Submitted by जयन्ता५२ on 27 November, 2009 - 13:41
बरा वागतो जमेल तेंव्हा
खरे बोलतो जमेल तेंव्हा
हवे सर्व ते घरात आहे
तरी चोरतो जमेल तेंव्हा
असे चूक सर्वथा तरीही
तिला भेटतो जमेल तेंव्हा
मला माळ ओढणे जमेना
फुले वाहतो जमेल तेंव्हा
कसा आज झोपडीत,देवा?
"म्हणे राहतो जमेल तेंव्हा"
खुळी जिंदगी सुसाट धावे
कधी गाठतो जमेल तेंव्हा
--------------------------------------------------
जयन्ता५२
(इतरत्र प्रकाशित )
गुलमोहर:
शेअर करा
थोडी प्रस्तावना: ऑगस्ट
थोडी प्रस्तावना: ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांच्या निवडीसंदर्भात जो वाद झाला त्यामुळे दुखावल्यामुळे मध्यंतरी काही काळ मी मायबोली वर न लिहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दरम्यानच्या काळात अनेक मायबोलीकरांनी प्रतिसादाद्वारे,फोन करून व वैयक्तिक भेटीतून मला माबो वर परत येण्याची मनापासून विनंती केली. हे त्यांच्या प्रेमाचे,स्नेहाचे प्रतीक आहे. मी स्वतः माबो पासून दूर झाल्याने व्यथित होतोच. कविता लिहायला,वाचायला व प्रतिसाद द्यायला कुठल्याही कारणामुळे झालेला प्रतिबंध यासारखे दु:ख नाही. साहित्यिक वादात आपले मत मांडताना संयम सुटू देऊ नये ही खबरदारी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. जसा शेवटी पुन्हा लिहायचा निर्णय घेतांना आनंद होत आहे तसेच काही काळ मी मायबोली वर न लिहण्याचा निर्णयही त्यावेळी योग्यच होता हेही नम्रपणे नमूद करावेसे वाटते. माझ्या मनात कसलाच किंतु नाही व इतर कुणाच्याही मनात नसेलच याची खात्री आहे.असो.(..."तुम मुझे दिलसे पुकारके तो देखो मै कोई गया वक्त नही जो लौटके न आऊंगा... अशा अर्थाचा एक शेर आठवतो आहे.)
नवी गझल पेश करीत आहे. परखड दाद यावी.
माबो अॅडमिनला विनंती.
या पुढे मला कुठल्याच परीक्षण मंडळावर घेऊ नये.
जयन्ता५२
मला माळ ओढणे जमेना फुले वाहतो
मला माळ ओढणे जमेना
फुले वाहतो जमेल तेंव्हा
कसा आज झोपडीत,देवा?
"म्हणे राहतो जमेल तेंव्हा"
वा! सही गझल!
खुळी जिंदगी सुसाट धावे कधी
खुळी जिंदगी सुसाट धावे
कधी गाठतो जमेल तेंव्हा
सुंदर शेर.
(प्रस्तावनेतील प्रांजळपणाही आवडला).
वा... दोन्ही गोष्टींसाठी. या
वा...
दोन्ही गोष्टींसाठी. या गझलेसाठीही आणि समंजस निर्णय घेऊन येथे परत लिहिते झाल्याबद्दलही.
ओह्ह.. खुप छान.. गझल अन
ओह्ह.. खुप छान.. गझल अन तुमचे पुनरागमन.. दोन्ही..
मेहरबां हो के बुला लो मुझे चाहो जिस वक्त..
मै गया वक्त नही हू, के फिर आ भी न सकु...
हा शेर ना? गया वक्त तो नही आता.. मगर सच्चे दोस्त ( मायबोलिकर) जरुर आते है..
खुळी जिंदगी सुसाट धावे कधी
खुळी जिंदगी सुसाट धावे
कधी गाठतो जमेल तेंव्हा
हा आवडला...
खुळी जिंदगी.. आवडलं.
खुळी जिंदगी.. आवडलं.
धन्यवाद जयंतजी परत
धन्यवाद जयंतजी परत आल्याबद्दल. खुप मोठे ओझे उतरल्यासारखे वाटतेय मनावरचे. तुम्ही जेव्हढे नसेल मिस केले मा बो ला त्याहून कितीतरी जास्त आम्ही तुम्हाला मिस केलेय.
जोपर्यंत मा बो आहे तोपर्यंत तुम्ही असेच सूर्यचंद्रासारखे तळपत रहाल.
बाकी या गझलेबद्दल काय बोलायचे?
बरा वागतो जमेल तेंव्हा
खरे बोलतो जमेल तेंव्हा
असे चूक सर्वथा तरीही
तिला भेटतो जमेल तेंव्हा>>>>>
यातच सगळे काही आले! खास जयंता टच.
जयंत, आवडलीच... छोट्या बहरात
जयंत, आवडलीच... छोट्या बहरात लिहिणं सोप्पं नाही... माझ्यासारख्या शब्दाच्या फापटपसारावाल्यांना तर लई आवगड कामगत....
मस्त ग़ज़ल!! शरद
मस्त ग़ज़ल!!
शरद
हुश्श ! जयंतदा आता पुन्हा
हुश्श ! जयंतदा आता पुन्हा निघून जाण्याची भाषा करू नका, नायतर आमच्याशी गाठ आहे.
बाकी गझलेबद्दल मी काय बोलणार.... खुपच छान आहे.
हवे सर्व ते घरात आहे तरी
हवे सर्व ते घरात आहे
तरी चोरतो जमेल तेंव्हा >>>
आवडली गजल !
मंडळी, सर्वांना
मंडळी,
सर्वांना धन्यवाद!
जयन्ता५२
उत्तम... नेहेमीसारखीच !!!!
उत्तम... नेहेमीसारखीच !!!!