सर्व मायबोलीकरांचे जाहिर आणि हार्दिक आभार......(कृपया वाचाच!!!!!!)

Submitted by saakshi on 23 December, 2009 - 07:45

नमस्कार मंडळी..................
मी साक्षी..... नाव मंजुषा......
तुम्हाला आठवत असेल कि नाही माहित नाही पण मला मात्र चांगलच आठवतंय......
campus recruitment आणि उमेदवारीचा काळ...... म्हणून मी एक लेख लिहिला होता.... माझ्या जॉब शोधताना होणारया त्रासदायक अनुभवांबद्दल.....

त्यावेळी तुम्ही मायबोलीकरांनी- माझ्या आपल्या माणसांनी मला खूप धीर दिला होतात.....
तुमच्या सर्वांच्या पोस्ट्स वाचून मला खूप बरं वाटलं होतं........
पण तेंव्हा मी कॉलेजमध्ये होते...... या वर्षी ऑगस्ट मध्ये मी पासआऊट झाले..... मग सुरू झाला तो जीवघेणा खेळ..... रोज एक interview..... recession मुळं होणारं rejection..... आणि त्यामुळं खचत चाललेली मी......

पण आज सगळं संपलं......
Today I got JOB in reputed MNC in Pune......
YES!!!!! I HAVE DEFEATED RECESSION ON MY OWN!!!!!!!!!!!!!!!

या काळात खूप शिकले......
इथपर्यंत लढू शकले कारण घरच्यांनी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींनी दिलेला आधार..... दिलेली उमेद......

"हो.............
माझा निळा बासरीवाला आला....... HE CARES!!!!!!!!!!!!! HE IS THERE!!!!!!!!!!!"

तुम्हा मायबोलीकरांचे मनापासून आभार........!!!!!!!!!!!!

गुलमोहर: 

हार्दिक अभिनंदन साक्षी. सगळीकडे अश्याच यशस्वी होत रहा!!!
तुमच्या या अनुभवांवर एखादा लेख लिहीलात तर बाकीच्या विद्यार्थ्यांनापण तो भविष्यात मार्गदर्शक ठरेल.

व्वा! व्वा! तो निळा बासरीधारी या मा बो करांच्या आपुलकीमधे, प्रेमामधेच आहे कुठेतरी दडलेला. त्याचीच प्रचिती आहे तुम्हाला जे हवे ते मिळाले. हार्दिक अभिनंदन!
मा बो कुटुंब आणि कुटुंबियत्वाची भावना चिरायु होवो!

>>>>>> दर महिन्याला सेव्हींग करायला विसरु नकोस. स्मित
सगळ्ञात महत्वाचा सल्ला हे हा! Happy किमान दहा टक्के सेव्हीन्ग मस्ट! Happy
बाकी, अभिनन्दन जॉब बद्दल, शुभेच्छा

अभिनंदन साक्शी
>>पहिल्या नोकरीचा आनंद अविस्मरणीय असतो. साक्षी एन्जॉय कर हे क्षण. अभिनंदन
प्रयोगशी सहमत

अभिनंदन साक्षी...!!!
अवांतर : मिळालेल ते काम न समजता आवड म्हणुन जोपासा... लर्न टू एंजोय युवर जॉब... हे फार महत्वाच आहे.. "नोकरी"च "करीअर" करायच असेल तर आपल काम हे "काम" न वाटण फार महत्वाच आहे...!!!!
बाकी लोडस ऑफ लक टू यु !!!

तुझा तो लेख, आणि त्यावरचे मोलाचे सल्ले मला आठवतायत. सेव्हच करून ठेवलाय मी तो..
तुझे खूप अभिनंदन !!

हार्दिक अभिनंदन साक्षी Happy

आणि मी "campus recruitment आणि उमेदवारीचा काळ......" वाचले आता.. खरच खुप छान सल्ले दिलेत माबोकरांनी Happy

साक्षी,
आता नोकरीत रुळलीस की चांगली चांगली स्थळं (पर्यटनस्थळं) बघायला सुरवात कर आणि ठरलं (प्रवासाला जायचं) की मग आम्हा सगळ्या माबोकरांना त्याबद्दल जरूर कळव. Happy

अर्र! चुकून बोल्ड झाली वाटतं पोस्ट. बरं राहू दे. Wink

Pages