"राज"द्रोह

Submitted by malhaari on 16 February, 2008 - 04:33

इये मर्हाटीयेचे नगरित चार एक रोजां पासुन पुंडावा माजलेला आहे. या झगड्यात मर्हाटी मानसाचे आतोनात हाल होत आहेत. हे पाहुन आमचिया काळजाला भोके पडत आहेत.मुघलि सत्तांनी सुद्धा एवढा गदारोळ करविला नव्हता.या पुंडाव्याच्या मागे मनसेना प्रमुख श्री राजभाई यांचा हात आहे असे सर्व जानकारांचे मत आहे.तयांच्या म्हणण्यानुसार राजभाईंनी कोकण यात्रेत 'छट' पुजे विषयी निंद करुन उत्तरप्रदेश्स्थांच्या पन्चस हात घातला.आपल्या बांधवांचा पन्चा सावरत श्री अबु आझमी यांनि राजभाई विरुध्द तोफ दागलि.त्यांनी राजभाई विरुध्द अव्राच्य भाषणे सुरु केली. तसेच राजजिंनी त्यांच्या विरुध्द बाह्या सावरल्या.दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी जाहली.राज्भाईंच्या विरोधतिल वक्तव्ये मनसेच्या पाईक असलेल्या शिपायांच्या कानात गरम शिश्यासारखे तळापर्यंत गेले आनि त्यांच्या मेंदु वरिल ताबा सुटला.त्यानि इये मह्राटियेचे नगरित उत्तरप्रदेशस्थांच्या भागात जाळ्पोळ सुरु केली. या कारणास्तव उत्तरप्रदेशस्थ व त्यान्चे लागेबांधे असलेल्यांनी त्यान्च्या अटकेचि दरखास्त केली. ति अनइक पदश्रेष्ठिंनि मान्य केली.त्यान्च्या दबाव तन्त्राने दबुन जाउन नगरिचिये ग्रुह अमात्य श्री आरार पाटिल यांनि तातडीचि सभा बोलाउन सेनापति , शिलेदार यान्च्यासह बराच उहापोह केला.त्याअंति राजभाईंच्या अटकेवर शिक्कामोर्तब केले.हि खबर संपुर्ण मर्हाटियेचे नगरित वार्‍याच्या वेगाने पसरली.(अर्थात यात दुरचित्रवाणि खबर्यांचि वार्‍याला बरिचशि साथ लाभली.
राज्भाइंना अटक होनार म्हणुन मुंम्बापुरित कडेकोट बंदोबस्त होता. 'राज्'वाद्याकडे जाणारे सगळे मार्ग बंद करन्यात आले.त्यावर कुमकि तैनात करन्यात आल्या.तद नंतर राजभाईंच्या अटकेचे लुटुपुटूचे नाटक पार पडले.या नटकानंतर मुंम्बापुरित आग्डोंब उसळला.पुने, ओंरंगाबादेत नाशकात ठ्ळकपने उमटले.सर्व मर्हाटि जनांनी भैय्ये बडाव आंदोलन सुरु केले.दिसला भैय्या कि मार असा लढा त्यानि आरंभ केला.अगदि त्यांच्या घरि जाउन त्यांना चोप दिला.उत्तरप्रदेशस्थ सरकारकडुन मर्हाटि सरकारवर टिकेचि झोड उठली.त्यास्तव मर्हाटि नगरिचे मुख्य आमात्य श्री विलासरावजी देशमुख यांनि उत्तरप्रदेश वासियांना संरक्षन देन्याचे कबुल केले.त्यावर सरकारने मनसेच्या शिपयांना अटक करन्यास सुरुवात केली आणि त्वरित त्यांचि सुटका केली.अशा प्रकारे त्यांनि आपला शब्द पाळुन मर्हाटि नगरिचि शान राखली.विलासरावांनी केलेल्या राज्द्रोहाच्या प्रतिक्रिये बद्दल अनेकांनि कानावर हात ठेवले.
राजभाईनि केलेले कार्य किति महान आहे हे कोनाच्या मानात कसे आले नाहि.त्यांनी उत्तरप्रदेशस्थांचि चाललेली दादागिरि सम्पुश्टात आणली.त्यांचे वाढते प्रस्थ झाकोळले गेले.त्यान्ची चलति जरा कामी जाहली.त्यांनि मर्हाटि मानसांच्या मानास हात घातला.परतु काहि जातभाई त्यांच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत.त्यांच्यात राजभाईंचे जेष्ठ बंधु श्री उध्दव ठाकरे यांचा प्रामुख्याने सामावेश आहे. त्यांचे म्हणनेनुसार हे शिवसेना पाडावासाठिचे 'राज'कारण आहे. त्यांचे बोल असे कि "आमचा विरोध उत्तरप्रदेश वासियांना नाहि,तर मर्हाटि न जाणनार्‍यांना आहे."(असे असल्यास उत्तरप्रदेशात मर्हाटिचे वर्ग काढावे लागतिल,नंतर त्यांचि चाचणि घेउन त्यांना मर्हाटि नगरित प्रवेश द्यावा लागेल.)उद्धवजिंनि मर्हाटियेचे प्रेमा पाईसाई बाबांच्या नगरितिल फलकांना काळे फासले.त्या घटनेत त्यांच्या शिलेदरांना व शिपायांना अटक जाहली.त्यांचि अमर्हाटि विरोधाचि लढाई एका दिवसातच अस्त पावली.
परन्तु येनर्‍ केन आमचिया मर्हाटि नगरिचि जैविक ,आर्थिक नुकसान जाहलि.त्यात आमचा नाशकातला खंदा विर विनाकारन मारला गेला.त्यावर बारिच धरपकद जाहलि.राजभाईंच्या प्रयत्नांना थोडे का होईना येश आले. आगगाड्यांचि स्थानके उत्तरप्रदेशवासियांनी तुडुंब भरली.अनईक आगगाड्या भरुन वाहु लागल्या.त्यामुळे त्यांचा मर्हाटि नगरिकडे पाहन्याचा द्रुष्टिकोन बदलला जाईल अशि ईच्छा.परंतु दु:ख एकच वाटते कि आमच्या माणसाने टकलेला डाव आमच्यावरच उलटला,पाय आमचाचि तुटला,वाटोळे आमचेचि जाहले.पन तयाचे राजभाईंना सुख दु:ख वाटते का नाहि हे त्या 'श्रीं'नाच ठाउक.

;

गुलमोहर: