पुस्तकं

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

एन जे चं हिवाळी ए वे ए ठि झालं होतं तेंव्हा काही जणांनी तक्रार केली की रंगीबेरंगी मधली माझ्याकडच्या पुस्तकांची यादी दिसत नाही म्हणून. शिवाय ती यादी अपूर्ण पण होतीच. बर्‍याच चिकाटीने सर्व मराठी गद्य पुस्तकांची यादी पूर्ण केली. ती ही.
कवितांची, गाण्यांची पुस्तकं थोडीशीच आहेत. पण आता एक ब्रेक घेऊन यातली न वाचलेली पुस्तकं आधी वाचीन म्हणते; मग पद्य पुस्तकं , हिंदी पुस्तकं वगैरे...
संयुक्त राज्यात, कॅनडात राहणार्‍या कोणाला वाचायला हवी असतील तर अवश्य कळवा.

सरस्वती बाई अकलूजकर
आठवणी काळाच्या माणसांच्या
प्रभा अत्रे
स्वरमयी
आचार्य अत्रे
कर्‍हेचे पाणी - भाग एक ते पाच
केल्याने देशाटन
घराबाहेर
चांगुणा
झालाच पाहिजे
निवडक अत्रे
मराठी माणसे, मराठी मने
मी कसा झालो
मुद्दे आणि गुद्दे
यू आर अनंतमूर्ती
अवस्था ( अनुवाद उमा कुलकर्णी )
संस्कार
एस ए अय्यर
आझाद हिंद फौजेची कथा
अनिल अवचट
अमेरिका
आप्त
कार्यरत
कोंडमारा
जगण्यातील काही
छंदांविषयी
धागे आडवे उभे
प्रश्न
मस्त मस्त उतार
माणसं
मोर
स्वत:विषयी
सृष्टीत गोष्टीत
संभ्रम
सुभाष अवचट
स्टुडिओ
माधव आचवल
किमया
जास्वंद
पत्र
ह ना आपटे
गड आला पण सिंह गेला
आशा आपराद
भोगले जे दु:ख त्याला
बाबा आमटे
ज्वाला आणि फुले
प्रकाश आमटे
प्रकाशवाटा
साधना आमटे
समिधा
रमेश इंगळे उत्रादकर
निशाणी डावा अंगठा
सर्व प्रश्न अनिवार्य
महेश एलकुंचवार
वाडा चिरेबंदी
शिरीष कणेकर
आंबटचिंबट
इरसालकी
खटलं आणि खटला
गाये चला जा
गोतावळा
चापलूसकी
चापटपोळी
फटकेबाजी
लगावबत्ती
सूरपारंब्या
यादोंकी बारात
ज्योत्स्ना संभाजी कदम
सर आणि मी
मधु मंगेश कर्णिक
उत्तरायण
काळवीट
कॅलिफोर्नियात कोकण
गवळण आणि इतर कथा
झुंबर
समर्पण
हृदयंगम

इरावती कर्वे
गंगाजल
परिपूर्ती
भोवरा
युगांत
संस्कृती
दत्त रघुनाथ कवठेकर
आभाळाची सावाली
अनंत काणेकर
निशिकांताची नवरी
पिकली पाने
वसंत कानेटकर
वादळ माणसाळतंय
विषवृक्षाची छाया
गिरीश कार्नाड
हयवदन
शिवराम कारंथ
मिटल्यानंतर ( अळियदमेळे ?)
अनंत कालेलकर
माझं होम, माझी मुलं
काकासाहेब कालेलकर
पूण्यभूमी गोमांतक
के नारायण काळे
रंगभूमी -प्रतिमा, रंग आणि रूप
व पु काळे
आपण सारे अर्जुन
काही खरं काही खोटं
वपुर्वाई
ही वाट एकटीची
अण्णासाहेब किर्लोस्कर
सौभद्र
शांता किर्लोस्कर
भातुकली
अंजली कीर्तने
माझ्या मनाची रोजनिशी
गिरीश कुबेर
युद्ध जीवांचे
हा तेल नावाचा इतिहास आहे
ल भा कुरकुरे
राजा राम मोहन रॉय
नरहर कुरुंदकर
निवडक पत्रे संपादन जया दडकर
मागोवा
उमा कुलकर्णी
अनंतमूर्ती यांच्या कथा ( अनुवाद)
आवरण ( अनुवाद - मूळ लेखक एस एल भैरप्पा )
केतकर वहिनी
पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या निवडक कथा ( अनुवाद)
सार्थ
कृ पां कुलकर्णी
मराठी भाषा उद्गम व विकास
जी ए कुलकर्णी
अमृतफळे
आकाशफुले
ओंजळधारा
एक अरबी कहाणी
जी एंची पत्रवेळा
डोहकाळिमा
निळासावळा
पारवा
पिंगळावेळ
रक्तचंदन
रमलखुणा
वैर्‍याची रात्र
सांज शकुन
हिरवे रावे
मृणाल कुलकर्णी
मेकप उतरवल्यावर
वा ल कुलकर्णी
वा म जोशी साहित्य दर्शन
श्रीनिवास विनायक कुलकर्णी
कोरडी भिक्षा
डोह
सोन्याचा पिंपळ
स्नेहसुधा कुलकर्णी -
प्रज्ञावंतांची दैनंदिनी
सचिन कुंडलकर
कोबाल्ट ब्लू
भूषण केळकर
स्वदेश
जगन्नाथ कुंटे
नर्मदे हरहर
दादा कोंडके
एकटा जीव सदाशिव
माधव कोंडविलकर
आता उजाडेल
अशोक कोठावळे( संपादक)
लेखकाचे घर
नंदा खरे
अंताजीची बखर
बखर अंतकाळाची
चिं त्र्य. खानोलकर
अजगर
आपुले मरण
गणुराया आणि चानी
त्रिशंकू
निवडक खानोलकर
राखी पाखरू
रात्र काळी घागर काळी
मंगला खाडिलकर
ही आपलीच माणसं
वि स खांडेकर
अभिषेक
अमृतवेल
अविनाश
क्रौंचवध
गोकर्णीची फुले
ढगाआडचे चांदणे
दवबिंदू
नवी स्त्री
दोन धृव
प्रसाद
मुखवटे
ययाति
रानफुले
विकसन
हिरवा चाफ़ा
क्षितिजस्पर्श
भा द खेर
सारथी सर्वांचा
हसरे दु:ख
संजीवनी खेर
दर्पण
रेचल गडकर
ओढ
माधव गडकरी
राम गणेश गडकरी
डॉ मृणालिनी गडकरी ( अनुवाद )
अज्ञात विवेकानंद
रा ग गडकरी
एकच प्याला
प्रेमसन्यास
भाव बंधन
राजसन्यास
प्रभा गणोरकर
बा भ बोरकर
वीणा गवाणकर
आयडा स्कडर
नाही चिरा - डॉ खानखोजे
गंगाधर गाडगीळ
एका मुंगीचे महाभारत - भाग दोन
गुणाकार
तलावातलं चांदणं
सुधीर गाडगीळ
लाइफ़स्टाईल
लक्ष्मण गायकवाड
वडार वेदना
रेणू गावस्कर
गोष्टी जन्मांतरीच्या
मिलींद गुणाजी
माझी मुलुखगिरी
विश्राम गुप्ते
नारी डॉट कॉम
चंद्रकांत गोखले
चंद्र किरण
शरच्चंद्र गोखले
माझ्या सार्वजनिक जीवनाची बखर
मंगला गोडबोले
अशी घरं अशी माणसं
आणि मी
कुंपण आणि आकाश
झुळूक
पोटाचा प्रश्न
सहवास हा सुखाचा
सुनीताबाई
नीलम गोर्‍हे
नारीपर्व
ना ग गोरे
कारागृहाच्या भिन्ती
दीपा गोवारीकर
साष्टांग धप्प
ग्रेस
मितवा
चंद्रमाधवीचे प्रदेश
दीपक घारे
विचार क्षितिजे
आनंद घोरपडे
नामवंतांचे विनोद
वि द घाटे
काही म्हातारे व एक म्हातारी
पांढरे केस, हिरवी मने
सरोजिनी नितीन चव्हाण
शारदाबाई गोविंदराव पवार
मारुती चितमपल्लि
आनंददायी बगळे
घरट्या पलिकडे
चकवा चांदण
निसर्ग वाचन
पक्षी जाय दिगंतरा
रातवा
शोभा चित्रे
गौरी गौरी कुठे आलीस
अनुराधा चिन्मुळगुंद
प्रथम पुरुषी स्त्री वचनी
जयकांतन
जयकांतनच्या कथा
गिरीश जाखोटिया
एका मारवाड्याची गोष्ट
वंश
अरुण जावळे (संपादन )
हिंदू एक चकवा
अशोक जैन
सोंग आणि ढोंग
चिं वि जोशी
आरसा
एरंडाचे गुर्‍हाळ
ओसाडवाडीचे देव
ना मारो पिचकारी
पाल्हाळ
मेषपात्रे
रहाटगाडगे
लंकावैभव
विनोद चिंतामणी
संचार
संशयाचे जाळे
रत्नप्रभा जोशी
जीवनसाथींच्या नजरेतून साहित्यिकांचे अंतरंग
रा भि जोशी
दीडवितीची दुनिया
मजल दरमजल
वाटचाल
वि श्री जोशी
झांशी राणी लक्ष्मीबाई
मुकुंद टांकसाळे
सक्काळी सक्काळी
मनिषा टिकेकर
कुंपणा पलीकडला देश
अशोक देवदत्त टिळक
चालता बोलता चमत्कार
लक्ष्मीबाई टिळक
स्मृती चित्रे
ग ल ठोकळ
ठोकळ गोष्टी
शरदिनी डहाणुकर
फुलवा
गो रा ढवळीकर
आनंद कल्याणी
मृणालिनी ढवळे
दृष्टी आडची सृष्टी
अरुणा ढेरे
अर्ध्या वाटेवर
अज्ञात झर्‍यावर रात्री
काळोख आणि पाणी
कृष्ण किनारा
नाग मंडल
भगव्या वाटा
लावण्या यात्रा
लोकसंस्कृतीची रूपे
विस्मृती चित्रे
रा चिं ढेरे
नाथ संप्रदायाचा इतिहास
लोक साहित्य, शोध आणि समिक्षा
संत, लोक आणि अभिजन
गोपीनाथ तळवलकर सहस्त्र धारा
गोविंद तळवलकर अभिजात
बहर
लाल सलाम
वाचता वाचता -२
