१४ नोव्हेंबर रोजी असणार्या बालदिनानिमित्त नीरजाच्या (माझी मुलगी
) शाळेत तो पूर्ण आठवडा बरेच कार्यक्रम असतात. त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे वेशभुषा दिवस. शुक्रवारी म्हणजे ६ नोव्हेंबरला ह्या कार्यक्रमाबद्दल नीरजाबरोबर घरी चिठ्ठी आली. लगेचच १० नोव्हेंबरला कार्यक्रम... मध्ये फक्त एक रविवार.
त्यात सुद्धा रविवारी सकाळी मायबोलीकरांचं गटग ठरवलेलं.. म्हणजे अख्खी सकाळ त्यात जाणार हे निश्चित होतं.
विषय होता 'आवडती भाजी/ आवडतं फळ/ आवडतं फूल'. फळ करायचं म्हटलं आंबा/द्राक्षं/संत्रं/सफरचंद वगैरेच डोळ्यासमोर येत होतं. त्यात शेडिंगची कटकट भारी आणि परत ड्रेसही मॅचिंग हवा.. नीरजाचा जांभळा आणि हिरवा परकर पोलका होता म्हणून मग तिला 'वांगं' करायचं ठरवलं. ते रंगवण्यासाठी हिरवा आणि जांभळा असे दोनच रंग आवश्यक. पण तरीही भाजीचं वांगं करायचं की भरताचं वांगं करायचं ते नक्की होत नव्हतं.
मी काही चित्रकार नव्हे, त्यामुळे आयत्यावेळी जो आकार उमटेल तो करायचा ठरवलं.
शनिवारी रात्रीच सगळे उद्योग करायला बसले. ऑफिसमधून घरी जाताना वांग्यासाठी कार्डबोर्ड पेपर आणि शेंडीसाठी कार्ड पेपर, रंग, कात्री, फेविकॉल, इलॅस्टीक वगैरे सटरफटर वस्तू घेतल्या होत्या.
सगळ्यात आधी नीरजाची उंची मोजून तिच्या गळ्याचं माप घेऊन कार्डबोर्ड पेपरवर खालील आकृती काढली.
आणि कात्रीने कापून घेतली. ती कापलेली आकृती बघून नीरजा म्हणाली,"आई, हा बटाटा दिसतोय!!"
तिला रीतसर झापून हे वांगंच आहे हे डोक्यात भरवलं. 
आधी त्यावर नुसताच एक रंगाचा वॉश दिला. (कॅम्लिन वॉटर कलर नं. २५१)

हा रंग 'मजेंटा' म्हणून घेतला होता. पण तो कार्डबोर्ड पेपरवर तो राणी कलरच दिसत होता. मग तो जांभळा रंग उतरण्यासाठी एका डिशमध्ये त्या २५१ नंबरच्या रंगात काळा वॉटर कलर मिसळला. त्यात चमचाभर डिटर्जंट पावडर घालून पाणी घालून मिश्रण तयार केलं. डिटर्जंट पावडर घातल्यावर कार्डबोर्ड पेपर किंवा थर्माकोलवर रंग पसरवणे सोपे जाते. ते तयार केलेलं रंगाच्या मिश्रणाने कापलेलं वांगं रंगवलं.

वर देठाच्या आणि पानाच्या जागी सुद्धा खरंतर हिरवा रंग द्यायचा होता. पण नीरजाने मजेंटा रंगाच्या बाटलीत आपला अंगठा बुडवून त्याचे ठसे त्यावर काढून ठेवले होते.
(फोटोत दिसताहेत ते). मग रविवारी संध्याकाळी हिरव्या रंगाचा घोटीव कागद आणून तो त्या आकारात कापून वांग्यावर चिकटवून टाकला. ते करतानासुद्धा नीरजाने फेविकॉलची ट्यूब आपल्याच हातावर भसकन् दाबून बराचसा फेविकॉल वाया घालवला. जमेल तेवढा फेविकॉल गोळा करून ट्यूबमध्ये परत यशस्वीपणे भरला. (आम्ही 'कान्हेरे'
) पण तरीही थोडा तिच्या हातावर राहिला होताच. तो सुकल्यावर बया सालं काढण्यात गुंगून गेली. माझ्यासाठी ते बरंच झालं. तेवढीच माझ्या कामात लुडबूड कमी..
वांग्यावर जो गळा काढला होता त्याच्या दोन्ही टोकांना भोक पाडून त्यातून इलॅस्टिक घातलं. त्यामुळे ते वांगं नीरजाला व्यवस्थित गळ्यात घालता/ काढता येऊ लागलं.
आता राहिली शेंडी. त्यासाठी कार्ड पेपरवर खालील आकृती काढुन कापून घेतली.
