ये गं हिरा, ये गं हिरा........

Submitted by kalpana_053 on 21 December, 2009 - 06:31

"ये रे घना ये रे घना...." या कवितेवरील विडंबन काव्य एका आज्जीने नातींच्या घरभर चालण्यार्‍या
खोड्यांवर म्हटलेले हे काव्य आहे.

ये गं हिरा, ये गं हिरा........ (मोलकरणीचे नांव)

ये गं हिरा, ये गं हिरा
झाडून काढ माझ्या घरा

नाती माझ्या द्वाड भारी
घरा मधे खोड्या करी
नको नको म्हणताना
केर करी घरभरा

पसरुनिया भातुकली
खेळणार खेळणार
नको नको म्हणताना
भांडीकुंडी घरभरा

नको नको किती म्हणू
खेळणार काऊ-चिऊ
खुणावतो पाहुण्यांचा
धाक मला रात्रभरा.......

गुलमोहर: 

मस्त आहे पण
नको नको किती म्हणू
खेळणार काऊ-चिऊ

नको नको किती म्हणू
खेळणार चिऊ - काऊ
मस्त यमक जुळेल