पूर्णचंद्र तेजस्वी
चिदम्बर रहस्य
प्रिया तेंडुलकर
असेही
जावे तिच्या वंशा
ज्याचा त्याचा प्रश्न
पंचतारांकित
विजय तेंडुलकर
आणि मी
कादम्बरी -एक
चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी
तें
तेंडुलकरांच्या निवडक कथा
रातराणी
हे सर्व कोठून येते
सुषमा तेंडुलकर
तें नावाचे बाबा
मधुकर तोरडमल
आयुष्य पेलताना
तरूण तुर्क, म्हातारे अर्क
पुष्पा त्रिलोकेकर
वेध
हमीद दलवाई
इंधन
जयवंत दळवी
निवडक ठणठणपाळ
परममित्र
माजघर
सारे प्रवासी घडीचे
सूर्यास्त
अरुण दाते
शतदा प्रेम करावे
गो नी दांडेकर
हे तो श्रींची इच्छा
फादर फ्रांसिस दिब्रिटो
ओअसिस च्या शोधात
सीमा देव
सुवासिनी
गोविंद बल्लळ देवल
शारदा
संगीत संशय कल्लोळ
गौरी देशपांडे
आहे हे असं आहे
उत्खनन
पु ल देशपांडे
अघळ पघळ
अपूर्वाई
असा मी असामी
आपुलकी
आम्ही लटिके ना बोलू
एक झुंज वार्‍याशी
एका कोळीयाने
उरलं सुरलं
कान्होजी आंग्रे
काय वाट्टेल ते होईल
कोट्याधीश पु ल
खोगीर भरती
गणगोत
गुण गाईन आवाडी
गोळा बेरीज
चार शब्द
चित्रमय स्वगत
जावे त्यांच्या देशा
तीन पैशांचा तमाशा
ती फुलराणी
तुझे आहे तुजपाशी
दाद
नवे गोकुळ
नस्ती उठाठेव
पुरचुंडी
पुलकित षट्कार
पु ल पंचाहत्तर
पूर्वरंग
पोरवय
बटाट्याची चाळ
भाग्यवान
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास
मित्रहो
मुक्काम शांतिनिकेतन
मैत्र
मोठे मासे , छोटे मासे
रवींद्रनाथ -तीन व्याख्याने
रसिकहो
रेडिओवरील भाषणे व श्रुतिका १ व २
वटवट वटवट
वयम् मोठम् खोटम्
वंगचित्रे
व्यक्ती आणी वल्ली
विठ्ठल तो आला आला
पु ल एक साठवण
स्वगत
सुंदर मी होणार
हसवणूक
सुनिता देशपांडे
आहे मनोहर तरी
आहे मनोहर तरी वाचन आणि विवेचन
मण्यांची माळ
मनातलं अवकाश
सोयरे सकळ
वामन देशपांडे
निवडक अभंग
मुलांसाठी संध्याकाळ
सदानंद देशमुख
बारोमास
कमल देसाई
जय हो
रणजित देसाई
माझा गाव
लालजी देसाई
जोहार मायबाप
नारायण धारप
आनंद महल
चंद्राची सावली
नवे दैवत
शपथ
स्वप्न मोहिनी
म वा धोंड
मर्‍हाटी लावणी
किरण नगरकर
सात सक्कं त्रेचाळीस
शं ना नवरे
अघळपघळ
अट्टाहास
तिन्ही सांजा
दिवसेंदिवस
पर्वणी
सर्वोत्कृष्ट शन्ना
प्रमोद नवलकर
पहारा
ज्ञानेश्वर नाडकर्णी
अभिनय
चिद्घोष
वलयांकित
नाथमाधव
वीरधवल
सोनेरी टोळी
जयंत नारळीकर
यक्षांची देणगी
याला जीवन ऐसे नाव
वामन परत न आला
भालचंद्र नेमाडे
कोसला
जरीला
झूल
देखणी
बिढार
हिंदू
हूल
साहित्याची भाषा
डॉ मीना नेरुरकर
ठसे माणसांचे
सेतू माधवराव पगडी
अहकामे आलमगिरी
नेसोनी शालू हिरवा
अप्पा पटवर्धन
गावाचे गोकुळ
राम पटवर्धन
पाडस
वसुंधरा पटवर्धन
हाय
अ‍ॅलेक पदमसी
अ डबल लाइफ
गोदावरी परुळेकर
जेंव्हा माणूस जागा होतो
गो मा पवार
विठ्ठल रामजी शिंदे
डॉ. जयसिंगराव पवार
शाहू छत्रपती , एक मागोवा
दया पवार
पासंग
बलुतं
षांताराम पवार
दीपस्तंभ
ग प्र प्रधान
साता उत्तराची कहाणी
दिलीप प्रभावळकर
अवती भवती
श्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी
एका खेळियाने
मीना प्रभु
ग्रीकांजली
चिनी माती
तुर्कनामा
दक्षिणरंग
माझं लंडन
मेक्सिको पर्व
बाळकृष्ण प्रभुदेसाई
गंधर्व
डॉ. गंगाधर पानतावणे
साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती
लीला पाटील
ओलांडताना
वसंत केशव पाटील ( अनुवाद )
अखेरचे झोपडे मूळ लेखक केशव रेड्डी
विश्वास पाटील
झाडाझडती
महा नायक
संभाजी
म गो पाठक
लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव
यशोदा पाडगांवकर
कुणास्तव कुणीतरी
कमल पाध्ये
बंध अनुबंध
प्रभाकर पाध्ये
त्रिसूपर्ण
भाउ पाध्ये
बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर
वासूनाका
श्री दा पानवलकर
सांजारी
रविंद्र पिंगे
शकुनाचं पान
सर्वोत्तम
सुखाची एक पाकळी
विद्याधर पुंडलीक
देवचाफा
पोपटी चौकट
मेघना पेठे
नातिचरामि
हंस अकेला
के ज पुरोहित व्रात्यस्तोम
श्री ना पेंडसे
गारंबीचा बापू
तुंबाडचे खोत १ व २
रथचक्र
हद्दपार
प्रभाकर पेंढारकर
रारंगढांग
भालजी पेंढारकर
साधा माणूस
शिरीष पै
मी
माझे मला
टिप फुले टिप ग
वसंत पोतदार
भीमसेन
ना सी फडके
निवडक कथा
बावनकशी
सितारा मंझिल
सुधीर फडके
गाजलेली गीते
जगाच्या पाठीवर
य दि फडके
नाही चिरा नाही पणती
शकुंतला फडणीस
फोटोवर टिच्चून
न र फाटक
लोकमान्य
पद्मजा फाटक
बापलेकी
रामदास फुटाणे
चांगभलं
बाळ फोंडके
जंतर मंतर
जावे विज्ञानाच्या गावा
नरेंद्र बल्लाळ ( अनुवाद)
कथा भारती : तेलुगु लोककथा
तारा बनारसे
केवल कांचन
नर्सेस क्वार्टर्स
राणी बंग
गोईण
रविंद्र बागडे
गठुळं
डॉ रवी बापट
वॉर्ड नंबर पाच, के ई एम
वसंत बापट
