सांगा कस मागायच?

Submitted by shashank pratapwar on 25 November, 2009 - 23:00

सांगा कस मागायच?

सांगा कस मागायच?
दबत दबत का दे रे म्हणत..
तुम्हीचं ठरवा!

टेंडर भरुन तुमची आठवण,
कोणीतरी काढतंच ना?
कोर्‍या कोर्‍या काही नोटा,
तुमच्यासाठी आणतोच ना?

आणखी मागत बसायच की धन्यवाद म्हणुन करायच..
तुम्हीचं ठरवा!

मंदीच्या गर्द काळोखात,
जेव्हा काहीच मिळत नसत,
तुमच्यासाठी कोणीतरी,
बंडल घेउन उभ असत.
तोंडावर फेकायच की खिशात टाकायच
तुम्हीचं ठरवा!

क्षणात पैसे खर्चुन जातात,
हे मात्र खर असत,
सरळ वागुन कमवता येतात,
हे काही खर नसत.
खर्चामध्ये झुरायच का वाकड्यात शिरुन कमवायच..
तुम्हीचं ठरवा!

इमान अर्धा मेला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
माणुस थोडा उरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
मेला आहे म्हणायचं की उरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस मागायच?
दबत दबत का दे रे म्हणत..
तुम्हीचं ठरवा!

- शशांक प्रतापवार

गुलमोहर: 

हल्ली दबत-दबत कोणी मागत नाहित. दे देच जास्त चालते. मागताना लाचखोरीपेक्षा हक्काचीच भावना दिसते. असो विडम्बन छान.