मग त्यावर तो हिरव्या रंगाचा घोटीव कागद चिकटवला. आणि तो आकार गोल वळवून फेविकॉलने चिकटवून आणि स्टेपलर पिन मारून फिक्स करून टाकली. त्याच्याही दोन्ही बाजूंना भोकं पाडून त्यातून इलॅस्टिक घातलं. ते तिला हेअरबँडसारखं कानाच्या मागे घालता येईल असं लावलं त्यामुळे समोरून दिसायचा प्रश्न नव्हता.
आणि हे आमचं फायनल प्रॉडक्ट तयार झालं.

ह्या कार्यक्रमाच्या दिवशी शाळेत सर्वांसमोर जी काय वेशभुषा केली असेल त्यावर गाणं पण म्हणायचं होतं, ते सुद्धा इंग्लिशमधून. ब्रिंजलवरची कुठलीही पोएम मला आठवत नव्हती. त्यामुळे ती तयार करून नीरजाकडून पाठ करून घेणं हे एक मोठं आव्हान होतं.
I am miss Brinjal
Purple and Green
Cook me with spice
or mix me with rice
I am very tasty
healthy and strong
If you'll eat me
you'll live long
अश्या तीन दिवसांच्या खडतर मेहनतीनंतर आमचं 'वांगं' तयार होऊन शाळेत गेलं.
नर्सरीच्या मुलांना आवडती भाजी/ फळं/ फुलं हा विषय होता. ज्युनियर केजीच्या मुलांना 'आवडतं फुल' आणि सिनियर केजीच्या मुलांना 'आवडता प्राणी/पक्षी'. त्यामुळे स्कूलबसमध्ये लई धमाल होती.
मांजरं, ससे, द्राक्षं, सुर्यफुलं, गाजरं, चेर्या, कांगारू, गाई, स्ट्रॉबेर्या, गुलाब, आंबे वगैरे मस्त सरमिसळ होती. त्यांच्या सगळ्यांच्या 'अॅक्सेसरीज्' सांभाळताना बसमधल्या मावशी आणि दादाची अगदी भंबेरी उडाली होती. 
मस्तच कल्पना आणि सुन्दर
मस्तच कल्पना आणि सुन्दर फोटो!!!
मस्त झालय. गाणं पण छान
मस्त झालय. गाणं पण छान
डिटर्जंट पावडर घातल्यावर
डिटर्जंट पावडर घातल्यावर कार्डबोर्ड पेपर किंवा थर्माकोलवर रंग पसरवणे सोपे जाते.>> ही माहिती नविन आणि उपयुक्त आहे. वांग्यावरची "कविता" पण भारीये.
आम्ही "कान्हेरे"
ओह्ह हो.. मस्तच ग मंजु.. काय
ओह्ह हो.. मस्तच ग मंजु.. काय क्युट दिसतेय निरजा.. छो छ्वीट..
निरजा आणि वांग एकदम क्युट
निरजा आणि वांग एकदम क्युट
आणि त्या मागची मेहनतही जोरदार...
अगदी गोड वांगं.
अगदी गोड वांगं.
अगदी मस्तच जमलय वांग
अगदी मस्तच जमलय वांग
रंगात डिटर्जंट घातल्यावर
रंगात डिटर्जंट घातल्यावर त्याचा फेस नाही का निर्माण होत... आणि रंगवताना बुडबुडे येत नाहीत का?
का कुठली स्पेशल पावडर आहे... जी घातल्यावर फेस वगैरे येत नाही......
सगळ्यांना धन्यवाद. एवढे
सगळ्यांना धन्यवाद.
एवढे प्रतिसाद वाचून मी अगदी भारावून गेले.
PSG ला खास धन्यवाद. तिनेच मला ही वांग्याची कृती लिहून हस्तकला मध्ये टाक असं सांगितलं होतं.
हिम्स, आपण रंगात पाणी अगदी थोडंच घालतो त्यामुळे फेस किंवा बुडबुडे येत नाहीत. उलट साबणामुळे जो बुळबुळीतपणा येतो त्याची रंग पसरवायला मदत होते.
हा हा .. एकदम छान !!
हा हा .. एकदम छान !!
nirja khup chaan distey she
nirja khup chaan distey
she is like an angel.
sorry sorry.
she is angel.
kathe peksha nirja chhan bhasli aani katha hi chaan hoti.
drisht kadha nirjachi
मस्तच झालाय एकंदरीत सगळा
मस्तच झालाय एकंदरीत सगळा सोहळा . छोटुकलं वांग अगदी द्वाड आणि गोड दिसतयं.
तुमचं वांग फारच आवडल बुवा!
तुमचं वांग फारच आवडल बुवा!
मस्तय वांगं...
मस्तय वांगं...