अहा देश कसा छान
ताणे बाणे
विसाजी पंताची वीस कलमी बखर
अरविंद बावडेकर
कँसर माझा सांगाती
हिम्मतराव बावस्कर
बॅरिस्टरचं कार्टं
विद्या बाळ
संवाद
कथा गौरीची
वि आ बुवा
नवर्‍यांवर पी एच डी
विश्राम बेडेकर
रणांगण
मिलींद बोकील
उदकाचिया आर्ती
जनाचे अनुभव पुसतां
झेन गार्डन
शाळा
बा भ बोरकर
प्रियकामा
वि ज बोरकर
माती आणि आदेउश
वंश
रा रं बोराडे
वाळवण
भाई भगत
चेहरे मोहरे
रवींद्र भट
खुर्ची
दुर्गा भागवत
अस्वव्ल
आस्वाद आणि आक्षेप
दुपानी
पूर्वा
पैस
भावमुद्रा
रानझरा
ऋतुचक्र
व्यासपर्व
भा रा भागवत
छगनचे चर्‍हाट चालूच
हाजीबाबाच्या गोष्टी
अंजली भाटवडेकर
संगोपन
मनोज भाटवडेकर
आपली मुलं आणि आपण
पु भा भावे
अकुलिना
विनोबा भावे
महाराष्ट्रीयांशी हितगूज
वि वा भिडे
पुण्य संस्कृती भाग २
सुभाष भेंडे
आमचा गोवा, आम्हाला हवा
ऐसी कळवळ्याची जाती
साहित्य संस्कृती
एस एल भैरप्पा
पर्व ( अनुवाद उमा कुलकर्णी)
बा सी मर्ढेकर
मर्ढेकरांच्या कादंबर्‍या
गणेश मतकरी
फिल्म मेकर्स
प्रतिभा मतकरी
अतर्क्य
रत्नाकर मतकरी
ऐक टोले पडताहेत
माणसांच्या गोष्टी -२
श्याम मनोहर
कळ
खूप लोक आहेत
महाश्वेता देवी
मीठ आणि इतर कथा
रमेश मंत्री
ओठ सलामत तो
सह्याद्रीची चोरी
ह मो मराठे
बालकांड
निवडक कथा
निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी
पोहरा
मार्केट
कविता महाजन
ब्र
भिन्न
श्री म माटे
बारा शस्त्रज्ञ
मी व मला दिसलेलें जग
ग दि माडगूळकर
कृष्णाची करंगळी
गदिमा
चंदनी उदबत्ती
जोगिया
तीळ आणि तांदूळ
थोरली पाती
बांधावरल्या बाभळी
बोलका शंख
भाताचे फूल
मंतरलेले दिवस
सोने आणि माती
व्यंकटेश माडगूळकर
उम्बरठा
करुणाष्टक
कोवळे दिवस
चरित्र रंग
चित्रकथी
पांढर्‍यावर काळे
बाजार
व्यंकटेश माडगूळकर यांची कथा
सरवा
द मा मिरासदार
फर्मास गोष्टी
अम्बरीष मिश्र
शुभ्र काही जीवघेणे
सुंदर ती दुसरी दुनिया
केशव मेश्राम
आसूडवळ
ज्वाला कल्लोळ
नंदा केशव मेश्राम ( सुमेध वडावाला रिसबूड )
मी नंदा
दि बा मोकाशी
मोकाशी यांची कथा
जरा जाऊन येतो
गंगाधर मोरजे
मराठी लावणी वाङ्मय
बाबू मोशाय
आरपार
चित्राची गोष्ट
शहेनशहा
सण्डे के सण्डे
आनंद यादव
आत्म चरित्रा मीमांसा
काचवेल
घरजावई
झोंबी
नटरंग
भूमीकन्या
मेधा राजहंस
गौरी मनातली
मं वि राजाध्यक्ष
भाषाविवेक
वाद संवाद
प्रतिभा रानडे
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी
ऐरणीवरचे प्रश्न
यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी
झांशीची राणी लक्ष्मीबाई
फिरोझ रानडे
१२ जुलै ते ११ जुलै
काबूलनामा
फिरविले अनंते
विजय तेंडुलकर एक इंट्रेस्टिंग माणूस
पी एस रामाणी
ताठ कणा
नार्ला वेंकटेश्वर राव
वेमना
सत्यजित राय
जय बाबा फेलूनाथ
मो ग रांगणेकर
असा धरी छंद
पु शि रेगे
मातृका
सावित्री
जे के रोलिंग
हॅरी पॉटर आणि तत्वचिंतकाचा पाषाण
सुमेध वडावाला ( रिसबूड)
देह जावो अथवा जावो
ब्रह्मकमळ
सांजवा
फणीश्वर नाथ रेणू
काळी माती हिरवी माती
श्रीराम लागू
लमाण
लक्ष्मण लोंढे
२२ जुलै १९९५
डॉ मोहिनी वर्दे
सप्तक
विनय वाइकर
आइना ए गजल
अनुताई वाघ
कोसबाडच्या टेकडीवरून
बापू वाटवे
दादासाहेब फाळके
हंसा वाडकर
सांगत्ये ऐका
कमलेश वालावलकर
बाकी शून्य
सरोजिनी वैद्य
कहाणी लंडनच्या आजीबाईची
संक्रमण
शरतचंद्र
देवदास
केदार शिंदे
सही रे सही
वि वा शिरवाडकर
ऑथेल्लो
अंतराळ
कैकयी
बारा कथा
मुख्य मंत्री
ययाती आणि देवयानी
विदूषक
विभावरी शिरूरकर
विरलेले स्वप्न
शबरी
हिंदोळ्यावर
उषा शेठ
माझी नीता
अरूण शेवते
अलीकडे पलीकडे
ते दान त्या क्षणांचे
स्नेहांकित
हाती ज्यांच्या शून्य होते
राम शेवाळकर
निवडक मराठी आत्मकथा
शांता शेळके
अनुबंध
आतला आनंद
कविता स्मरणातल्या
जाणता अजाणता
चौघीजणी
जन्म जाह्नवी
झोपेचा गाव
नक्षत्रदिवे
पत्रं पुष्पम्
पावसा आधीचा पाऊस
रंगरेरेषा
ललित नभी मेघ चार
वेडे वारे
सांगावेसे वाटले म्हणून
मधुवंती सप्रे
स्वर योगिनी
वसंत सरवटे
सहप्रवासी
नी र सहस्रबुद्धे
शिक्षणक्षेत्रातील सरस नीरस
इंदिरा संत
मालन गाथा
प्रकाश नारायण संत
झुम्बर
पंखा
वनवास
शारदा संगीत
आनंद साधले
आनंद ध्वजाच्या कथा
महाराष्ट्र रामायण
सानिया
स्थलांतर
प्रवास
बाळ सामंत
सप्रेम नमस्कार
कमलाकर सारंग
अनुभव
शिवाजी सावंत
युगंधर श्रीकृष्ण - एक चिंतन
वि दा सावरकर
१८५७ चे स्वातंत्र्य समर
काळे पाणी
माझी जन्म ठेप
सहा सोनेरी पाने
कृष्णाबाई नारायण सुर्वे
मास्तरांची सावली
नारायण सुर्वे
कहाणी कवितेची
ज्योती सोमण
क्वेटा टेरेस
कमला सोहोनी
आहार गाथा
शांता हुबळीकर
कशाला उद्याची बात
राजाराम हुमणे
राजारामायण

