पुस्तकांची विश लिस्ट

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पुस्तकांचं कौतुक केल्याबद्दल धन्यवाद मंडळी.

खरं तर पुस्तकांची विश लिस्ट फार मोठी आहे.

रेव्हरंड टिळकांपासून ते मेघना पेठे पर्यंत (फक्त कालाच्या दृष्टीने हं ) अनेकांचं 'समग्र' साहित्य हवंय. बर्‍याच पुस्तकांमधून दिवाळी अंकातील किंवा इतर नियत कालिकांमधल्या लेखांचे, गोष्टींचे उल्लेख येतात. ते सर्व एखाद्या ऑन्-लाइन लायब्ररीत मिळायला हवेत- मग वर्गणी जरी जास्त असली तरी चालेल. पाडगांवकरांनी , अन जी ए कुलकर्णींनी अनेक इंग्रजी पुस्तकांचा मराठी अनुवाद केलाय असं वाचलंय. ती तर हवीतच. हे सगळे डिक चेनी च्या भाषेत नोन अननोन. याशिवाय अननोन अननोन ( म्हणजे अशी पुस्तकं, असे लेखक, हे अनुवाद माहीतच नाहीत ) कितीतरी असणार.

अप्पा बळवंत चौकाच्या जवळ, किंवा मुम्बईत मॅजेस्टिक, आयडियल च्या जवऴ रहाणारे कोण आहेत? माझी विशलिस्ट कधी पाठवू ?( पैसे पोचते केले जातीलच)

अमेरिकेत कोणाकडे सुहास शिरवळकरांची पुस्तकं असतील तर मला वाचायला पाठवणार का?

विषय: 
प्रकार: 

तुम्ही मोकळेपणाने भारतातून पुस्तकं मागवण्यासाठी आवाहन केलंय त्यामुळे हा प्रतिसाद अस्थानी नसावा.

पुस्तकं मागवण्याची सोय मायबोलीवरही ऑनलाईन आहे. भारतातल्याच किंमतीला + एअरमेलने पाठवायचा खर्च इतक्या किमतीला ती उपलब्ध आहेत. भारतातून कुणाही नातेवाईकाला किंवा मित्राला पाठवायला जितका खर्च लागेल तितक्यातच द्यायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे या किमती ठरवताना आता कुणाला सांगायची गरज पडू नये हा एक मूळ उद्देश होता. तसेच काही पुस्तके मायबोलीशी करार करून थेट प्रकाशकानी आणि काही लेखकांनी विक्रीसाठी ठेवली आहेत त्यामुळे छोट्या लेखकाना आणि प्रकाशकाना त्याचा विशेष फायदा होतो आहे.

तुम्हाला हवी असलेली यादी पाठवली तर आम्ही ती शोधून देऊ आणि नंतर ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध करून देऊ. ती मायबोलीवर घेतलीच पाहिजे असे बंधन नाही. अशा परदेशातून आलेल्या मागण्यांचा पाठपुरावा मायबोलीच्या पुण्यातल्या कार्यालयातून केला जातो आणि बर्‍याच मायबोलीकरानी त्याचा फायदा घेतला आहे.

हे लक्षातच आलं नाही की. आता बघतेच मायबोलीवरच्या पुस्तकांची लिस्ट . शिवाय मला हवी असलेल्या पुस्तकांची पण यादी टाकेन.

मला एक वारली पेंटिंगचं पुस्तक मागवायचंय ,मी मागवू शकते का मायबोलीवरून?आणि कसं?
धन्यवाद.

इथे जाऊन इमेल लिहा
http://kharedi.maayboli.com/shop/help.php?section=contactus&mode=update

आम्हाला ते सापडले की मायबोलीच्या खरेदी विभागात ठेवू आणि तुम्हाला कळवू. तुम्हाला किंमत पटली तर ऑनलाईन विकत घेऊ शकता. नाही पटली तर पुस्तक घेतलेच पाहिजे असे कुठलेही बंधन नाही. एकावेळेस एकापेक्षा जास्त पुस्तके घेतलीत तर टपालखर्च थोडा कमी होऊ शकतो कारण सर्वसाधारणपणे पहिल्या पुस्तकाला तो जास्त असतो.

सध्या ही सोय फक्त भारताबाहेर पुस्तके पाठवण्यासाठी आहे.

भारतातल्या भारतात पुस्तके पाठवण्यासाठी काही कायदेशीर परवानगी घेण्याची गरज आहे आणि ती मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

Admin च्या प्रयत्नाना माझा खारीचा हातभार. कुठलेही पुस्तक हवे असेल तर त्याची उपलब्धता, कींमत, प्रकाशकाचा पत्ता वगैरे कळवायचा मी प्रयत्न करु शकतो. पुस्तकाच्या दुकानात माझी नियमित फेरी असते. पुढचा संपर्क मायबोलीतर्फे साधता येईल.

शोनू, मायबोलीवर खरेदी विभागात नसलेल्या पण मी शोधत असलेल्या दोन ध्वनी-तबकड्या वरती प्रशासकांनी दिलेल्या दुव्यावर जाऊन मागवल्या होत्या आणि अत्यंत सहजगत्या मला त्या मिळाल्या होत्या. त्यांना मिळाल्यावर मला ई-पत्र आले आणि मग मी खरेदी विभागात जाऊन नेहमीप्रमाणे विकत घेतल्या. अतिशय उत्तम सोय आहे.

- प्रिया.

शोनू तुला email कसे पाठवता येईल ?

नव्या हितगुजवर तशी सोय नाहीये का? जुन्या हितगुजच्या पानावरून पाठवता येईल. ऑर्कूटवर पण आहे की हाच युझर आय डी.