मराठी रहस्यप्रधान चित्रपटांबद्दल अपेक्षा उंचावणारा चित्रपट म्हणजे ’गैर’. मराठीतही असा सस्पेन्स थ्रिलर असू शकतो यावर विश्वासच बसत नाही. उत्कृष्ट कथेला तितक्याच ताकदीच्या दिग्दर्शनाची व निर्मितीची जोड असेल तर मराठी चित्रपटात काय घडू शकतं हे तुम्ही गैर मधे पहाच! चित्रपट पहात असताना, ’अरे हे काय दाखवलंय, असं का.... असं का नाही, हे पटत नाही’, असे बरेच प्रश्न तुमच्या मनात येतील पण.... त्या सर्व प्रश्नांना चित्रपटाच्या अखेरपर्यंत थोपवून धरा.
सतीश राजवाडे हे उत्तम दिग्दर्शक आहेत, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केलेलं आहे. गैर चित्रपटातील त्यांच्या खास ’टच’ मुळे चित्रपटाला सुंदर गती लाभली आहे. उत्सुकता शेवटपर्यंत ताणून ठेवण्यात 'गैर' यशस्वी ठरला आहे. चित्रपटात निर्माते संजय घोडावत यांच्या दिमाखदार कार्स वापरल्या असल्या तरी त्यांचं कुठेही अवाजवी प्रदर्शन नाही. अगदी चॉपरचा (म्हणजे आपलं हेलिकॉप्टर हो!) वापरही मोजकाच पण नेमक्या वेळेस केलेला आहे. तरीही चित्रपटाला ग्लॅमरस व फ्रेश लूक देण्यात निर्माता व दिग्दर्शक दोघेही यशस्वी ठरले आहेत. सतीश राजवाड्यांना तरूण पिढीची ’नॅक’ सापडली आहे.

या चित्रपटात गाणी आहेत पण ती आवश्यक तिथेच येतात. प्रसंगानुसार संगीतबद्ध केलेली गाणी आपल्याला चित्रपटात गुंतवून ठेवतात. संदिप कुलकर्णी व अमृता खानविलकरवर चित्रीत केलेलं चित्रपटातील सर्वात पहिलं गाणं वातावरणातील गूढपणा आणखीनच गडद करतं. त्यात बराचसा सहभाग ’हरिहरन’ यांच्या आवाजाचा आहे. संदिप कुलकर्णी हे उत्तम अभिनेता म्हणून ओळखले जात असले, तरी त्यांना नाचगाणं करताना कुणी पाहिलं असेल असं वाटत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि देहबोलीला अनुसरून त्यांना दिलेल्या नृत्याच्या ’स्टेप्स’ नृत्यदिग्दर्शकाचा अनुभव व कसब दर्शवतात. अभिनयाचं म्हणाल तर, सर्वच कलाकारांनी आपापलं काम चोख केलं आहे. शेवट नीट पाहिलात तर हे वाक्य जास्त पटेल.
हिंदी चित्रपट निर्मात्यांनी गैर पाहिल्यानंतर आपला मोहरा मराठी चित्रपटांच्या दिशेने वळवला तर त्याचं नवल वाटायला नको. मुंबई पोलिसांनी संजय घोडावत यांनी निर्मित केलेला ’जेल’ पाहिलाच आहे. त्यांचीच निर्मिती असलेला ’गैर’ही अवश्य पहावा. आणखीही बरंच काही लिहायचं होतं पण लिहीता लिहीता रहस्यभेद नको व्हायला. इतकंच सांगेन, गैर पहाण्यात काहीच गैर नाही.
पायरेटेड शीडी>>> हा कोणता
पायरेटेड शीडी>>> हा कोणता नविन प्रकार शीडीचा... मला लाकडी आणि अॅल्युमिनियमची.. असे दोनच प्रकार माहिती आहेत..
इथे ज्याने त्याने आपापल्या
इथे ज्याने त्याने आपापल्या आवडीनुसार मत मांडले आहे. आपली आवड कशी आहे ते ओळखा आणि ठरवा पिक्चर बघावा की नाही ते! मित्रांसोबत / गृपमधे धमाल करायला जायचे असेल तर अवश्य जा, पण मेंदू घरी ठेवून.
धोबीपछाड या दिग्दर्शकाचा आहे
धोबीपछाड या दिग्दर्शकाचा आहे मग बरोबरे.. कसला टुकार सिनेमा आहे तो पण..
पण अग्निहोत्रच्या दिग्दर्शकाकडून मात्र खूपच अपेक्षा आहेत माझ्या
त्यामुळे त्याने असं कायतरी नाय करायला पायजेल
नंदू नको बघुस हा शिनुमा, कशाला पैसे वाया घालवतेस.. त्यापेक्षा नाटक बघ - बहुरुपी किंवा यु टर्न.
मला गैर अजिबातच नाही आवडला.
मला गैर अजिबातच नाही आवडला. एकतर संदीप कुलकर्णील रोमैन्टीक भुमिकेत बघताना त्रास होत होता. चित्रपट चकाचक असला तरी बहुतांश चित्रपट अपटणीय घटनाम्ची मालिकाच होती. आणि उगीच वेगळाच शेवट करायचा म्हणुन काहीही हा.
