Submitted by coolKetan on 23 February, 2008 - 12:15
असेच जरा मागे वळून बघताना संकोच वाटला की
दोन-चार तेच क्षण आता संपत चालले आहेत.
त्यासम नवीनही येतीलच पण कुणास ठाऊक
संथ वाहणारा वारा, रिकामाच रस्ता, परत वळलेली पाऊले
त्यात भर म्हणून अस्वस्थ करावी अशी एखादी शीळ,
जणू मलाच बघायला की जाब विचारायला जमलेलं चांदणं
सारं अजूनही सुंदरच आहे पण कुणास ठाऊक
पुढे किंवा मागे असणाऱ्याला पाहणं सोपं पडतं अगदी आरशांतही
पण आपल्याच समांतर चालणाऱ्याचं कठिण
तसंच अगदी डोक्यातल्या गर्दीचंही
सारं अजूनतरी तसंच वाटतं पण कुणास ठाऊक
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर
मनाची अस्वस्थता सुंदर शब्दात मांडली आहे