मायबोलीचे अनंत उपकार
माझ्या वैवाहिक आयुष्यातील एका वादळाची चर्चा मी मायबोलीवर साधारण सहा सात वर्षांपुर्वी केली होती. आता ते लेखन सापडत नाही पण जुन्या मायबोलीकराना ते स्मरत असेलच.
दिनांक १५.११.२००७ रोजी त्या वादळाची सांगता झाली. मे. न्यायालयाने आम्हा सर्वांची म्हणजे मी, माझे दिवंगत वडील, माझी आई, मा़झी मोठी बहीण, मेहुणे, मोठा भाउ, वहीनी सर्वांची निर्दोष सुटका केली. निकाल दिल्यावर मला शक्य तितक्या मायबोलीकरांशी प्रत्यक्ष संपर्क साधून हि बातमी दिलीच होती. या निकालपत्राची प्रत आता हाती आल्याने मी त्यासंबंधी माझ्या भावना इथे व्यक्त करीत आहे.
सरकार पक्ष म्हणजेच फिर्यादी माझी पत्नी यानी केलेल्या कुठल्याच आरोपात मे. न्यायालयाला तथ्य आढळले नाही. फिर्यादी, तपास अधिकारी व साक्षीदार यांच्या जबानी न्यायालयाला विश्वासार्ह वाटल्या नाहीत. तसा स्पष्ट निर्देश मे. न्यायालयाने आपल्या निकालपत्रात केला आहे. उपलब्ध पुराव्यावरून माझ्या स्वच्छ चारित्र्याचा निर्वाळा मे. न्यायालयाने दिला आहे.
फिर्यादीने दाखल केलेले पुरावे मे. न्यायालयाला विश्वासार्ह तर वाटले नाहीतच त्या व्यतीरिक्त ती कागदपत्रे बनावट असल्याचे मत मे. न्यायालयाने व्यक्त केले आहे.
याच दरम्यान मे. न्यायालयाच्या असेही निदर्शनास आले कि फिर्यादी स्वतःच आर्थिक गुन्हेगार असून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने एक गुंतवणुक कंपनी सुरु करुन तिने अनेक लोकाना करोडो रुपयांना गंडवले आहे. त्याबाबत ती आणि तिचे साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
माझ्या या लेखनानंतर मला मायबोली आणि मायबोलीकर यांचे निरपेक्ष प्रेम लाभले. माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला. अनेक मायबोलीकरांशी मला वैयक्तिक नाते जोडता आले. केवळ मायबोलीकरच नव्हेत तर त्यांच्या कुटुंबीयानीदेखील मला आपले मानले. या बळावरच मी या वादळाशी साडेसात वर्षे झुंज दिली.
हा आधार मला मिळाला नसता तर काय झाले असते याची कल्पनादेखील मला करवत नाही.
कोरडे आभार मानून मला या कर्जातून मुक्त व्हायचे नाही. तसा विचारही मी करणार नाही. या निमित्ताने यापुढेही मायबोलीसाठि जे करता येईल ते करत राहण्याचे वचन देतोय तसेच कुणाला या बाबतीत जास्त चर्चा करायची असेल वा सल्ला हवा असेल तर त्यासाठी मी उपलब्ध असेन, असे जाहीर करतोय.
या बदल्यात मागणे एकच.
हे प्रेम मला आयुष्यभर लाभो.
आपलाच,
दिनेश.
अभिनंदन दिनेशदा
अभिनंदन दिनेशदा
दिनेशदा , चल साडेसाती संपली
दिनेशदा , चल साडेसाती संपली आता , पुढील सुखद आयुष्याकरीता लाखभर शुभेच्छा .
दिनेशदा अभीनंदन आणि शुभेच्छा
दिनेशदा
अभीनंदन आणि शुभेच्छा
... तुमचा कडु अनुभव मी वाचलेला नाही पण साडे सात वर्षे तुम्ही लढा दिला यावरुन तुम्ही कश्या कश्यातुन गेला असाल आणि तुमच्या त्रासाचा अंदाज येऊ शकतो!!!
अभिनंदन , आधीपासूनच मी
अभिनंदन ,
आधीपासूनच मी तुमच्या लेखनाचा व व्यासंगाचा चाहता आहे.