म्हणजे आता बघायलाच हवा हा
म्हणजे आता बघायलाच हवा हा सिनुमा
मी मुम्बईत असताना हा चित्रपट
मी मुम्बईत असताना हा चित्रपट पहण्यची सन्धी मिळाली. फरच सुरेख चित्रपट आहे. मला त्याची गाणी फार आवडली. हिन्दीच्या धाटणीचा आहे. पण असे शहरी मनोव्रुत्तीला रुचेल असे मरठी चित्रपट फार कमी आहेत. महाराष्ट्र टाइम्स मध्ये बातमि वचली कि अमेरीकेतही हा प्रकशीत होणार आहे. पण अजुन काही कुठे वचनात अले नाही? कोणाला काही माहिती आहे का?
सतीश राजवाडे सही आहे -
सतीश राजवाडे सही आहे - त्यामुळे बघायचाच आहे हा चित्रपट.
परत जाईपर्यंत भारतात असला म्हणजे मिळवलं.
अरे वा! चांगली बातमी आहे.
अरे वा! चांगली बातमी आहे. मुलांना घेऊन बघण्यासारखा आहे का?
तुमची मुले हिन्दी धारावाहिके
तुमची मुले हिन्दी धारावाहिके पहात असतील तर त्याना फारच बाळबोध वाटेल.
मला तरी तो आकशेपार्ह्य वाटला नाहि. मराठी नायक फरारी गाडी आणी हेलिकोप्टर चालवतो हे पहिल्यान्दीच पाहीले. गरज नव्हती पण सुखवलो! सतिश राजवाडे यान्चे दिग्दर्शन छान आहे.
म्हणजे आता बघायलाच हवा हा
म्हणजे आता बघायलाच हवा हा सिनुमा ..मलापण ..कोन येतय ?
>>मराठी नायक फरारी गाडी आणी
>>मराठी नायक फरारी गाडी आणी हेलिकोप्टर चालवतो हे पहिल्यान्दीच पाहीले. गरज नव्हती पण सुखवलो!>> अगदी, हेलीकॉप्टर पण दिसले
घोडावत साहेबांनी बराच पैसा खर्च केलाय.
मी गैरची गाणि ऐकली आणि मला
मी गैरची गाणि ऐकली आणि मला वाटल की मी बॉलिवूड मधल्या हिंदी सिनेमाची गाणि ऐकतेय. एकदम कॅची आहेत!
गैर या शुक्रवारी न्यु जर्सी
गैर या शुक्रवारी न्यु जर्सी आणि सॅन होजे ला रिलिज होतोय. अमेरिकेतल्या १८ शहरांमध्ये हा सिनेमा येतोय. सहीच बातमी आहे.
LA area मधे येणार आहे का गैर
LA area मधे येणार आहे का गैर ?
पाहिला मागच्या वीक एंड ला
पाहिला मागच्या वीक एंड ला !


जसा 'गैर' सुरु झाला तसा इथे ७.२ रि.स्के. भूकंप.. थिएटर मधले लोक मराठीत ४ डी चित्रपट निघाला कि काय म्हणून खुष झाले
मग जरा जास्त च गदागदा खुर्च्या हलतायेत म्हणून भूकंप आहे ते कळलं आणि टायटल्स येतयेत तोवर सगळे बाहेर जाव् लागलं, पहिली ५ मि सोडून पुढचा 'गैर' पहायला मिळाला.:)
बर्याच जणांनी इथे लिहिलय त्या प्रमाणे शेवट पर्यन्त उत्सुकता ताणून नंतर मात्र बर्या पैकी एकता कपुर स्टाइल झाला गैर !
असो.. शेवटी काय आज काल आपेक्षा कमीच असतात, जो शेवट पर्यन्त पाहिला जावा एवढीच माफक आपेक्षा असते आज काल !
अमृता खानविलकर आवडली, मस्त दिसते ..एकदम ग्लॅमरस.., चांगल केलय अॅक्टिंग पण आणि पूर्वी पेक्क्षा बर्या पैकी मराठी सुधारलय !
मला न पटलेल्या गोष्टी:
कास्टिंग मधे गोची झालीये.. एक तर गाणी नकोच होती आणि टाकयचीच होती तर सन्दीप कुलकर्णी कडून सालसा वगैरे करून घेण्याचे, हनीमुन ला रोमॅन्टिक गाणी गात बागडण्याचे केविलवाणे मोह टाळायला हवे होते !
त्याच्या ऐवजी मग श्रेयस तळपदे जास्त शोभला असता तिथे.
अंकुश चौधरी पण कमालीचा बवळट दिसतो.. असेना का उंच वगैरे पण मुळात चेहेर्यातला आणि वागण्यातला बावळट पणा कसा जाईल.. तो रोल त्याला मुळीच शोभला नाही.. समीर धर्माधिकारी शोभला असता तिथे :).
.................... स्पॉयलर वॉर्निंग................................................................
