का करिता मम द्वेष?

Submitted by kalpana_053 on 21 December, 2009 - 06:34

का धरिला परदेश? या कवितेवरील विडंबन काव्य ..........

का करिता मम द्वेष?
सजणा, का करिता ममद्वेष?
आपण कैसे हिंडता भिरभिर
स्वैर फिरवा मलाही पळभर
सोडू उंबरठे, खर्चू पैसे
घेऊ प्रेयसीवेष?

ढंग न उरला बोली, चाली
बघती टाळू पोरीबाळी
संसाराचा काळही सरला
मुक्त करा मम क्लेश........

गुलमोहर: