वाटा....!!!!

Submitted by vicky_ahire on 14 February, 2008 - 17:22

कोणास कधी कळतात वाटा
वेड्या कोठून कश्या वळतात वाटा।

एकाकी आयुष्य ठेवुन आठवण्णिंना
सोडूनी हातात कधी पळतात वाटा।

पाहीले मी, सरणावर स्वप्न होते
जाळूनी स्वप्न अश्या जळतात वाटा।

पाहूनी त्या वळणावर आसवांना,
काळोखाआड कधी गळतात वाटा।

कोणी बोले दुनिया तर गोल आहे
फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा?

तीही सोडून मला वळनात गेली
तीच्या वाचून मला छळतात वाटा।

हो येथेच सुरवात, इथेच अंत
कीती प्रवास असे गिळतात वाटा........

गुलमोहर: 

कोणी बोले दुनिया तर गोल आहे
फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा?
अगदी खरयं. जिंदगिके सफरमे गुजर जाते हे जो मकाम वो फिर नही आते.......बादमे फिर भेजो हजारो सलाम्...वो फिर नही आते.....

विकी, कविता छान आहे.
मल आवडलेल्या ओळी -
हो येथेच सुरवात, इथेच अंत
कीती प्रवास असे गिळतात वाटा........

लिहिते रहा, चांगलं लिहिताय!

विकी अहिरे...
एकेक ओळ सुंदर आहे...

दीपिका जोशी 'संध्या'