बलात्कारांचं वाढतं प्रमाण आणि आपण

Submitted by योगी on 12 November, 2009 - 01:00

नमस्कार,

हल्ली वर्तमानपत्रातून सतत येत असणार्‍या बलात्कार, विनयभंग, लैंगिक शोषण यासारख्या बातम्या वाचून मनात खूप कालवाकालव होते. अगदी चारपाच वर्षांचं वय असणार्‍या कोवळ्या मुलींवर होणार्‍या बलात्कारांचं प्रमाणही हल्ली खूपच वाढलंय. खरंतर अशा निरागस वयातल्या या मुलींना पाहून त्यांच्याशी खूप खूप खेळावं, त्यांना कडेवर उचलून घेऊन त्यांचा पापा घ्यावा असं वाटायला हवं. पण त्याउलट स्वत:च्या शरीराची निर्लज्ज भूक भागवण्यासाठी या कोवळ्या मुलींच्या शरीराचे लचके तोडण्याचे पाशवी विचार एखाद्याच्या डोक्यात कसे येऊ शकतात हेच कळत नाही. कुठल्या मातीची बनलेली असतात ही माणसं? यांना माणसं तरी का म्हणावं? अशांना फाशीची शिक्षा दिली तरी ती कमीच आहे.

ज्या मुलींना या प्रसंगाला सामोरं जावं लागत असेल त्यांच्या मनावर किती खोलवर आघात होत असेल याची नुसती वर्तमानपत्रातली बातमी वाचून कल्पना येणं खूपच अवघड आहे. आणि मग त्या प्रसंगामुळे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना भोगाव्या लागणार्‍या दुष्परिणामांबद्दल विचार करणं तर खूपच दूरची गोष्ट आहे. कित्येकांची आयुष्य अशा प्रसंगांनंतर उद्ध्वस्त झालेली आहेत आणि होताहेत.

कोणत्याही वयात होणार्‍या बलात्कारांचं प्रमाण खरोखरच काळजी करण्याइतपत वाढलंय. कालच्या सकाळमधे तर ६५ वर्षाच्या एका महिलेवर बलात्कार झाल्याची बातमी वाचली..... बलात्कार, खून, अपहरण.... हल्ली वर्तमानपत्र हातात घ्यायचीच भिती वाटते.

पुण्यात काही दिवसांपुर्वीच नयना पुजारीच्या बाबतीत जे घडलं त्याने हेही लक्षात यायला हवं की या प्रकारांत बळी पडणार्‍या मुली, स्त्रिया अगदी तुमच्या आमच्या आजुबाजूला रहाणार्‍या असू शकतात, नात्यातल्या असू शकतात.... किंवा कदाचित घरातल्याही असू शकतात...

हा विषय थेट चर्चेसाठी नेमका कसा मांडावा हे न सुचल्यामुळे मी आघात या कथेच्या माध्यमातून तो मायबोलीच्या वाचकांसमोर मांडला होता. यावरचे प्रतिसाद मला फक्त एका कथेवरचे प्रतिसाद म्हणून अपेक्षित नव्हते, तर या विषयावर काहीतरी गंभीर चर्चा व्हावी असं वाटत होतं. पण मुळात जागाच चुकल्यामुळे (कथा म्हणून हा विषय समोर ठेवल्यामुळे) मला अपेक्षित अशी चर्चा व्हायच्या ऐवजी फक्त कथेविषयीचे प्रतिसादच आले. म्हणून nandini2911 यांनी सुचवल्याप्रमाणे हा बीबी उघडला आहे.

कथालेखन हा काही माझा प्रांत नाही. त्यामुळे कथेविषयीचे प्रतिसादही मला अपेक्षित नाहीत. पण या कथेच्या अनुषंगाने खालील मुद्द्यांवर चर्चा व्हावी असं मला वाटत होतं:

  • असे प्रकार पूर्णपणे थांबवणं तर आपल्या हातात नाही. पण तुम्ही स्वतः एक स्त्री असाल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे?
  • तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला काय करता येऊ शकतं?
  • गेल्या काही आठवड्यांत वाचनात आलेल्या बातम्यांमधे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे अगदी १२-१४ वर्षे वयाच्या मुलांचाही सहभाग असल्याचं दिसून आलं. एवढ्या लहान वयात या मुलांच्या मनात अशा भावना कशामुळे निर्माण झाल्या असतील? याबाबतीत आपण काही करु शकतो का?
  • अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे सहभागी असणार्‍यांना नेमक्या कशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद असायला हवी म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल?
  • प्रसारमाध्यमांची याबाबतीत काय भुमिका असावी?

