टेंभुर्णी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

शेवग्याच्या शेंगाच्या झाडाला बर्‍याच जून जाड शेंगा दिसल्या वा बोराच्या झाडाला बरिच पिवळीधम्मक बोरे दिसली कि हमखास समजावे कि शेंगा आणि बोरे कडू आहेत. एरवी सहज हाताशी येणारे कुठलेच फ़ळ असे झाडावर रहात नाही.

tembhurnee1.jpg

हि फ़ळे बघितल्यावर मल पण आधी असेच वाटले होते कोल्हापुरला दाभोळकर कॉर्नर पासुन स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर, पनवेलच्या गार्डन होटेलच्या कोपर्‍यावर हि झाडे आहेत. आधी या झडात सीतेच्या अशोकाचाच भास होतो. पाने बहुतांशी तशीच. झाडही तसेच गच्च पर्णसंभाराचे.

झाडाची खरी ओळख पटते ती फळाफुलानीच.

tembhurnee.jpg

या झाडाला हि अशी फ़ुले दिसली आणि मग तो सीतेचा अशोक नाही हे लक्षात आले. मग ओळख पटली कि हि टेंभुर्णी.

जंगलात खुपदा हे झाड दिसते. याचे शास्त्रीय नाव Diospyros embryopteris संस्कृतमधे तिंदुक किंवा काकतिंदुक.
याची पाने काळसर असून जरा चमकही असते त्याना. या पानांच्या विड्या वळतात. शहरी भागात माहित नसली तरी याची फ़ळे खाता येतात, पण त्याचा गर घट्ट असतो, आणि कच्चे असताना फ़ळ कडवट तूरट लागते, पिकल्यावर गोडसर लागते. या फ़ळाचा गर संग्राहक असतो त्यामुळे अतिसारावर औषध म्हणुन देतात.

या झाडाची सालही छान तपकिरी रंगाची असते, विषमज्वर आणि दम्यावर या सालीचा उपयोग केला जातो.

मला खात्री नाही पण याच झाडाला एबोनी म्हणतात, असे वाटते, तसे असेल तर याच्या लाकडात सुंदर अशी अंगभूत नक्षी असते.

विषय: 
प्रकार: 

हे झाड. नेरूळला डि वाय पाटिल हॉस्पिटलच्या पार्कींगमध्ये असेच झाड पाहिलेले, मला पाहिल्यावर लगेच सीताअशोक वाटले. डिसेंबरमध्ये मी पाहिले तेव्हा याला बोराएवढ्या आकाराची पिवळी फळे लागली होती. आत लाल गर असेल बहुतेक कारण सालीच्या पिवळ्या रंगामधुन आतला लाल रंग दिसत होता. फोटोही घेतला मोबाइलवर तुम्हाला दाखवण्यासाठी, पण दुर्दैवाने घरचे नेट कनेक्शन चालत नाहीय नीट सध्या त्यामुळे पाठवता आला नाही.

याचे नाव ब्लॅक ऍंड व्हाइट एबोनी असे दिलेय नेटवर..