Submitted by shashank pratapwar on 28 December, 2009 - 23:02
(सुरेश भट यांची माफी मागुन)
अलंकार होता होता साखळीच झाली
अरे कुणी त्या सोनाराच्या दया रे कानाखाली..
आम्हा चार कैरट ची ही समज का न यावी?,
जे कधीच गेले त्याची ओळख ना पटावी,
कसे स्वर्ण भेसलीतुन राहते दुकानी...
तेच डाव करिती फिरुनी डिजाईन नवे दाखुन,
तोच भ्रंश होतो आम्हा पुन्हा पुन्हा पाहून,
आम्ही मात्र खुशाल करितो दागिने हवाली..
लबाडीत घेतले त्याने नवे काम हाती,
मारला मोठा बट्टा त्याने रातोराती,
आम्ही ती गिर्हाइके ज्यांना ब्रँच ही न वाली ...
अशी कशी होती येथे भाबड्यांची गर्दी,
असा कसा कोणी येथे करितसे खरेदी,
भर दुपारी ही सोन्याची भेसळ कळाली...
उभी पेठ वाटे आत एक चोरशाळा,
जेव्हा ननंदेचा हार तपासुनी पाहिला,
कसे स्वर्ण दुर्देवी अन ताम्र भाग्यशाली...
- शशांक प्रतापवार
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
फारच छान
फारच छान रचना..!!
...............................
सध्या मराठीत विपुल साहित्य उपलब्ध आहे. परंतु अंधारात चाचपडणार्याला प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी म्हटले तर पहिले नांव '' उषा:काल होता होता, काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली " याच कवितेचे येते, या निमित्ताने त्या कवितेची आठवण झाली.
-
-------------------------------------------------
प्रतिसाद लिवता लिवता, दमछाक झाली,
अरे कोणी ओता पाणी,विझवा या मशाली...!!
-------------------------------------------------
खरय गंगाधर जी .... "उष:काल
खरय गंगाधर जी ....
"उष:काल होता होता" खुप ग्रेट रचना आहे....
उषःकाल होता होता..... सगळे
उषःकाल होता होता..... सगळे याच्याच मागे लागलेत.
. ( मी का मागे राहू?
)
अलंकार होता होता साखळीच
अलंकार होता होता साखळीच झाली
अरे कुणी त्या सोनाराच्या दया रे कानाखाली..>>>>>>>>
वरिल मुखडा आणि....
उभी पेठ वाटे आत एक चोरशाळा,
जेव्हा ननंदेचा हार तपासुनी पाहिला,
कसे स्वर्ण दुर्देवी अन तांबे भाग्यशाली...>>>>>>
वरिल अंतराच फक्त मुळ गाण्याच्या लयीत म्हणता येऊ शकतं बाकी सर्व अंतर्यांच्या शब्दांमधे ओढाताण होते (म्हणजे लयीत म्हणता येत नाहीत)
कसे स्वर्ण दुर्देवी अन तांबे
कसे स्वर्ण दुर्देवी अन तांबे भाग्यशाली>>>
कसे स्वर्ण दुर्दैवी अन ताम्र
कसे स्वर्ण दुर्दैवी अन ताम्र भाग्यशाली...