याव्यतिरीक्त अजूनही काही मुद्दे चर्चेयोग्य वाटत असतील तर तेही इथे मांडावेत ही नम्र विनंती.

-योगेश

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बलात्कार म्हणजे forced, unwanted sexual intercourse एवढच का !!!! .....forced, unwanted touch हा Physical Abuse,... हा बलात्कारा सारखा क्राईम नाही का???

.... बलात्काराची चर्चा, विचार करतांना फक्त forced, unwanted sexual 'intercourse' ह्याच क्राईमचा विचार/चर्चा करायचि कि .... forced, unwanted touch on body/sex organs सारख्या Sexual Abuse बाबत, forced, unwanted 'Verbal and Emotional Abuse' बाबत हि विचार झाला पाहिजे....

माझ्या मते Physical/Verbal/Emotional Abuse सुद्धा बलात्कारा सारखे क्राईम आहेत... बलात्काराच प्रमाण वाढतय म्हणजे ह्या सगळ्या प्रकारांच प्रमाण वाढतय अस मला वाटत....

To stop rape incidence (forced, unwanted sexual intercourse) it is Necessary to stop Physical/Verbal/Emotional Abuse too

बलात्कार म्हणजे forced, unwanted sexual intercourse एवढच का !!!! .....forced, unwanted touch हा Physical Abuse,... हा बलात्कारा सारखा क्राईम नाही का???<<
दोन्ही संदर्भातल्या बचावात्मक उपाययोजनांमधे फरक आहे. तसेच दोन्ही मानसिकतेमधेही काही प्रमाणात फरक आहे.

मला वाटतं लिंब्याच्या पोस्टशी परत यावं कारण त्याने अत्यंत परफेक्ट मुद्दा मांडला आहे.

क्राईम== गुन्हा!!!

बलात्कार म्हणजे forced, unwanted sexual intercourse एवढच का !!!! .....forced, unwanted touch हा Physical Abuse,... हा बलात्कारा सारखा क्राईम नाही का???>>> होतो ना!! शारिरिक आणि मानसिक स्तर दोन्हीवर होतो पण तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे ते समजत नाह
दोन्ही संदर्भातल्या बचावात्मक उपायनाहिये.

दोन्ही संदर्भातल्या बचावात्मक उपाययोजनांमधे फरक आहे. तसेच दोन्ही मानसिकतेमधेही काही प्रमाणात फरक आहे. >>> अनुमोदन!!

मला वाटतं लिंब्याच्या पोस्टशी परत यावं कारण त्याने अत्यंत परफेक्ट मुद्दा मांडला आहे.>>> वोक्के!!

कुणीतरी जुन्या मायबोलीवर्चा बीबी शोध्हाय्ला मदत करा!!

भारतात आणि भारताबाहेर, शारिरीक स्तर आणि मानसिक स्तर.... आपण असे वादाचे मुद्दे टाळून मूळ प्रश्नाकडे वळूया का?

गुन्हा भारतात झालेला असो किंवा भारताबाहेर, प्रत्यक्ष बलात्कार असो किंवा सासने म्हटल्याप्रमाणे घाणेरडे स्पर्श, शेरेबाजी असो या सर्वांचं कारण स्त्रीला भोग्य वस्तू मानण्याची असलेली मानसिकता हेच आहे या वस्तुस्थितीबद्दल कुणाचं दुमत शक्यतो व्हायला नको. आणि लिम्बुटिम्बू यांनी म्हटल्याप्रमाणे उपाय करायचा असेल तर विकृत व्यक्तींवर व्हायला हवा असं धरुन त्या अनुषंगाने चर्चा पुढे नेऊया का?

अगदी मान्य योगी, forced, unwanted sexual intercourse येव्हढीच जर बलात्काराची व्याख्या असेल तर ती अत्यंत अपुरी असून बदलायला हवी.

'सास' यांच्या लिखाणात कुठेही भारतातच हे घडते किंवा भारतात हेच घडते असे लिहीलेले आढळत नाही. निव्वळ निर्भय बनून हे थांबवता येणार आहे का ? समाजाची मानसिकता बदलण्याखेरीज यावर अधिक परिणामकारक उपाय सापडणे अवघड आहे.

भारतात हेच घडते >> अस वाक्य मी कुठेहि लिहलेल नाही!!! असो.

विकृत व्यक्तींवर ऊपाय व्हायला हवा त्यासाठी ह्या विकृत व्यक्ती ओळखता यायला हव्यात.... लोकांना नॉर्मल, सभ्य वाटणार्‍या, माणसात देखील हि विकृती असु शकते... अश्या व्यक्तीने जर कुणा बरोबर अयोग्य वर्तन केल आणि Abused व्यक्ती ने त्याला वाचा फोडली तर अस हि होत कि लोक त्यावर विश्वास नाहीत... Abusive Tendancy कुठल्याहि व्यक्तीत निर्माण होऊ शकते ह्यावर थोडा विश्वास ठेवायला हवा अस मला वाटत.

घरचे, नातलग हि बरेचदा "झाल ते झाल पण तुझ्या सोबत हे झाल याची वाच्यता कुठे करु नकोस" अस Abused मुलीला सांगतात. विकृत व्यक्ती पासुन दुर रहा अस बरेचदा सांगण्यात येत पण त्या विकृत व्यक्तीवर काही कारवाई करण्यास कुणी पुढे सरत नाही. Sad

'सास' यांच्या लिखाणात कुठेही भारतातच हे घडते किंवा भारतात हेच घडते असे लिहीलेले आढळत नाही. <<
अमित, तिचं पहिलंच पोस्ट वाच. त्यातली पहिली ओळ वाच वेगळं काय लिहिलंय तिने.

असो भारताची बदनामी तिने सुरू केली त्यावर निषेध नोंदवण्याचं काम मी केलंय आता विषयाकडे...

बाकीचे गैरलागु मुद्दे टाळुन आणि विषयाला धरुन....
>>असे प्रकार पूर्णपणे थांबवणं तर आपल्या हातात नाही. पण तुम्ही स्वतः एक स्त्री असाल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे?
चारचौघातल आपल वागणं, आपला पेहराव (प्रसंगानुरुप) आणि आपली देहबोली याबद्दल जागरुक रहावे.
आपल्या वागण्यातुन कुणाला चुकीचे संकेत जात नाहियेत ना याची काळजी घ्यावी (मुख्यत मुलामुलींच्या मिक्स ग्रुप मध्ये वावरताना)
त्यातुनही कोणी लगट करण्याचा प्रयन्त करु लागले तर त्याला वेळीच योग्य शब्दात (अथवा योग्य कृतीने)समज द्यावी
प्रसंगी कडवा प्रतिकार करण्याची आपल्यात धमक आहे याची समोरच्याला जाणीव करुन द्यावी आणि समजा अंगात धमक नसली तरी निदान तसा दिखावा तरी करावा!
एव्ह्ढ सगळ करुनही आपल्यावर ती वेळ ओढवणारच नाही असे नाही पण इतकी काळजी तर आपण घेतलीच पाहिजे!

>>तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला काय करता येऊ शकतं?
सगळ्या पुरुषांनी जर आपण असले काही करणार नाही आणि कुणी करत असेल तर त्याला सर्वतोपरी रोखण्याचा प्रयन्त करु असा पण केला तर आपल्याला या विषयावर चर्चा करायची गरजच पडणार नाही!

>>गेल्या काही आठवड्यांत वाचनात आलेल्या बातम्यांमधे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे अगदी १२-१४ वर्षे वयाच्या मुलांचाही सहभाग असल्याचं दिसून आलं. एवढ्या लहान वयात या मुलांच्या मनात अशा भावना कशामुळे निर्माण झाल्या असतील? याबाबतीत आपण काही करु शकतो का?
मुळात दृष्टिकोनात फरक आणायला हवा... लहानपणापासुन मुलामुलींना वेगळी वागणुक देणे... शाळाशाळांमधुन मुलामुलींना मिसळु देउन एकमेकांना समजुन घेण्याची संधी देण्यापेक्षा, तसे वातावरण निर्माण करण्यापेक्षा त्यांच्यात एकप्रकारची दरी निर्माण होईल असेच वातावरण असते (निदान छोट्या शहरांमधुन आणि खेडेगावंमधुन तरी)
मग अश्या अडनिड्या वयात मैत्री तर करता येत नाही आणि आकर्षण तर असते अशी काहेशी विचित्र अवस्था होत असणार मुलांची!
त्यातुन जी चांगल्या संस्कारात, चांगल्या घरात वाढतात अशी मुले यातुन तरुन जातात उरलेली मात्र अश्या मोहाला बळी पडतात!
खर म्हणजे याच वयात आपल्या वर्गमैत्रिंणीबद्दल (आणि पर्यायाने एकुणच स्त्री जातीबद्दल) मैत्रीची, आपुलकीची भावना निर्माण होईल यासाठी शाळाशाळांमदुन जाणीवपुर्वक प्रयन्त होण्याची आवश्यकता आहे.

>>अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे सहभागी असणार्‍यांना नेमक्या कशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद असायला हवी म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल?
शिक्षेची तरतुद आणि कठोर कायदा केलाच पाहिजे पण त्याची अमलबजावणीही तितकीच जबाबदारीने व्हायला हवीय.
मुख्य म्हणजे अश्या गुन्ह्यांच्या तपासात संबधित पोलिस अधिकार्‍यांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि तरीही unbiased तपास केला पाहिजेल.
एक मात्र नक्की अश्या विकृतांना जरब ही बसलीच पाहिजेल!

>>प्रसारमाध्यमांची याबाबतीत काय भुमिका असावी?
त्यांची तर जबाबदारी फार मोठी आहे...
उगाच संबधित स्त्रीला "अभी आप क्या महसुस कर रही हो?, उस दौरान असल मे क्या हुआ था?" असले असंवेदनशील प्रश्न विचारण्यापेक्षा आणि तिच्याशी संबधित हजार लोकांची रडगाणी ऐकवण्यापेक्षा आरोपीला धारेवर धरण्याचा आणि त्याला शिक्षा होइपर्यंत तो मुद्दा लावुन धरण्याची गरज आहे.
नुसत्या सनसनाटी बातम्या देउन तेव्हढ्यापुरता टीआरपी वाढवुन घेण्यापेक्षा लोकांच्या मनातला आपल्याबद्दलचा विश्वास कसा वाढेल हे बघितले पाहिजेल!

.

@मानसी वैद्य,
तुम्ही मांडलेले सगळेच मुद्दे पटण्यासारखेच आहेत. पण विशेषकरुन खालील दोन मुद्दे खूपच महत्त्वाचे वाटले.

>>खर म्हणजे याच वयात आपल्या वर्गमैत्रिंणीबद्दल (आणि पर्यायाने एकुणच स्त्री जातीबद्दल) मैत्रीची, आपुलकीची भावना निर्माण होईल यासाठी शाळाशाळांमदुन जाणीवपुर्वक प्रयन्त होण्याची आवश्यकता आहे
-
>>उगाच संबधित स्त्रीला "अभी आप क्या महसुस कर रही हो?, उस दौरान असल मे क्या हुआ था?" असले असंवेदनशील प्रश्न विचारण्यापेक्षा आणि तिच्याशी संबधित हजार लोकांची रडगाणी ऐकवण्यापेक्षा आरोपीला धारेवर धरण्याचा आणि त्याला शिक्षा होइपर्यंत तो मुद्दा लावुन धरण्याची गरज आहे

असो...
लिंबूने मांडलेला
>>एखादे गुलाबाचे फुल, सगळ्ञान्नाच सुन्दर दिसते झाडावर असताना, पण काही विशिष्ट विकृत लोकान्ना ते फुल ओरबाडुन्/हिसकावुन/जबरदस्तीने स्वतःकरताच हवे असते! पण म्हणून काय फुलाने फुलु/उमलुच नये? सुन्दर दिसूच नये???
तेव्हा उपाय एकच, विकृत व्यक्तिन्वर व्हायला हवा, फुलावर नव्हे हे विसरुन चालणार नाही!<<
हा मुद्दा कळीचा आहे. तिकडे येऊया परत.