शेवट धक्का द्यायच म्हणून अगदीच एकता कपुर टच दिलाय.. आणि ते ३ दा प्लॅस्स्टिक सर्जरी प्रकरण तर हाइट.. ते पाहून मला नमस्ते लंडन मधला सीन आठवला.. कट्रिला लग्ना साठी मुल् पहायला जाते तेंव्हा तो सास बहु सिरियल फॅन मुलगा म्हणतो न " मेरी तीन बार प्लॅस्टिक सर्जरी हो चुकी है" तसच झालं हे
खरयं, गैर चा शेवट कायच्या काय
खरयं, गैर चा शेवट कायच्या काय आहे, सिनेमात आहे नाही तो एकतर पोलीसात तरी दाखवलाय नाहीतर व्हीलन तरी


आम्ही हा सिनेमा पुण्यात 'प्रभात' ला पाहिला दुपारी ३ चा शो. आमच्या मागे असाच एक मोठा काकूंचा गृप बसलेला आणि आमच्या बाजूला कॉलेजकन्यकांचा. त्या मुलींची सिनेमा सुरु होण्याआधी भरपूर किलबिल चालली होती.
मागच्या काकू एकदम स.पे सानुनासिक स्वरात त्या मुलींना म्हणाल्या, 'सिनेमा सुरु झाल्यावर एकदम शांतपणे पहायचा हं, अजीबात आवाज करायचा नाही'
तेव्हाच कळालं, सिनेमा वाईट निघाला तरी टीपी होईल हे नक्की
सिनेमा सुरु असताना त्या बिचार्या पोरी शांत होत्या पण जेव्हा जेव्हा अमृता खानविलकर चे सीन यायचे तेव्हा काकू पब्लीक बोलत होत्या 'काय मराठी नटया पण आजकाल असले तोकडे कपडे घालायला लागल्यात
गैर पाहिला. तसा भंपक असला तरी
गैर पाहिला. तसा भंपक असला तरी चांगला entertaining आहे. पहिल्या हाफ मधे सगळेच overacting करतात. संदिप कुळकर्णी जेव्हा हसत नसतो तेव्हा हिरो आणि हसत असला की व्हिलन दिसतो.
प्लस पॉईंट म्हणजे चित्रपटाचा चांगला राखलेला वेग.
and guys, i really don't mean to insult amrita khanwilkar, पण बर्याच angles नी ती मल्लिका शेरावत सारखी दिसते.
>> पण बर्याच angles नी ती
>> पण बर्याच angles नी ती मल्लिका शेरावत सारखी दिसते.>>
अनुमोदन.
मला ती दुसरी हिरोईनसुध्हा ग्लॅमरस वाटली.
शेवट गंडलाय.
>अंकुश चौधरी पण कमालीचा बवळट दिसतो.. असेना का उंच वगैरे पण मुळात चेहेर्यातला आणि वागण्यातला बावळट पणा कसा जाईल.. तो रोल त्याला मुळीच शोभला नाही.. समीर धर्माधिकारी शोभला असता तिथ>>>
अनुमोदन. अंकुश पोलिस वाटतच नव्हता. पिक्चर चालू असताना मी नवर्याला सांगितले की, संदीप पोलिस हवा होता आणि अंकुशला अमृताचा नवरा असायला हवे होते. पाहतो तर काय क्लायमॅक्सला.... हम्म,हे सिक्रेटच राहू दे, चित्रपट न पाहिलेल्या माबोकरांसाठी
मला चित्रपटाचा वेग कमी वाटला, बर्याच ठिकाणी दृष्य ताणली होती.
मला हा चित्रपट लय आवडला बा.
मला हा चित्रपट लय आवडला बा. संदीप कुलकर्णी ची चाहती असल्यामुळे जास्त आवडला. अगदी शेवट पण आवडला. मला वाटले मराठी म्हणजे साधेसुधे असेल पण यक्दम स्टायलीश पिक्चर!! हिरवीन पण मस्त.
प्रेडिक्टेबल आहे. पण थोडा
प्रेडिक्टेबल आहे. पण थोडा विचार केला तर असं वाटलं कि रहस्यप्रधान कथा लिहायला बाकि तरी काय राहीलंय हल्ली ? आणि व्योमकेश बक्षी सारखं साध्या साध्या कथांमधून देखील खिळवून ठेवणारं रहस्य फुलवता येतं हे ग्लॅमर वाल्यांना कळूनही वळत नाही. प्लॅस्टिक सर्जरी ने एकदम दुस-या माणसाचा चेहरा लावणे ( हाडांची ठेवण बदलून) वगैरे सीआयडी फुकटात बघतो म्हणून सहन केलं जातं.
.
हेकायनितेकायच्या पोस्ट्ला
हेकायनितेकायच्या पोस्ट्ला पूर्ण अनुमोदन. मला अगदी हेच वाटलं होतं गैर पाहिल्यानंतर.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=4DpwgEANpwM
फुकट बघा.
गैरचं रहस्य फारच पोकळ, बालिश
गैरचं रहस्य फारच पोकळ, बालिश वाटलं.
Pages