लीलाधर हेगडे
आणि पाकिस्तान तुटले

इतर
मुंबई मराठी साहित्य संघ
एका पिढीचे आत्मकथन : संपादन पु शि रेगे
दुसर्‍या पिढीचे आत्मकथन : संपादन उज्ज्वला मेहेंदळे
ढवळे प्रकाशन
तुकारामची गाथा
य गो जोशी
ज्ञानेश्वरी
बाळकृष्ण अनंत भिडे
ज्ञानेश्वरी
दासबोध
युनिक फ़ीचर्स
खरे खुरे आयडॉल्स
निवडक आवाज

विषय: 
प्रकार: 

ही सग.........ळी तुझ्याकडे 'असलेल्या' पुस्तकांची यादी आहे??? माय गॉड... हेवा वाटतोय तुझा! Happy
जबरीच.. i wish माझ्याकडे आत्ता इतकी पुस्तकं असती..
बरीच माहीत नसलेली पुस्तके कळली.. thanks for sharing...

बरीच वाचलेली, काही न वाचलेली. अमेरिकेत राहून ईतकी पुस्तक जमविने खरच कोतुकास्पद गोष्ट आहे.

शोनु,
तुझ्याकडच्या पुस्तकांची यादी बघुन मला आपण एकदम गरीब आहोत की काय असे वाटायला लागले. माझ्याकडे स्वतःची
५०-६० सुद्धा पुस्तकं नसतील. इथे आणि भारतात मिळुन.
एकदा सुट्टीत तुझ्या घरी यायला पाहिजे म्हणजे सगळी पुस्तकं अधाश्या सारखी वाचुन काढता येतील. तुझी लायब्ररी बघीतली
तर मी बहुदा आनंदाने वेडी होईन असे वाटतय. यातली कितीतरी पुस्तकं "माझ्या Must read पुस्तकांची यादी" मध्ये आहेत. Happy

आहे की तुझ्याकडे.
एवढी मोठी लिस्टच आहे. Happy

आता तु बेंच मार्क पुस्तक गोळा करण्यातली.

बर श्री ना पेंडसे यांच गारंबीचा बापु नाहिये का??? का?????

आणखी एक आयुष्य हवय, नुसते वाचन करण्यासाठी.
मिळालेच तर सगळी वाचुन काढीन म्हणतोय.
तोपर्यंत या श्रीमंतीचा हेवा करण्याशिवाय काय करू ?