चर्चा करण्या सारखा विषय आहे. बर्‍याच गोष्टी स्पष्ट कराव्या लागतील.

पण,

टाईम प्लिज!
आत्ता जरा बाहेर जातोय,
नंतर सविस्त्र बोलतो.

माफ करा सास... पण राहावले नाही म्हणून लिहितेय... खालील लिंक मध्ये तुम्ही अमेरीकेतही तुम्हाला सुरक्षित वाटत नाही असे लिहिले आहे.
http://www.maayboli.com/node/10663

माझ्या मते, विकॄत माणसे सर्वत्र आहेत.... त्यावर उपाय म्हणून मुला-मुलींना लहानपणापासूनच प्रसंगावधानी बनवणे गरजेचे आहे. तसेच मुलांमध्ये अशा प्रकारच्या विकृती निर्माण होऊ नयेत म्हणून पालकांनी विषेश काळजी घ्यायला हवी.

>>एखादे गुलाबाचे फुल, सगळ्ञान्नाच सुन्दर दिसते झाडावर असताना, पण काही विशिष्ट विकृत लोकान्ना ते फुल ओरबाडुन्/हिसकावुन/जबरदस्तीने स्वतःकरताच हवे असते! पण म्हणून काय फुलाने फुलु/उमलुच नये? सुन्दर दिसूच नये???
तेव्हा उपाय एकच, विकृत व्यक्तिन्वर व्हायला हवा, फुलावर नव्हे हे विसरुन चालणार नाही!
>>
मुळात ही फुलाची उपमा वगैरे मला यासंदर्भात चुकीची वाटते....
आणि जर ही उपमा ग्राह्य धरुनच बोलायचे ठरविले तर मग यासंदर्भातली काळजी घ्यायची जबाबदारी माळ्यावर येते कारण अगदी जर तुम्ही म्हणता तसे फुलाने उमलायचे नाही असे जरी ठरवले तरी कळ्या तोडणारे असतातच की!
मग उपाय काय तर त्या फुलाची जोपासना अशी करणे की ते सुन्दर तर दिसले पाहिजेल पण उगा येणाजाणार्‍यांच्या हाताला पण नाही लागले पाहिजेल!

वर निधपा ने म्हटल्याप्रमाणे बलात्कार, लैंगिक शोषण, याबाबत आपल्या भारतीय मानसिकतेत जबरदस्त घोळ आहे. Especially how to deal with it. अमेरिकेतील मराठी समाजात साधारण २५ वर्षांपूर्वी घडलेली सत्यकथा आहे. एका मराठी घरामध्ये नेहमी ये जा करणार्‍या एका मराठीच व्यक्तीने त्यांच्या दहा वर्षांच्या मुलीला oral sex करायला भाग पडल. त्या प्रसंगानंतर या मुलिची personality च बदलली. ती एकदम कुढी, गप्प-गप्प, हरवलेली झाली. चार महीन्यात या व्यक्तीच लग्न झाल, नंतर एक मुलगा झाला. प्रख्यात विद्यापिठातून MBA करून लट्ठ पगाराची नोकरी मिळवली. कहर म्हणजे या प्रसंगानंतर सुद्धा हा माणूस त्या डॉक्टरांच्या घरी नेहमी जायचा. पाच्-सहा वर्षांनी त्या पोरीला काय झाल माहिती नाही पण तीने एका मावशीला ही गोष्ट सांगितली. तिने पोरिच्या आई-वडलांना विश्वासात घेऊन सगळ सांगितल. जाब विचारल्यावर या व्यक्तीने आपल्या विकृत कृत्याची कबूली दिली. पण या प्रकरणाला वाचा फुटल्यावर रीतसर पोलिसात तक्रार करायच्या ऐवजी १०-१२ कुटुंबानी मिळून पंचायत स्टाईल काथ्याकूट करून या माणसाच्या कुटूंबाला भारतात चालू लाग म्हणून सांगितल. परत जा नाहीतर तुझ्यावर खटला भरू. कदाचित कोर्ट्-कचेरीत पोरीची अजून परवड होईल म्हणून असेल.
या व्यक्तिची आणी आमची खूप मैत्री होती. त्याची बायको माझी चांगली मैत्रीण होती. आता कळल्यावर शिसारी येते. I get disturbed even after so many years!

