झाड

Submitted by पल्ली on 12 February, 2008 - 07:17

झाड गलबलुन जातं
जेव्हा वारा त्याला
अलगद जवळ घेउन
गालातल्या गालात हसतो...
झाड गहीवरतं जेव्हा
पावसाच्या धारा त्याला
न्हाउ माखु घालतात....
झाड प्रसन्न हसतं जेव्हा
सकाळचं सोनेरी उन
त्याला हळुच मिठीत घेतं....
फांदी फांदीवर झाडाच्या
किरणांची उबदार शाल
हळुवार लपेटुन घेताना
पानापानातुन ते सावरतं..
धुक्याचा कापुस उंचावतो
तेव्हा झाड संकोचतं
रुसलेल्या पिलासारखं
मिटुन जातं....
झाड गर्वानं फुगतं
जेव्हा मोहोर बहरतो
राधेसारखं नादावतं
जेव्हा वसंत रुतु
फुलांचे गुच्छ घेउन येतो...
झाड उदास मुकं होतं
जेव्हा कुणीतरी
झाडाखाली बसुन आसू गाळतं..
सावलीच्या गारव्यानं
पाठीवर डोक्यावर मायेनं हात धरतं,
झाड तेव्हा
आईसारखं मायाळु वाटतं!

गुलमोहर: 

छानच. झाडांवरच फळ आपण तोडतो तेव्हा काय वाटत असेल झाडाला?

मी पान सुद्हा तोडत नाही, गजरा माळत नाही...सुईवर टोचुन घेतलेल्या फुलांचे ते निष्प्राण देह कसे रे घ्यायचे डोकयावर? मी शाकाहारी आहे, भाजिपाला खाणारी. ते सुद्धा खटकतं.
जय जगदीशचंद्र बोस....