Submitted by गणेश भुते on 19 February, 2008 - 06:45
जवळ असताना अन् नसतानाही
माझ्या मनात असतेस तू
बहरातल्या मोहोरात भिजुनी
लाजुन गालात हसतेस तू
आसुसलेल्या प्रत्येक भेटीत
रोज नवी कळतेस तू
नाजुकशा वळणावर
मला सावरत वळतेस तू
सहवासातुनी प्राजक्ताचा
अखंड वर्षाव करतेस तू
बेरंगी आयुष्यात माझ्या
विवीध रंग भरतेस तू
सदा फुललेली जाई
कोमेजलेली नसतेस तू
क्षणाक्षणातच नव्हे तर
कणाकणात वसतेस तू
गुलमोहर:
शेअर करा