काही काही तर गोष्टी माझ्या आकलनाच्या पल्याड आहेत.
त्या छोट्या मुलीवर अत्याचार केला तेव्हा याच लग्न ठरल होत.
त्याच्या बायकोला जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा ती म्हणाली..I can not leave my husband because he is a very good dad. तीने या माणसाबरोबर कसा संसार केला हा प्रश्न मला पडतो. तिला त्या पोरी बद्दल काहीच नाही का वाटत? काही गुन्हे अक्षम्यच असतात!
आपली पोर एकदम का बदलली ? हा बद्ल आई-वडलांना नाही का कळला?

छे !पोरांच्या बाबत आपण paranoid वाटलो तरी चालेल पण कुणावरच विश्वास टाकू नये. त्या पोरीच लग्न झाल नाही. साधीशी नोकरी करते. भारतात परत गेलेल कुटूंब पैशात लोळतय.

कल्पु तुमची पोस्ट खरंच खूप डिस्टर्बिंग आहे. या सगळ्या प्रकारात सर्वात पहिल्यांदा त्या मुलिला आधार देऊन या धक्क्यातून बाहेर काढणं गरजेचं होतं ते केलं की नाही? विकृत माणसं स्वत:च्या विकृती वर काम करत नाहीत त्यामुळे ती तशीच राहतात. कोवळ्या वयातल्या लोकांवर त्याचे परिणाम लाँग टर्म राहून संपुर्ण जीवन बदलते त्यांचे ते ही निगेटिव्ह. मुलगी बरीच धीराची म्हणायची की तिने मनात न ठेवता निदान उघड सांगितलं तरी. कित्येक मुलं हे करू शकत नाहीत कारण भिती असते.
दुर्दैवाने भारतात १०० पैकी ९९ मुलांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे लैंगिक अत्याचार होतोच (निदान एकदा तरी) त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे प्रकार कुटुंबातले किंवा त्याचप्रकारे जवळचे असणारे लोक तो करतात. Sad

छे !पोरांच्या बाबत आपण paranoid वाटलो तरी चालेल पण कुणावरच विश्वास टाकू नये.
---- अनुमोदन. आई- वडिल, शाळेतील शिक्षक सोडल्यास प्रत्येक व्यक्ती stranger असते. सावधानता बाळगणे जरुरीचे असते. आमच्या कडे (Saskatchewan प्रांतात) शाळेत मुलांना ४ थी मधे असतांनाच abuse (शारिरीक, मानसिक, लैंगिक) बद्दल थोडी ओळख करुन देतात. कुणाला काही त्रास असल्यास शाळेत शिक्षकांना सांगावे असे शिकवले जाते.

>> काही वर्षांपूर्वी "बलात्काराच्या गुन्ह्याला फाशीची शिक्शा असावी की नसावी" हा वाद चालु होता. तेव्हा माझ्या मनात विचार होता की या विषयावर वाद किंवा चर्चा काय करायची? असल्या घाणेरड्या गुन्ह्याला हीच शिक्शा योग्य आहे

अगदी माझ्या मनात असंच आलं होतं, पण बलात्काराच्या गुन्ह्याला फाशीची शिक्षा का नाही?
कायदा करणार्‍यांनी ह्यामागे काय विचार केला होता ह्याचं स्पष्टीकरण एका जेष्ठ पत्रकाराकडून ऐकण्याचा योग आला.