कामानिमित्त परदेशी फिरताना एखादे अनोळखी फळ/भाजी दिसले की मनात विचार येई की याचा फोटो माबोवर टाकला तर दिनेश त्याची माहिती देतीलच, वर त्याची एखादी रेसिपीही लिहितील.
पुजीशु !
दिनेश, एवढ्या मोठ्या काळात
दिनेश, एवढ्या मोठ्या काळात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून निर्णय घेतलेत, आयुष्याकडे बघण्याची रसिकता जोपासलीत.. खरंच खूप कौतुकास्पद आहे! आता पूर्वीपेक्षा भरभरून आयुष्य जगायची उर्मी मिळो! शुभं भवतु..
दिनेशदा, कोणाच्याच रंगीबेरंगी
दिनेशदा, कोणाच्याच रंगीबेरंगी मधे कधी फारसा डोकावलो नव्हतो.
तुमचा पाककृतींमधला निर्विवाद अधिकार माहित असल्याने आज सहज तुमची रंगीबेरंगी पाने चाळत असता हे सापडले.
तुम्हाला जे सोसावे लागले ते मी या आधी वाचले आहे. त्यामुळे मला तुमच्यावरील आरोपांचा अंत होऊन तुम्ही निर्दोष सिद्ध झाल्याचे कळाल्यावर मनःपुर्वक आनंद वाटला.
तुमच्या ज्ञानाचे, चतुरस्त्र स्वभावाचे, तसेच असलेले ज्ञान कोणत्याही गर्वाशिवाय सर्वांना सोपे करून सांगण्याची जी कला आहे त्याचे मला नेहेमीच आदरमिश्रित कौतुक वाटत आले आहे. खरेतर तुमचेच मायबोलीकरांवर अगणित उपकार आहेत.
तुमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
साडेसात वर्षे म्हणजे साडेसाती
साडेसात वर्षे म्हणजे साडेसाती होती तुम्हाला.
अरेच्चा.. या प्रकरणाची जराही
अरेच्चा.. या प्रकरणाची जराही कल्पना नव्हती
तरीही आपण ईतके रसिक व्यक्तीमत्व होता.. आय मीन आहात... ग्रेट आहात !
<कोरडे आभार मानून मला या
<कोरडे आभार मानून मला या कर्जातून मुक्त व्हायचे नाही. तसा विचारही मी करणार नाही. या निमित्ताने यापुढेही मायबोलीसाठि जे करता येईल ते करत राहण्याचे वचन देतोय तसेच कुणाला या बाबतीत जास्त चर्चा करायची असेल वा सल्ला हवा असेल तर त्यासाठी मी उपलब्ध असेन, असे जाहीर करतोय.
या बदल्यात मागणे एकच.
हे प्रेम मला आयुष्यभर लाभो.
आपलाच,
दिनेश.
दिनेश.दा
परत या मायबोलीवर
काही नतद्रष्ट लोकांमुळे बाकी मायबोलीकर मुकत आहेत आपल्या लिखाणाला
या काळात मानसिक स्वास्थ्य कसे
या काळात मानसिक स्वास्थ्य कसे राखले या बाबत वाचायला आवडेल. त्यातून अन्य लोकांनाही नकळत मार्गदर्शन होईल. अगोदरचे लिखाण वाचले नाही त्यामुळे कल्पना नाही.
दिनेश.दा
दिनेश.दा
परत या मायबोलीवर
काही नतद्रष्ट लोकांमुळे बाकी मायबोलीकर मुकत आहेत आपल्या लिखाणाला >> + 1111111
+७८६
+७८६
मला ३ सभासद परत आणायची परवानगी दिली तर पहिले नाव दिनेशदांचे असेल
दिनेशदा जमलंच तर परत या.
दिनेशदा जमलंच तर परत या.
-शोकाकुल मायबोलीकर
दिनेश मायबोलीवर आहे. आणि इथली
दिनेश मायबोलीवर आहे. आणि इथली इत्यंभूत माहिती पण ठेवत आहे. इतकी माहिती की मी माझ्या नावा मध्ये वेलांटी काढून उकार कधी लावला हे तो फेसबुक वर मंदार जोशीला सांगत होता. दिनू वाचतोयस नव्ह?
Pages