Submitted by निल्या on 15 December, 2009 - 15:43
(आज एक बातमी पाहिली TV9 वाहीनीवर मग रहावलेच नाही करुन टाकले विडंबन)
(मी पतंग उडवीत होते च्या चालीवर)
अरे बाबा मी फ़ाइल उडवीत होतो
चढाओडीने चढवीत होतो
अरे बाबा मी फ़ाइल उडवीत होतो
होता झकास सुटला वारा
होत्या फ़ाइल अकरा-बारा
आम्ही साट-लोट करीत होतो
फ़ाइल उडवीत होतो
काटाकाटीस आला रंग
फ़ाइल काटन्यात झालो मी दंग
फ़ाइलनेच फ़ाइल काटत होतो
फ़ाइल उडवीत होतो
माझ्या फ़ाइलचे वाजले बारा
एक फ़ाइल आली माघारा
चव्हाणांनी केला घोळ सारा
फ़ाइल उडवीत होतो
अरे बाबा मी फ़ाइल उडवीत होतो
-- निल्या
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
छान जमलीय; गुड टायमींग.
छान जमलीय; गुड टायमींग. "खुळ्या" हवेत "पतंग", राव चांगलीच बदवलीय.
(No subject)
मस्त
मस्त
मस्त...
मस्त...:D
ध्यनवाद! मित्रहो रात्री जरा
ध्यनवाद! मित्रहो
रात्री जरा टेन्स मधे होतो आन तो पंतग समोर आला मग काय दाबल्या कळा आन उडवला पंतग
आवड्लं रे. आता यावर नाच कोण
आवड्लं रे. आता यावर नाच कोण करेल?
(No subject)
TV9 वाहीनीवर नाच पण बघायला
TV9 वाहीनीवर नाच पण बघायला मिळेल आज चालु असेल नाचायचा कार्यक्रम
निल्या , जम्या रे जम्या! तु
निल्या :हाहा:,
जम्या रे जम्या!
तु ते अशा मोठा विडंबनकार व्हई जाशी रे भो!