"जिंकी रे जिंकी" - खास प्रसारण

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

‘‘प्रकाशाच्या उंबरठ्यावर’’ या भाऊ गावंडे लिखित आणि ‘‘ग्रंथालीने’’ प्रकाशित पुस्तकावर आधारित 14 नोव्हेंबर बालकदिनानिमित्य ‘‘जिंकी रे जिंकी’’ या सिनेमाचे ‘‘झी टॉकिज’’ या वहिनीवर खास प्रसारण
अत्यंत वाया गेलेलं मूल, खूपच खोडकर उपद्रवी असं. त्याच्या परित्यक्ता मजूर असलेल्या आईलाही नकोसं झालेलं. आपली उपजिविका तुटपुंज्या मजुरित एक हे असं मूल आणि एक मुलगी यासह पुरी करतांना नाकी नऊ आलेली आई. या मुलाने रोज कुणाची ना कुणाची खोडी काढल्याने अत्यंत त्रासून गेली. मजुरीला जाऊ की या सात वर्षाच्या मुलाकडे लक्ष देऊ अशा विवंचनेत ती सापडली होती. या मुलाला शाळेत घालून ती आपली समस्या सोडवू पहाते. तो शाळेत जातोही परंतू शाळेत शिक्षकाच्या अमानुष माराने पुन्हा कधीही शाळेत न जाण्याच्या निर्धाराने शाळा सोडते. दुस-या वर्षी बदलून आलेल्या सहृदयी शिक्षकाच्या अनेकविध क्लृप्यांनी पुन्हा मूल शाळेत जायला सुरुवात करते. शिक्षणाच्या अनेकविध पाय-या पूर्ण करून परदेशातही विशेष शिक्षण धेऊन येते. शिक्षण खात्यात अधिकारी होऊन उच्च पदावर पोहचते.
ही कहाणी आहे भाऊ गावंडेंची. ‘‘प्रकाशाच्या उंबरठ्यावर’’ हे ग्रंथालीने 5 डिसेंबर 2003 रोजी प्रकाशित केलेल्या त्यांच्या आत्मवृत्ताची. त्याची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाल्यावर शिक्षण जगताने त्या पुस्तकाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्यावर चर्चा घडून आल्या. एवढेच नव्हे तर त्यावर ‘‘जिंकी रे जिंकी’’ ही सिनेमा पण निर्माण झाला. त्याला मुंबई आणि पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम चित्रपट म्हणून मान्यता मिळाली. हैद्राबाद येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘‘गोल्डन एलिफंट’’ अवार्ड, कलकत्ता येथे उत्कृष्ट चित्रपट, नासिक महोत्सवात उत्कृष्ट फोटोग्राफी, इजिप्तची राजधानी कैरो येथे उत्कृष्ट चित्रपट गणल्या गेला. ‘‘झी गौरव’’ पुरस्कारात उत्कृष्ट कथा, सहाय्यक अभिनेत्री आणि उत्कृष्ट बालकलाकारासाठी नामांकन मिळाले आणि टिंग्या चित्रपटातील बालकलाकारासोबत ‘‘जिंकी रे जिंकी’’´च्या देवाशिष परांजपेला अवार्ड मिळाला. या चित्रपटाचे महत्व ओळखून ‘‘युनेस्कोने’’ उत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट म्हणून शिक्षक प्रशिक्षणासाठी निवडला. विविध देशात त्याचे प्रसारण होणार आहे.
14 नोव्हेंबर बालदिनाचे महत्व ओळखून ‘‘झी टॉकीज’’ या मराठी चित्रपट वाहिनीने ‘‘जिंकी रे जिंकी’’ हा चित्रपट दिनांक 14 नोव्हेंबर 2009 शनिवारी संध्याकाळी 7.00 वाजता (भारतीय प्रमाण वेळ) दाखविण्याचे निश्चित केले आहे.

प्रकार: 

छान. या चित्रपटाबद्दल ऐकलच होतं, आत्ता पहायलाही मिळणार तर.
'पक पक पकाक' व 'टिंग्या' याबरोबरच हा चित्रपट देखील बालकलाकारांनी पेललाय.

ग्रंथाली कडे चांगली पुस्तके आहेत. ‘‘प्रकाशाच्या उंबरठ्यावर’’ , "निशाणी डावा अंगठा" या पुस्तकांवर चित्रपट निघाला आहे. कुणी ग्रंथालीची वेबसाइट सांगेल का?

मस्तच. चंपक, चित्रपटाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. मला बघता येणार नाही पण माझ्या भाचरांना सांगते बघायला.

रंगाशेठ, ग्रंथाली ची वेबसाईट www.granthali.com
जर ग्रंथालीच्या विविध उपक्रमांबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर ह्या पत्त्यावर मेल करा. granthali01@gmail.com
जर तुम्हाला ग्रंथालीच्या नियमित उपक्रमांबद्दल माहिती हवी असेल उदा. ग्रंथ दिंडी, मुलाखती, पुस्तक प्रकाशन इ. तर तुम्ही त्या ई-मेल मध्ये तशी विनंती करा. मग तुमचा ई-मेल पत्ता ग्रंथालीच्या अ‍ॅड्रेस बुक मध्ये नोंदला जाउन तुम्हाला नियमीत मेल पाठवले जातील.

मजा करा! Happy (मराठीत: एन्जॉय!!)