**
ते म्हणाले:
माणसाला सगळ्यात जास्त भीती कसली असते—मृत्युची. म्हणजेच मरण्यापेक्षा जास्त वाईट काही असू शकत नाही. सध्या काही खून वगैरे सारख्या केसेसमध्ये गुन्ह्यांना फाशीची शिक्षा आहे.

जर बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षेची तरतूद केली, तर जो बलात्कार करतो तो विचार करेल की, 'बलात्कार केला तरी फाशी आणि खून केला तरीही फाशीच, अग बलात्कार करुन खून का करू नये?' शिवाय तो माणूस बलात्कार आणि खून करूनही इतर मार्गांनी पकडला गेला नाही तर त्याचाच फायदा की! कारण खून केल्यावर ती स्त्री काय बोलणार? त्याने ते घृणास्पद कृत्य केले हे सांगणार कोण? बलात्कार झाल्यावरही स्त्री सावरू शकते, पुढे आयुष्यात वर येऊ शकते, पण जीवच गेल्यावर संपलच की सगळं.
**

त्यामुळे फाशीच्या फाशीची शिक्षेची तरतूद केली तर 'बलात्कार आणि खून' असे दुहेरी गुन्हे वाढतील.

काही वर्षांपूर्वी बंगालमधल्या व हिंजवडीत नोकरीला असलेल्या मुलीचा बलात्कार करून खून झाला होता ड्रायव्हरकडून त्या केसचा तपास लागला का?

<<त्यामुळे फाशीच्या फाशीची शिक्षेची तरतूद केली तर 'बलात्कार आणि खून' असे दुहेरी गुन्हे वाढतील.>>
गुन्हेगार ( आणि त्यातही बलात्कार करणारे ) शिक्षा काय होईल हा एव्हढा विचार करुन गुन्हा करत असतील असे वाटत नाही.
बाकी फाशीची शिक्षा असावी का नाही यावर माझे काही मत नाही. परंतु ती का नसावी याचे वरचे लॉजिक काही फारसे पटले नाही.

जी काही शिक्षा कायद्यात असेल ती त्वरीत होणे गरजेचे आहे.

फाशी पण नको अन जन्मठेप पण नको , त्यासाठी हवी तालीबानी शिक्षा ! आयुष्यभर समाजाला तोंड दाखवायला लाज वाटेल अशी शिक्षा ! .

इथे बर्‍याच पोस्ट मधे असे उल्लेख आहेत की या विकृत माण्सांवर ईलाज झाला पाहिजे. असा ईलाज म्हण्जे नक्की काय ? त्याने माणुस खरेच सुधारु शकतो का ? बलात्कारी माण्साला जेव्हा शिक्षा होते तेव्हा तुरुंगात त्याच्यावर ईलाज होतो का? तसे नसेल तर हा बाहेर पड्ल्यावर पण परत गुन्हा करण्याची भीती आहेच की .
वर कोणीतरी उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकेत child molester / sexual abuser एकद पकडला गेला की त्याची नोन्द होते. आणि आप्ल्या neighbourhood मधे अशी एखादी व्यक्ति रहते का हे आप्ल्याला कळु शकते.
भारतात असे काही आढ्ळत नाही. victim ला ती गोष्ट आयुष्यभार छळत रहाते पण गुन्हेगार/आरोपी मात्र लगेच उजळ माथ्याने समाजात वावरु लागतो.

भारतात असे काही आढ्ळत नाही. victim ला ती गोष्ट आयुष्यभार छळत रहाते पण गुन्हेगार/आरोपी मात्र लगेच उजळ माथ्याने समाजात वावरु लागतो.
--- दुर्दैवाने victim लाच मोठी शिक्षा होते आधी गुन्हेगाराकडुन, नंतर आयुष्यभर समाजाकडुन. अशा गोष्टिंना वाचा फोडायलाच मुली तयार नसतात, ज्या फार थोड्या तयार होतात त्यांना कोर्टात नको त्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात (कोर्टाला भावना नसतात), त्या कुठल्याशा सनी देवल च्या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे. त्यातील फारच कमी जणिंना न्याय मिळतो. जळगावात १९९० च्या दरम्यान मोठे वासनाकांड झाले, किती आणि काय शिक्षा मिळाली ? सर्वच आरोपी निर्दोष सुटल्यावर पिडीत व्यक्ती कुठुन शक्ती आणणार ?

