आशा

Submitted by ShantanuG on 11 February, 2008 - 04:20

  1. बघ लोकांना किती महत्त्वकांक्षा त्यांच्या .
  2. मग तुच का रे असा ?
  3. का रे जगाला कंटाळला ?
  4. नको सोडूस आशा माणसा , नको सोडूस आशा .
  5. बघ या लहान चिमणीच्या पिलांना,
  6. आकाशी झेप घेण्याचा ध्यास त्यांचा .
  7. प्रयत्न ते करतात पण सोडत नाही न आशा,
  8. नको सोडूस आशा माणसा , नको सोडूस आशा .
  9. बघ या तहानलेल्या प्राण्याला,
  10. पाण्याच्या शोधात तो भिरभिरतो कसा.
  11. पण तो नाही न सोडत आशा,
  12. नको सोडूस आशा माणसा , नको सोडूस आशा .
  13. ऐक रे ऐक ,
  14. नको सोडूस प्रयत्न पुढे जायचा.
  15. नको रे कंटाळू जगाला.
  16. नको सोडूस आशा माणसा , नको सोडूस आशा .
  17. -शंतनु श. घारपुरे

गुलमोहर: