Submitted by vinayak pandit on 11 February, 2008 - 09:31
आयुष्यात प्रेम येण्याआधी...............
मी माझं ह्रदय उघडून
त्याना मिठीत घेऊन बसलो
ते निखारे होऊन अस्तनीत कधी गेले
कळ्लंच नाही!...
ह्या ह्रदयाला साला
आता सीलंच ठोकलं पाहिजे!
सगळ्यानी आतबाहेर करून
दार खिळखिळं करून टाकलंय!...
....आणि प्रेम आल्यानंतर?...........
तुझा हात माझ्या केसांमधून फिरतो
तेव्हा मी गर्तेतून परततो!
एक कर! हात तसाच ठेव!
मग बघ कसा मी जगतो!!!...
तुझं प्रेम मला किती
गुदमरऊन टाकणारं
झालोय जरी तुझा तरी
चक्राऊन सोडणारं!!!...
गुलमोहर:
शेअर करा