बाबा .......

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ऐकलं आहे
निखळणार्या तार्याकडे मागितलेलं मागणं नक्की मिळतं.
तसा माझाही विश्वास नाही अंधश्रद्धांवर
पण कधी कधी तो आधारही अश्रूमोलाचा ठरतो

आज इतकंच मागणं त्या निखळणात्या तार्याकडे -
जे चांदणं तू आजवर प्राणांची आहुती देत फुलवलंस,
त्याच्या एका किरणाने
माझी कमावलेली आत्मलुब्धता करपून जावो
आणि त्यातून तावून सुलाखून निघो
माझी आत्मनिष्ठा !
त्याशिवाय कसा होईल प्रवास सफ़ल,
ओंडक्यापासून समिधेपर्यंतचा?

विषय: 
प्रकार: 

>>>त्याच्या एका किरणाने
>>>माझी कमावलेली
>>>आत्मलुब्धता करपून जावो

सुरेख ओळी आहेत....

आहे. हे अनुवाद कॅटेगरी मधे टाकलयस, मूळ कलाकृती कुणाची आहे?

नव्या मायबोलीची अजून नीट सवय झालेली नाही. कॅटेगरी निवडावी लागते हे लक्षात आलं नाही आधी.

परागकण

कविता आणि श्रद्धांजली दोन्ही म्हणून ...

History is the fiction we invent to persuade ourselves that events are knowable and that life has order and direction. That's why events are always reinterpreted when values change. We need new versions of history to allow for our current prejudices.
-

पराग, सुरेख आहे रे.

पराग छान आहे कविता. कविता म्हणून तर आहेच आणि बाबांच्या संदर्भामुळं तर अजूनच.
>> जे चांदणं तू आजवर प्राणांची आहुती देत फुलवलंस,
या वाक्याला तर अगदी बाबांची बिनाइस्त्रीची कृश मूर्ती समोर आली.

आज इतकंच मागणं त्या निखळणात्या तार्याकडे -
जे चांदणं तू आजवर प्राणांची आहुती देत फुलवलंस,
त्याच्या एका किरणाने
माझी कमावलेली आत्मलुब्धता करपून जावो
आणि त्यातून तावून सुलाखून निघो
माझी आत्मनिष्ठा !.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> क्या बात है!!!!!..क्लास