सुतार पक्ष्याचा त्रास (Woodpecker Nuisance)

Submitted by अजय on 4 December, 2009 - 13:51

गेले काही दिवस आमच्या घरात (किंवा घराबाहेर) एका सुतार पक्षाशी लढाई करतो आहे. घराला लाकडाचे आवरण ( wood siding) आहे आणि आठवड्याला एक अशी ६-८ मोठ्या संत्र्याच्या/छोट्या नारळाच्या आकाराची भगदाडे पाडून ठेवली आहे. दर आठवड्यात कुठे नवीन भगदाड आहे ते शोधणे आणि आणि ते बुजवणे हा मोठा वैताग झाला आहे. कबुतरे आणि खारींचा त्रास होई नये म्हणून अगोदरच्या मालकाने काही चांगल्या सोयी केल्या आहेत पण त्याचा या पक्षावर काहीही फरक पडत नाहीये. आणि तोच सुतार पक्षी आहे कारण त्याला बर्‍याच वेळा हाकललं आहे.

या घटनेवर सहज कार्टून तयार होईल.

इंटरनेटवर शोधाशोध करून काही माहिती मिळवलीय. सुतारपक्षांना पकडणे किंवा मारणे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यातून तुरुंगात जावे लागू शकते. सुतारपक्षी अतिशय मालकीहक्क गाजवणारे असतात म्हणे (Territorial ownweship). एकदा त्याना घर आवडले की त्यांना ते त्यांचे वाटते आणि ते दुसर्‍या पक्षाला येऊ देत नाहीत. हा पक्षी थंडीत राहण्यासाठी घर करतो आहे. मला आवडणारे सगळे घटक (घराचा रंग, झाडी) हे सुतार पक्षांना आवडतात असेही या शोधातून कळाले त्यामुळे आमचे घर सुतारपक्षांच्या त्रासासाठी High Risk आहे. सुतारपक्षांना आवडणारी कीड घराला लागलेली नाही असे सध्यातरी दिसतेय.

नेटवर यासाठी चमकती टेप, स्प्रे, घुबडाचे डोळे असलेले फुगे, घाणेरड्या चवीचे रंग (सुतार पक्षाच्या), घाबरवणारा कोळी, माणसांना ऐकू न येणारे कर्कश आवाज करणारे भोंगे असे अनेक उपाय उपलब्ध आहेत.

माहिती पुष्कळ झाली आहे. नेटवरच्या अभिप्रायांमधे कुणी एक उपाय करा पण दुसरा कामाचा नाही असे म्हणतो तर दुसरा हा नको तो करा म्हणतोय. मायबोलीकरांपैकी कुणाला यातले उपाय करायची गरज पडली आहे का? कुठला उपाय रामबाण ठरला?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड गोंडस वगैरे वाटणारा ससा चावल्याचं कोणी ऐकलं आहे का?
मी मिलवॉकीला असताना माझ्या शेजार्‍याच्या मुलीला चक्कं ससा चावला होता हाताला. रक्ताची धार लागेपर्यंत!

मला महादेवी वर्मांच्या 'दुर्मुख' ची आठवण झाली!

सश्याचं तेवढंच एक प्रतिकाराचं अस्त्र असतं. चांगला कचकचून चावू शकतो. कुठलाही प्राणी (पाळीव किंवा न पाळलेला) आपण गोंडस वगैरे म्हणतो ते आपलं 'परसेप्शन' असतं. त्यांना नाही ना कळत की आपल्याला गोड गोंडस म्हणतात तेव्हा इजा करायला नको Wink

वरदा happy.gif

तुमचं म्हणणं बव्हंशी खरं असलं, तरी ससा हा तसा अतिशय भित्रा असतो. सामान्यतः माणसाला पाहून तो पळ काढतो. त्यामुळे 'ससा चावला' हा प्रकार नवीनच होता.

एकतर इथे बॅकयार्डात येणारे ससे पांढरेव्हाइट्ट बनी नसतात. ब्राउन ससे असतात. त्यांनाही रेबीजसारखे रोग असू शकतात असं वाचलं होतं, तेव्हा त्यांच्या फार लाडात येऊ नये.

.

आमच्याकडे मेथिचे वाफे लावले होते, त्याला चिकन फेन्स ही होत तर खालुन बारिक बिळ करुन बारिक काहितरी आत घुसुन काही पान खात होत्,शिवाय चिमण्याही पान खायच्या त्यावर एक सोपा उपाय लागु पडला, डॉलर स्टोअर मधुन काही बलुन पॉप करुन आणुन मेथिच्या आजबाजुला बान्धले..आणी ते वर्क झाल, शिवाय जो-अ‍ॅन मधे ५ $ ला एक बुजगावण मिळाल तेही ईफेक्टिव्ह ठरल..

सध्या आमच्या घराच्या कौलातुन आत जाऊन कोणतेतरी पक्षी आतले फोम/इनसुलिन काढुन आसपास फेकताहेत...

ते आत कसे जातात हेच कळत नाहीये.

परवा इकडे सदर्न कॅलिफॉर्नियात, एका घराच्या पूलमध्ये अस्वल शिरले होते. घरमालक सहज पूलपाशी गेला तर अस्वल मजेत डुंबतंय, खेळतंय. (सध्या उन्हाळा फार आहे.) त्या मालकाने अस्वलाला चांगले खेळू दिले पाण्यात १०-१५ मिनिटं (म्हणे ही वॉज हॅविंग फन इन द वॉटर!) अन मग फोन केला (कोणाला ते नाही आठवत आता.. )

बघ ना... असा वैताग झालाय डोक्याला.. बरदिवसभरात काहीच आवाज नसतो फक्त सकाळी ८ च्या दरम्यान आवाज येतो.

पुन्हा एकदा आमच्या परसदारी डेकला सपोर्टिंग लाकडावर सुताराने तास्संपट्टी सुरू केली आहे.ॲल्यु. फाॅच्या चकचकीत पट्टया लटकवणे काम केलंय. लेटस सी.
बाकी नाही पण पहाटे विनागजर उठून लवकर कामं सुरू करता येतात. आमची बच्चे कंपनी मात्र घोडे बेचके कशी काय झोपलेली असतात काय माहीत Uhoh त्या निमित्ताने धागा आठवला Happy

Mating season मध्ये रॉबीन चा खिडकी वर धडका मारणे हा त्रास असतो.
गेल्या महिन्यात आम्ही हा त्रास आठ दिवस सहन केला! Non-stop!

आमच्या इकडे black tree snakes नि उच्छाद मांडला आहे, सगळीकडे फिरत असतात. २ -३ वेळा मीच हाताने उचलून झाडीत सोडून आलो आहे Happy

हरणं मात्र येऊन शांतपणे चरून निघून जातात

@कटप्पा - होय भारतात असतांना मी साप rescue करायचो त्यामुळे साप हाताळायची माहिती आहे, तसे हे साप बिनविषारी आहेत त्यामुळे एका मोठ्या काठीने काम होते. सहसा सगळ्याच सापांचा (rattle snake सोडून ) पहिला पवित्रा हा पळून जाण्याचा असतो त्यामुळे बरेचदा काम सोपे होते.

'हार्वेस्ट मुन- अ विस्कॉन्सिन आऊटडोअर अँथॉलॉजी' हे एक मस्त पुस्तक आहे. मी अनेकांना हे भेट देउन झालेलं आहे. यात एक अशीच सुतार पक्ष्याची खूप विनोदी कथा आहे. जर पुस्तक सापडलं तर इथे भाषांतर करुन टाकेन.

Pages