वेशभुषेची ही कल्पना फारच
वेशभुषेची ही कल्पना फारच सुंदर आहे. देठा ऐवजी टोपी एकदम आवडली. पण देठसारखी टोपी अजून छान दिसली असती असे वाटतं नाही का? थोडी आकोड्यासारखी
असो... मग बक्षीस कुणाला मिळालं?
त्रूष्णा, ती कथा नाहिये गं.
त्रूष्णा, ती कथा नाहिये गं. एका माऊलीने आपल्या लेकीला वांगं बनवण्यासाठी केलेला अट्टहास आहे!!
बी, ती टोपी म्हणजे देठच आहे
बी, ती टोपी म्हणजे देठच आहे रे वांग्याचं.. वांगं ताजं आहे म्हणून देठ पण टवटवीत आहे.
तृष्णा, दृष्ट तर काढलीच लेकीची. त्या वांग्याची कथा लिहीली कारण बाकीच्या मातांना वेशभुषेसाठी जास्त डोकेफोड करायला नको.
मन्जुडे वांगुडं कसलं क्युट
मन्जुडे वांगुडं कसलं क्युट झालंय गं. मस्त आयडीया आहे. आणि करताना पण मजा आली असणार सॉलिड. कविता पण फारच गोड. भाचीला पाठ करायला लावते आता.
>> तिला रीतसर झापून हे वांगंच आहे हे डोक्यात भरवलं.
इतक्या गोड पोरीशी असं वागवतं तरी कसं म्हणते मी (शेवटचे दोन शब्द अनुनासिक)...
सगळंच एकूण वात्सल्याचं भरतं (भरीत नाही) यावं असं जमलंय.
ती पोयम एखादी जिंगल्स ची साईट शोधून स्वतःच्या नावावर अपलोड करता येते का बघ.
मंजू, मस्त आहे ताजं ताजं
मंजू, मस्त आहे ताजं ताजं वांगं. ती कविता पण छान रचली आहेस. कविता म्हणताना वांग्याने हातवारे पायवारे
केले का? मला गटगच्या दिवशीची नीरजा सारखी आठवतेय आत्ता. कडकलक्ष्मीला किती घाबरुन गेली होती बिचारी !
वा! वांगं मस्त झालंय. शेंडीचं
वा! वांगं मस्त झालंय. शेंडीचं इलॅस्टिक कसं लावलं ते थोडं समजलं नाही. पण मला काही वांगं बनवायचं नाहीये. त्यामुळे प्रश्न नाही.
भरताचं वांगं की भाजीचं वांगं?
भरताचं वांगं की भाजीचं वांगं?
>>भरताचं वांगं की भाजीचं
>>भरताचं वांगं की भाजीचं वांगं?
फक्त लाडवायचं वांग!! फारच गोजिरवाणं!
मंजूडि खुप खुप धन्स. तुझ्या
मंजूडि खुप खुप धन्स. तुझ्या आयडीयाप्रमाणे मी खालील वांग केल. पण मी टोपी घरी केली आणि खालच वांग पेंटरकडे दिल करायला. कारण मला वेळ कमी होता. श्रावणीची अजुन काही कॉम्पीडीशन्सची तयारी करायची होती. तुझीच पोएम तिला दिली. मुलांच्या किलकिलाटातही तिने माईकवर जोरदार ही कविता बोलली आणि तिला उत्तेजनार्थ पारीतोषिक मिळाले.

हा जुना बीबी वर आलेला
हा जुना बीबी वर आलेला दिसतो.
कसली धमाल आली वाचताना. पण शेवटचा सोडून बाकी सगळे फोटु दिसत नाहीयेत मला.
आमच्या लाईफ मधला हा टप्पा यायला अजुन अवकाश आहे.
शाब्बास श्रावणी
शाब्बास श्रावणी
मस्त्...
मस्त्...:स्मित:
सहिच, आहे ढब्बू मिरची, पातीचा
सहिच, आहे ढब्बू मिरची, पातीचा कांदा सुद्धा छानच होईल.
दोन्ही वांगी मस्त...
दोन्ही वांगी मस्त...
अजुन फोटोग्राफरने काढलेला
अजुन फोटोग्राफरने काढलेला फोटो यायचा आहे. तो आला की तो डकवेन इथे.
अरे जागू, सही झालंय वांगं..
अरे जागू, सही झालंय वांगं.. मस्तच एकदम!!
यंदा आम्हाला 'favourite cartoon character' अशी थीम होती. उद्या फोटो टाकतै आमच्या कार्टूनचा...
सूकी, माझ्या ऑफिसातल्या मैत्रिणीने हे वांगं बघून तिच्या मुलीला स्ट्रॉबेरी बनवलं होतं.
Pages