भैया हलेना

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

भैया हलेना भैया चालेना
भैया खंत करी काही केल्या परतेना

गेले 'जोगेश्वरी' च्या गोठी
म्हटली म्हशींसवे गाणी
आम्ही दूधात पाणी मिळवून रे

आले सप च्या मनी
अबू बरळला जनी
राजास पाहून गळाले हातपाय रे

हा तर संजय निरूपम
करी जिवाची तगमग
म्हणे राहू आपण दोघे जण रे.

चल ये रे मूलायमा
घालू आपण छट पूजा
लाठया काठ्यांनी करू दांडगाई रे

अमर सिंगाचे किडे
ह्यांचे लक्ष मतांकडे
आपण करू एकगठ्ठा मतदान रे

भैया फूली (xxx) आला खूलून
गेल्या सर्व दिशा आटून
इथे भैया मग कुठे मुंबईकर रे.

विषय: 
प्रकार: 

:D!! :D!!

म्हटली म्हशींसवे गाणी
आम्ही दूधात पाणी मिळवून रे

सही केदार

चल ये रे मूलायमा
घालू आपण छट पूजा
लाठया काठ्यांनी करू दांडगाई रे

सही आहे. लोल.

कल्पना सॉल्लिड आहे. आणि चाफा बोलेना च्या चालीवर तर अगदी फिट.
(रहावत नाही म्हणून : कडव्यातली यमकं जुळत नाहीयेत पण अर्थ व्यवस्थित असल्यामुळं खटकत नाहीये)
एकूण काय, लगे रहो भय्या Happy

मस्त हहपुवा झाल.... येउ देत अजुन.. जोगेश्वरी ,मुलयम, अबु, संजय सगलच मस्त

केदार मस्त..

मूळ गाण्याची लिंक दे रे म्हणजे अजून मजा येईल वाचायला...

visit http://milindchhatre.blogspot.com

धन्यवाद आय टी, अमोल, केदार, संघमित्रा, सत्या आणि मिल्या दादा.

केदार क्या बात है!!
लईच भारी!!

मस्त जमलय केदार.
यावर्षी छटपुजेला जुहुला प्रचंड गोंधळ झाला होता. त्यावेळीच काहितरी होणार असे वाटले होते.

धन्यवाद किशोर आणि दिनेशदा!!!

छान आहे... मी आज वाचले.

सही आहे Happy

  • *** Intaxication: Euphoria after getting an income tax refund, which lasts until you realize that it was your money in the first place. ***

धन्यवाद गजानन,स्लर्टी आणि दाद Happy