पण माझ्या अल्पमतिप्रमाणे, या यादीत हि पुस्तके हवीतच.
मंगला गोडबोले = साक्षात धप्प, पर्स हरवलेली बाई, जिथली वस्तु तिथे.
विश्वास पाटिल = चंद्रमुखी, पांगिरा, पानिपत,
डॉ डहाणुकर = स्वास्थ्यवृत्त
पुष्पा त्रिलोकेकर = देवाचा जन्म
मीना प्रभु = मेक्सिको पर्व, इजिप्तायन, तुर्कनामा
निळु दामले = माणुस आणि झाड, कैरो ते इस्तंबुल,

मल तुझा फार हेवा वाटला गं..... किती छान संग्रह आहे तुझा. मलाही वाचनाची खुप आवड आहे. प्रयत्न करते आहे पुस्तकं जमवायचा.
खुप छान वाटलं. तुला भेटायला आवडेल.

शोनू, तुझं हे पान म्हणजे आता हक्काची लायब्ररी झालीये. काय वाचू? असा प्रश्न पडला की सरळ इथे यायचं आणि हवं ते पुस्तक निवडायचं. ह्यात मंगला गोडबोलेंचं 'गुंडाबळी' दिसलं नाही. तसेच सुधा मुर्ती आणि सुहास शिरवळकर पण गैरहजर दिसताहेत. हे दोन माझे आवडते लेखक आहेत.

बरं, प्रत्येक भारतवारीला घेशील ती नविन पुस्तकं इथे पण इथे टाकशील ना??

शोनू, यादी मेहनतीने केलीस.. छान..

शोभा चित्रेंच ते गौरी गौरी कुठे आलीस.. कशाबद्दल आहे? इतकी पुस्तकं जमवलीत कशी वा जमलीत कशी तेही लिहायच असतं.

पूर्ण यादी वाचनही धन्य वाटले.. तू तर सगळी पुस्तकेच वाचलेली आहेत.. तुला सुपर सर्वोत्तम Happy
किंवा वाडकरांच्या भाषेत 'फन्टॅब्युलस'!! Happy

शोनू, तुमचं वाचन आणि पुस्तकांचा संग्रह खरंच जबरदस्त आहे. Happy
एवढा मोठा वैयक्तिक संग्रह फारच थोड्या जणांचा असेल.

खरच तुझा हेवा वाटावा एवढी पुस्तक वाचायला मिळाली आहेत.

आई ग.... ही सगळी पुस्तक तुझी आहेत???? जबरदस्त कलेक्शन आहे हं. तुला भेटायला खरच आवडेल. नवीन पुस्तक घेतलीत की यादी अपडेट करत राहा. आता एक इंग्लिश पुस्तकांची यादी पण बनव ना.

-प्रिन्सेस...

येवढं कौतुक करू नका मंडळी. अमेरिकेत रहातेय गेले पंधरा वीस वर्षं. वर्षा-दीड वर्षानी भारतवरी ठरलेलीच असते. शिवाय आई, मावशी, इतर नातेवाइक सगळ्यांनी वेळोवेळी आणलेली पुस्तकं आहेत. मला दर खेपेला जेमतेम एकदा जवाहर अन एकदा आयडियल मधे जायला जमतं. जवाहर मधे रस्त्यावर उधं राहून सगळी खरेदी चालते. एकदा दहाबारा पुस्तकंनिवडलीकी मग त्यांचा माणून पण उत्साहाने गट्ठे उलटे पालटे करून पुस्तकं शोधून देतो. मग ते सावकाशीने हिशेब करून फोनवर कळवतात अन नंतर त्यांचा माणूस पुस्तकांचा गठ्ठा घरी आणून देऊन पैसे घेऊन जातो. एकदा रसिक साहित्य मधे गेले तेंव्हा भावाच्या ड्रायव्हरकडे असलेले पण पैसे घेऊन त्यांचं बिल चुकतं केलं होतं इतकी वेड्यासारखी पुस्तकं घेतली होती.

कधी वाटतं भारतात असते तर केवढी तरी जास्त जमवली असती. पण कधी वाटतं की दूर रहाते अन मराठी पुस्तकं इथे तशी दुर्मिळच. म्हणून एवढी जमलीयेत.

ज्यांना कोणाला पुस्तकं वाचायसाठी रहायला यायचं त्यांना सर्वांना उभं आमंत्रण ( श्टँडिंग इंव्हिटेशन हो )

अजूनही काही मस्ट रीड असतील तर सांगा.

शोनू .. आपण भेटायलाच हवं... तुझ्याकडे ही सग्ग्ग्ग्गळी पुस्तकं आहेत ? !!!
मी सुद्धा एनजे मधेच राहतो... त्या दिवशी एवेएठिला येऊ शकलो नव्हतो Sad

मी तर हि लिस्ट्च वाचत रहते दिवसतुन २ दा कमितकमी ... हेवा वाट्तोय आणी आदरपण!!
आयुष्यात आता एक सुट्टी अशी घालवायला मिळावी...हि सगळी पुस्तक्...एप्रिलचे सुस्त निवान्त सुटीचे दिवस....मस्त घरात झोपाळ्यावर लोळ्त फकस्त वाचत रहावे...मम्मीची हाक यी पर्यन्त...
ये अब मुम्किन कहा Sad

वा वा वा ! तोंडाला (डोळ्यांना) पाणी सुटले Happy
जीएंची भरपूर आहेत की तुझ्याकडे. आकाशफळे पण आहे म्हणजे कमाल आहे. सहसा कोणाकडे दिसत नाही. काय सही आहे ना ते पुस्तक?
आणि पुलंची पण मोठी यादी पाहून जिव गलबलला !

