज आणि त्यांचे मावळे खुबीने कदींची सुटका करतात. त्यावेळच्या प्रसंगात शिवबा मासाहेबांना म्हणतात.. मासाहेब आपण कशा आहात ? आम्हाला काळजी लागली होती !!
मासाहेब नाराजीने म्हणतात.. ज्यांनी या स्वराज्याची प्रेरणा दिली ते कैदेत असताना राजे तुम्हाला काहीच कसे वाटले नाही..???
( ऐसे कैसे चलेगा.. मासाहेब क्या बात है... बराबर पाईंट हय आपका .. अब बोलो राजे.. हय क्या जवाब ?)
असे शदाब्बाळ संवाद होऊन सर्व पात्रांना आणि प्रेक्षकांना गहिवरून येते आणि दादाजींचे महत्त्व उराशी बाळगूनच आम्ही भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडत होतो...
आणि आज हे एका क्षणात खोटे झाले ? हाय रे दैवा... ये क्या हुआ ? हम हम नही कोई और है ? असं वाटतंय आताच कुणीतरी सांगेल बेटे तुम हमारी सगी औलाद नही हो !!!
सगळं जग गरगरतंय...!!
ए भाय .............ए भाय .. ......अरे सुन.... सुन वो क्या बोल रहा है !
"महाराजांना शस्त्रविद्या कुणीतरी शिकवलीच असेल ना ? आईच्या पोटातून तर कुणी शिकून नाही ना येत"
प्वाईंट है बॉस.... कशाला कोण खोटं बोलल.
दादाजी असतील नक्कीच गुरू. त्यांनीच शिकवलं शिवबाला. विचारा भालजींना
पण साला ..........या डोक्यात आता नवाच प्रश्न फिरतोय..
या दादाजींचे गुरू कोण होते ?
उनको किसने सिखाया होगा ?
Kiran
गेट वेल सून ..!!>>> स्वत:लाच
गेट वेल सून ..!!>>>
स्वत:लाच शुभेच्छा देतो आहेस का मित्रा !
You really need that ! 
हे हे हे हे काय इषालभौ आवं
हे हे हे हे काय इषालभौ
आवं इषय सोडून बोलणारास बी काय तरी म्हणलं असतील कि यांचं हे म्हाराज का गुरू कोण ते. हितं इषय काय ..आपण घसरलु कुटं आन परत वर त्वांड करून मुर्खाची लक्षणं सांगणाराला आरसा कुणी दावावा ??
काय म्हणता ?
घ्या एक पर्गोलॅक्स !!
हितं आसंच असतया
हितं आसंच असतया किरनभौ....
चालवून घ्या
चालतय चालतय...
चालतय चालतय...
Pages