यामधे ढोबळपणे दोन प्रकारच्या मनोवृत्ती असतात.
(अ) क्षणीक मोह... अपघात असु शकतो.
(ब) खुप व्यावस्थित जाळे निर्माण करुन मुलींना/ महिलांना त्यात अलगद ओढणारे.... थोडक्यात अत्यंत सराईत. हे समाजात चांगल्या प्रकारे मिसळलेले लोकं असतात, शंका घ्यायला जागाही ठेवत नाही (त्या भंपक बाबाची व्हिडीओ नेट वर फिरते आहे). काही अत्यंत नावाजलेले, उच्च पदावर विराजमान असतात. जाडजूड (अभेद्य) अशा बुरख्याखाली जाळे हातात घेऊन सावजाच्या प्रतिक्षेतच असतात. कुठे तरी राजकीय आश्रय पण निर्माण करतात.

दोन्ही प्रकार वाईट, पण त्यातल्या त्यात दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत घातक. बेफिकीर यांची कादंबरी याच दुसर्‍या प्रकारावर आधारित आहे.

फाशीची शिक्षा न देण्याचे कारण मलाही पटले नाही. दुसर्‍या प्रकारच्या मनोवृत्तीला फाशी पण अपुरी असेल. ते मानव म्हणवण्यासही अपात्र आहेत, त्यांना अमानवी शिक्षाच असायला हवी.

>>>फाशी पण नको अन जन्मठेप पण नको , त्यासाठी हवी तालीबानी शिक्षा ! आयुष्यभर समाजाला तोंड दाखवायला लाज वाटेल अशी शिक्षा ! .>>> अगदी अगदी माझं पण हेच मत. कसले ईलाज कराय्चे ह्यांचयावर ??? :रागः
जेव्हा सख्खा बाप आपल्या मुलींसोबत असले हीन कृत्य करतो तेव्हा नाती विश्वास याच्यावर्चा विश्वासच उडतो. ईथे कायदेच कठोर नाहीत म्हणून असे करायला ही विकृत माणसं राजरोस धजावतात. कधी कधी वाटतं ते शिवाजी महाराजांच्या काळी होतं तसे जबर्दस्त कायदे पुन्हा व्हयला पाहिजे तरच असे घाणरडे कृत्य करताना एकदा नाही हजारदा विचार करतील.
>>त्यामुळे फाशीच्या फाशीची शिक्षेची तरतूद केली तर 'बलात्कार आणि खून' असे दुहेरी गुन्हे वाढतील>> म्हणजे निदान खून होऊ नये म्हणून त्यांना फाशीची शिक्षा करायची नाही का?? तसं फाशी म्हणजे त्यांच्या कृतीच्या मानाने फारच सौम्य शिक्षा. मेला की सुटला. त्यांना जिवंतपणी मरणयातना काय याचा अनुभव दिला पाहिजे.
दक्षिणा, सास, तुमचं मुद्दे पटले. शिक्षण आणि जनजागरण हे जास्ती गरजेचं आहे हे खरच. पण सद्य स्थितीत कराटे, सेल्फ डिफेन्स च ट्रेनिंग हे शालेय अभ्यास क्र्मात असण हे अत्यंत गरजेचं आहे.

शिक्षण आणि जनजागरण हे जास्ती गरजेचं आहे हे खरच.
---- महत्वाचे. या प्रकारात पिडीताचा काहीच दोष नसतो हे सर्वांनी (म्हणजे आपल्या समाजाने) लक्षात घ्यायला हवे. बहुतेक प्रकरणात ती अपघाताने त्या क्षणी, त्या ठिकाणी असते पण त्या व्यक्ती कडे बघण्याचा समाजाच्या दृष्टी Sad बदलतात... कुत्सित, तसेच टोकाची सहानभुती दोन्ही घातकच.

Pages