मराठी दणका .....

Submitted by Kishore R. Mundhe on 12 February, 2008 - 03:19

खूप सहन केली
मराठी माणसाची व्यथा
आता या परप्रांतियांच्या
कमरेत घाला लाथा...

तुम्ही दिडदमडीचे लोक
आम्हाला काय शिकवता देशभक्ती
ब्रिटीशांच्या विरुदध लढली
सर्वात जास्त मराठीशक्ती...

खबरदार जर केली
नजर जरादेखील करडी
तर उगारलेल्या काठीवरच
बांधू आम्ही तुमची तिरडी...

भारत देशासाठी सतत
बलिदानास तयार मराठी
आमच्याच घरात घुसुन धमकवाल
तर बसेल डोक्यात काठी...

तुमची मात्रुभाषा असो कोणतीही
तुमचे कर्तव्य ईथली संस्क्रुती जपणे
येथे तुम्ही मराठीचा आदर करा
एवढेच आहे मराठी माणसाचे म्हणणे...

मुंबई .... मराठी मनांची

गुलमोहर: 

मस्त आहे 'किशॉर काका' .'मराठी माणसा जागा हो !'

किशोक काका कविता छान.

पण खरच मारामा-या करुन आपली संस्क्रुती जपता येईल? की मारामा-या हिच आपली संस्कृती?
काचा फोडुन, गाव पेटवुन काय उपयोग. शिवचरित्र्याचा येवढा अभ्यास असणा-या राजनी गमिनी कावा विसरावा ..खंत वाटली, मराठी माणसा जागा हो....
दुस-यांन मुळे आपल्याच घरात कलह, त्रास आपल्यालाच..

माझी कॉमेन्ट चोरलीस , टिलकश्री . कोर्टात केस करीन हो ! कॉपीरायटेड आहे हो!!!!!

असंच जर अमेरिकेतील स्थानिक लोक म्हणतील तर इतक्या संख्येने अमेरिकेत असलेल्या आपल्या लोकांचं काय होईल? थोड्या वर्षांपुर्वी UK मधे pink elephant move झाली होती asian contractors च्या against. तेंव्हा आपण company's cost effectivenss ला महत्व आहे असं म्हणत होतो. कमी दरात काम करणं हा UP /Bihar वाल्यांचा USP आहे... तेंव्हा आता आपण फक्तं on the other side of the table आहोत...