Submitted by मीन्वा on 18 February, 2008 - 06:19
तुझ्या येण्यानी विस्कटलीत,
वर्तमानाच्या छप्पराची काही कौलं !
मग त्यातूनच कधी तरी डोकावतात,
भूतकाळातील आठवणींचे खट्याळ कवडसे.
दिवस दिवस जातात,
कवडसे पकडण्याचा,
निरर्थक खेळ खेळण्यात ..
रात्र होताच,
तुझ्या आठवणींचे कवडसे,
चांदण्याचं रुप घेतात ..
भाजून काढते रात्र,
चालू राहतं अखंड,
तुझ्या आठवणींचं सत्र.
गुलमोहर:
शेअर करा
खास
मीनू मस्त..... सुरेख
visit http://milindchhatre.blogspot.com
कवडसे पकडण्याचा,
कवडसे पकडण्याचा,
निरर्थक खेळ खेळण्यात>> आवडलं
कवडसे
मस्त पडलेत..:)
मस्त मीनू
अप्रतिम कविता खुप आवडली
अहा....!
क्या बात है........ मस्तच गं ! आवडलेत तुझे कवडसे........ शेवट तर खासच.
मीनु...... तुला प्रत्यक्ष भेटल्यामुळे आता तुझी कविता जास्तच जवळची वाटायला लागलीये गं !
आय हाय! अतीव सुंदर!
मीनू, तुझे 'खट्याळ कवडसे' लाजवाब!
तुझ्या येण्याने विस्कटलीत वर्तमानाच्या छपराची .... काही कौलं!
ह्या कवितेच्या प्रत्येक वाचनात मी इथे थांबले....
पूर्ण कविताच सुंदर आहे..... कवडसे पकडण्याचा खेळ सगळेच खेळलोत आपण लहानपणी... किती निरर्थक तरी तासनतास जातील असा....
कवडशांकडे अशा दृष्टीने बघितलच नव्हतं कधी... आता प्रत्येक वेळी कवडसा दिसेल तेव्हा तुझे 'खट्याळ' कवडसे आठवतील....
कवडसे
कवडसे आवडले!! अप्रतिम!
मस्तच
कविता मस्त आहे मीनु!
कवडसे सुंदर!
मीनु, खूप छान आहे गं कविता.
धन्यवाद!
धन्यवाद सर्वांनाच!