गारवा..!

Submitted by मी अभिजीत on 21 February, 2008 - 05:41

कुंद या हवेत दाटलाय गारवा..
मज तरी असा कुठे हवाय गारवा..

हे जळावरी कशास दाटले धुके,
रूप न्याहळीत गुंतलाय गारवा..

लोकरीत अंग सर्व झाकुनी कसा,
आज तो विचारतो कुठाय गारवा..

पांघरून शाल मी सुखात राहिलो
मज कुठे अजून झोंबलाय गारवा ?

रात चंद्रपावलात थांबली तिथे.
सोबतीस आज थांबलाय गारवा..

गारठून एकटे कशास जायचे ?
ये मिठीत बघ पळून जाय गारवा..!

-- अभिजीत दाते

गुलमोहर: 

गारठवून टाकले हो तुमच्या या गझलीने. हु...हु...हु..हु...

धुके आणि शाल हे शेर आवडले!

अभिजीत, च्।आनय गजल. धुके आणि शेवटला शेर खूप आवडला! (त्यातला जाय ह्या शब्दाच प्रयोग)

अभिजीत,
वेगळी, निसर्ग-कवितेसारखी गझल!
शाल, चंद्रपावलात खास!
जयन्ता५२