शोनू, मॅड म्हणजे एकदम मॅsssssssssडच! भन्नाट लिस्ट आहे.

शोनूताईंनी पाठविलेल्या पुस्तकात 'झुळुक' हे मंगला गोडबोले यांचे पुस्तक वाचले.

झुळुकबद्दल सांगायचे म्हणजे''चटपटीत खमंग भेळ' Happy मंगला गोडबोले यांचे आईने जमविलेले लेख-कात्रणं कधीमधी सुट्टीतच काय ती वाचली गेली होती. आज खूप दिवसांनी असे Light mood पुस्तक वाचून तोंडाला चव आली, असे म्हटले तरी चालेल! पुस्तकात काय आवडले ते नेमके सांगता येणार नाही. पहिल्या एक - दोन झुळकी जोरात येतात! (मी झोपेतदेखील रात्रभर हसत होते- इति नवरा). इतर लेख त्यामानाने जरा कमी जोरात आल्या तरी, प्रत्येक वाक्यावर माझी मान आपोआप होकारार्थी डोलावत होती. अगदी साधे सोपे दैनंदिन जीवनातले अचूक निरिक्षण आणि त्यावर मार्मिक भाष्य असे पुस्तकाचे स्वरूप आहे.
मुखपृष्ठ आणि आतील चारुहासांची comic strips अगदी विषयानुसार आणि झक्कास!
असे नर्मविनोदी पण मध्येच विचारात पाडणारे पुस्तक पाठविल्याबद्दल शोनू, तुमचे खूपच आभार!

व्यंकटेश माडगूळकर. काय लिहु?- सिर्फ नामही काफी है!
डीडीवर माडगूळकरांच्या कथांवर आधारीत मालिका पाहिली होती. एक दोन धडे देखील होते. पण तेव्हाचे वाचन फक्त परिक्षेच्या दॄष्टीकोनातून झाल होतं.
ह्या माणसाला नुसते लेखक म्हणणे फार चुकीचे. लेखक नव्हे निष्णात चित्रकारच तो!
'उंबरठा' ह्या पुस्तकातल्या त्यांच्या कथांची वर्णनशैली आप्रतिम! सलामीची 'उंबरठा', 'जंगल', 'घरापाठीमागची..' अश्या अनेक साध्या सरळ कथांतून जबरदस्त व्यक्तीचित्रण आहे. प्रत्येक व्यक्ती योजलेल्या पात्राला पुरेपूर न्याय देउन जाते. मला भावलेलं म्हणजे फक्त व्यक्तीच नाही तर कथांमध्ये आलेलं वातावरण, बोलीभाषा यातून सहजपणे चित्रित होत जाणारा कथेचा गाभा.. विशेषकरून 'उंबरठा' हा कथासंग्रह म्हणजे विविधतेने नटलेले वेगवेगळ्या चित्रांचा संग्रह! 'देता किती घेशील दो कराने' ह्या अवस्थेला कारण. Happy

शोनू, सुन्दर सन्ग्रह!! ते एखाद्या उन्च इमारतीकडे बघताना कसे होते ना, म्हणजे आपण वर बघत राहतो पण इमारत सम्पतच नाही, तसे झाले माझे लीस्ट वाचताना..तुमचे कौतुक आणि अभिनन्दन!!!
(खूप आनन्द झाला तुम्ही माझ्या जवळ राहता याचा Wink
माझ्याकडेही अभ्यासाची म्हणाल तितकी पुस्तके आहेत, इथे आणि देशात. पण साहित्य घेणे नाही जमले. तिथे असेपर्यन्त कमावत नसल्यामुळे आणि इथे आल्यावर इथे मिळत नाहीत/वेळ नाही म्हणून. आता योग जुळुन आला आहे Happy भरपुर वेळ..मज्जाच मज्जा Happy
अजुन काही लीस्ट मध्ये भर घालण्यासाठी
-म्रुत्युन्जय
-राधेय

भारत सासणे आणि राजन खान हे दोन लेखक देखील छान लिहितात असे ऐकुन आहे.. सासणेंची दूर तेथे दूर तेव्हा अशी एक लघुकादंबरी आहे. (मी दोन्ही लेखक वाचलेले नाहीत. ऐकीव माहिती).
नेमाडेंचे टिकास्वयंवर चांगले आहे (६०-७० च्या दशकातले टिकालेख आहेत).
दळवी: चक्र, धर्मानंद, वेडगळ (वेडगळ माझ्यामते दळवींची सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. हिला का प्रसिद्धी मिळाली नाही माहिती नाही)
पेंडसे: तुंबाडचे खोत, एल्गार, लव्हाळी, एक होती आजी
जी.ए.: पैलपाखरे (५-६ अतिशय ताकदीच्या इंग्लिश लघुकादंबर्‍या (नॉवेलेट)/दीर्घकथांचा अनुवाद)
श्री.ज.जोशी: मंटोच्या कथा (सआदत हसन अली मंटोच्या निवडक कथांचा अनुवाद.. ह्यात टोबा टेकसिंग, ठंडा गोश्त ह्या मंटोच्या दोन अजरामर कथादेखील आहेत)
शिकार मूळ लेखक बहुतेक नागप्पा - अनुवादित - नॅशनल बूक ट्रस्टचे प्रकाशन.. ह्या प्रकाशनाने अनेक भारतीय भाषातील उत्तम पुस्तकांचा मराठी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद केला आहे.
श्री दा पानवलकरः सूर्य
बाळकृष्ण प्रभुदेसाइ: गंधर्व, जहाज - हे दोन्ही लघुकथासंग्रह आहेत. गंधर्व प्रिन्टमधे आहे. जहाज मला तरी अजुन मिळालेले नाही. हा लेखक फार लवकर वारला. हंस, मौज, माणुस वगैरे नियतकालींकामधे प्रकाशित झालेल्या ह्या कथा आहेत. जबरदस्त ताकद होती ह्या लेखकामध्ये.
बेडेकरः एक झाड दोन पक्षी

अजुन काही आठवली तर लिहिन. तुला भारतवारीत खरेदी करता शुभेच्छा

भारतातून यावेळेस आणलेल्या पुस्तकांपैकी ( जवळपास ) अर्धी पुस्तकं आता वरच्या यादीत टाकलीत.
शुद्धलेखनाच्या चुका असतीलच. त्या कळवल्या तर आभारी राहीन.

माझं स्वतःच रंगीबेरंगी पान नाही. आणि शोनूनी परवानगी दिली तेव्हा माझ्या कडच्या पुस्तकांची यादी इथे देत आहे. ह्यातली कुठलीही पुस्तके हवी असल्यास वि.पु. मधे लिहा. (अमेरिकेत) पाठवु शकेन.

गो. नी. दाण्डेकर
मोगरा फुलला
दास डोंगरी राहातो
पडघवली
कुणा एकाची भ्रमणगाथा
कादंबरीमय शिवकाल
स्मरणगाथा
दुर्गभ्रमणगाथा
माचीवरला बुधा
मृण्मयी
गौरी देशपांडे
एकेक पान गळावया
तेरुओ आणि कांहि दूरपर्यंत
गोफ
दुस्तर हा घाट
विंचुर्णीचे धडे
मुक्काम
उत्खनन
शिवाजी सावंत
मृत्युंजय
युगंधर
विश्वास पाटील
पानिपत
रणजित देसाई
स्वामी
व्यंकटेश माडगूळकर
जंगलातील दिवस
बनगरवाडी
मारुती चितमपल्ली
चकवा चांदण
मंगला गोडबोले
नवी झुळूक
पुन्हा झुळूक
सह-वास हा सुखाचा
द. मा. मिरासदार
माझ्या बापाची पेंड
चकाट्या
बेंडबाजा
जावईबापूंच्या गोष्टी
सरमिसळ
गंमतगोष्टी
खडे आणि ओरखडे
वसंत मिरासदार
लखू ठोकडेची गांधीगिरी
प्रकाश नारायण संत
वनवास
शारदा संगीत
पंखा
झुंबर
मिलींद बोकील
शाळा
झेन गार्डन
उदकाचिया आर्ती
पु. ल. देशपांडे
व्यक्ती आणि वल्ली
जावे त्यांच्या देशा
अपूर्वाई
पूर्वरंग
अघळपघळ
तुझें आहे तुजपाशी
प्रभाकर पेंढारकर
रारंगढांग
वीणा गवाणकर
एक होता कार्व्हर
मार्जोरी किनन रॉलिंग्ज (अनुवाद : राम पटवर्धन)
पाडस
अभय बंग
माझा साक्षात्कारी हृदयरोग
डॉ. ह. वि. सरदेसाई
घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती
व. पु. काळे
माझं माझ्यापाशी?
जयवन्त दळवी
सारे प्रवासी घडीचे
चक्र
ग. दि. माडगूळकर
बांधावरच्या बाभळी
सुभाष अवचट
स्टुडीओ
बाबू मोशाय
शहेनशहा
गंगाधर गाडगीळ
दुर्दम्य
दुर्गा भागवत
व्यासपर्व
भावमुद्रा
पैस
आस्वाद आणि आक्षेप
दुपानी
पूर्वा
मीना प्रभू
चिनी माती
माझं लंडन
तुर्कनामा
मेक्सीको पर्व
इरावती कर्वे
युगांत
परिपूर्ति
सानिया
ओमियागे
साने गुरुजी
श्यामची आई
साने गुरुजींच्या गोड गोष्टी (भाग १ ते ९)
भालचंद्र नेमाडे
झूल
बिढार
भा. रा. भागवत
फास्टर फेणे (२० भाग)
रॉय किणीकर
उत्तररात्र

कालच सोनेरी टोळी उर्फ राया क्लब वाचून संपवले. ते वाचताना फास्टर फेणे ची आठवण झाली चिकार. आता वीरधवल वाचणार आहे. ते झालं की फास्टर फेणे मागवावं लागणार.

कौतुक वाटत हो शोनो आणी detroitkar तुमच... आवड जोपासायला हि शीस्त, चिकाटी, ध्यास हवा हे तुमच्या यादि वरुन सिद्ध होत... तुम्ही ईतरांना ही पुस्तक पाठवता वा क्या बात है!.....आदरपुर्वक!!!

शोनू, कधी पाठवू सांग. येत्या आठवड्यात धाडून देतो.

बी एम एम अधिवेशनाला येणार्‍यांना पुस्तकं हवी असली तर लवकर इथे कळवा. मी शनिवारी घेउन येईन पुस्तकं.

रुनी, सचिन अन ज्ञाती यांनी माझ्या घरी येऊन नवीन पुस्तकं लावून ही यादी अद्ययावत करायचं वचन दिलं होतं. मी अजून विसरले नाहीये Happy

Pages