स्वच्छता पाळा

Submitted by ShantanuG on 14 February, 2008 - 09:52

सगळीकडे धूळ बघून निसर्गावर दया येते .मी लो़कांना सांगू इच्छितो की 'स्वच्छता पाळा'.

सर्वत्र स्वच्छतेचे नियम पाळा.
खरच सांगतो प्रदूषण टाळा.

जेव्हा आजी म्हणते,"कचरा नको फेकूस बाळा."
तेव्हा नातू करतो काहीतरी चाळा.

नेहमी शुद्ध ठेवा पर्यावरण.
नाहीतर वेळ नाही लागणार यायला मरण.

करा स्वच्छतेचे नेहमी नामस्मरण.
कशावर ठेवा आपले डोके,एकच उत्तर स्वच्छतेचे चरण.

संत गाडगेबाबांचे समोर उदाहरण.
स्वत:च लावा स्वत:ला वळण.

मदत करा संपूर्ण प्रुथ्वीची,स्वच्छतेसाठी गाळा घाम.
नाहीतर वाईटच होतील ह्याचे परिणाम.

सांगतो नका करू आळशीपणा.
जागे व्हा,चला,वाजला आहे लढाईचा घणघणा.

पुन्हा म्हणतो स्वच्छतेचे नियम पाळा.
परत सांगतो प्रदूषण टाळा,प्रदूषण टाळा.

-शंतनु श. घारपुरे

गुलमोहर: 

शंतनु मित्रा चांगलाच संदेश दिला आहे तु आम्हा मायबोलीकरांना. खरोखर तुझ्या कवितेमुळे अंगात स्वच्छता पाळण्यासाठी नविन उत्साह आला.
सुंदर. कविता लिही परंतु अभ्यास संभाळून.