एग्झॅम माझी चालू होती, बर का वैशूमावशी
अभ्यासातनं मला नवती फुरसत म्हणुन कशी !
तश्शी, जशी आर्या होती बिझी, नाइ का तेव्हा ?
सांगा मं मी तुमच्याशी बोलणार होते केव्हा?
संपत आली आता, उद्या पेपर आहे लास्ट
उद्यानंतर असेन फ्री बोलायला बिन्धास्त
काल होता बर का माझा ड्रॉइंगचा पेपर
काढाय्चे होते शीवाजीम्हाराज घोड्यावर
तेवढे काढुन आणखिनपण काढला एक किल्ला
झेंडा सुध्दा काढुन त्याच्या रूफवर ठेवला
म्हाराजांना फायटिंगला जायची होती घाई
म्हणुन दारात उभ्या केल्या म्हाराजांच्या आई
म्हाराजांच्या तोंडापुढं काढला फुगा मोठा
आणि मग फुग्यात लिहलं "मासाहेब, टाटा"
निशा मॅडम हसल्या, म्हटल्या, "लव्हली, इट्स फाईन"
आउट ऑफ टेन, मार्क त्यांनी मला दिले नाईन
आईईग्ग! आहे आरिथ्मॅटिक पेपर अजून बाकी,
आजोबांच्या मते मला झीरो मार्क नक्की
पेपरमध्धे सम्स नकोत यायला म्हणजे झालं
एवढ्यासाठी गॉडला मी आइस्क्रीम प्रॉमिस केलं
-तुमची बनुताई
शिवाजी महाराज माँसाहेबांना
शिवाजी महाराज माँसाहेबांना टाटा करत असल्याचे पाहून घोड्यालाही हसू आले आहे असे दिसते. चित्र आणि कविता दोन्ही छान.
केवढं गोड चित्र !!! कसली
केवढं गोड चित्र !!! कसली सुरेख कवीता आहे. आणि तेवढीच गोड बनुताई आहे तुमची.
कोणी काढलय ते चित्र?
किती निरागस.. कविता अन चित्र
किती निरागस.. कविता अन चित्र दोन्ही.. बनुताई सारखेच गोड गोड..
शिवाजी महाराज माँसाहेबांना
शिवाजी महाराज माँसाहेबांना टाटा करत असल्याचे पाहून घोड्यालाही हसू आले आहे असे दिसते.>> अगदी
बनुताई आहे तरी कोण? किती गोड आहे, माझ्याकडुन तिला एक गोड गोड पापा आणि खूप सार्या शुभेच्छा. बनुताई माझ्या आवडत्या दहात. १० पैकी १० गुण
मस्त कविता आहे, मजा आली
मस्त कविता आहे, मजा आली वाचायला
कविता आणि चित्र दोन्ही पण खुप
कविता आणि चित्र दोन्ही पण खुप छान.
चो च्वीट !
चो च्वीट !
लहान मुल होउनच
लहान मुल होउनच त्यांच्यासारख्या कविता सुचू शकता... तुमच्यातल्या लहान मुलाला प्रणाम.. बनू ताइच्या सर्वच कविता इतक्या छान आहेत की त्यांचा पुरेसा संग्रह झाल्यावर कोणत्याही प्रकाशकाकडे नेल्यास आम्हाला त्या पुस्तक स्वरुपात वाचायला नक्कि मिळू शकतील....
मस्तच! कविता आणि
मस्तच! कविता आणि चित्रही!!
घोडा तर फारच छान हसतोय
सर्वांचे पुन: एकदा आभार !
सर्वांचे पुन: एकदा आभार !
नाद खुळा.....
नाद खुळा.....
काय गोsssssssssड कविता आणि
काय गोsssssssssड कविता आणि चित्र !!! मासाहेब टाटा खासच!
खुप आवडलि. बनुताइंना नेहमि
खुप आवडलि. बनुताइंना नेहमि भेटायला आवडेल
>>मासाहेब, टाटा टू मच!
>>मासाहेब, टाटा
त्यामानाने बनूताईचे शिक्षक भाग्यवान! ह्या बनूताईंच्या आणखी कविता आहेत काय? कुठे मिळतील वाचायला?
टू मच! लहानपणी काढलेली चित्रं आठवून माझ्याच पोटात गोळा येतो. शिक्षकांचं काय झाले असेल देवाला ठाऊक
सर्वांचा आभारी
सर्वांचा आभारी आहे.
बनुताईंच्या आजपर्यंतच्या सगळ्या कविता तुम्हाला माझ्या ब्लॉगवर वाचायला मिळतील. दुवा पुढे देत आहे.
http://mukundgaan.blogspot.com/
मुकुंद कर्णिक
मासाहेब टाटा ... खुपच गोड
मासाहेब टाटा ...
खुपच गोड आहे कविता.
मस्तच आहे कविता. क्युट!!!
मस्तच आहे कविता. क्युट!!!
सुन्दर. एक मार्क का कापलाय हे
सुन्दर.
एक मार्क का कापलाय हे समजलं नाहि !
कदाचित महाराज डावखुरे
कदाचित महाराज डावखुरे असल्याचं दाखवलंय म्हणून असेल !!
बनुताई, तुझी कविता खूप आवडली
बनुताई, तुझी कविता खूप आवडली बघ! तू काढलेलं चित्र पण मस्त आहे अगदी! मी तर त्याला पैकीच्या पैकी मार्क्स दिलेत. तुला माझ्यातर्फे ही छोटीशी भेट!
मासाहेब टाटा सहीच!
मासाहेब टाटा सहीच!
सुंदर.... एकदा ह्या गोड
सुंदर....
एकदा ह्या गोड बनुताईंनी काढलेले स्वतःचे ड्रॉईंगही टाका ना....
मुकुंदजी, मला खरंच तुमच्या या
मुकुंदजी, मला खरंच तुमच्या या मानसकन्येला बनूताईला एकदा भेटायचे आहे. तिच्यासाठी खुप सार्या गिफ्ट्स आणायच्या आहेत. फारच निरागस आणि सुंदर कविता.
पेपरमध्धे सम्स नकोत यायला म्हणजे झालं
एवढ्यासाठी गॉडला मी आइस्क्रीम प्रॉमिस केलं>>>
अगदी एखादी निरागस लहान मुलगी बोलते आहे असे वाटते.
हॅट्स ऑफ टू यू मुकुंदजी!
व्वा मस्त आहे चित्र अन्
व्वा
मस्त आहे चित्र अन् कविता पण
मी नेहमीप्रमाणेच लेटलतीफ.
मी नेहमीप्रमाणेच लेटलतीफ. मस्त आहे कविता आणि बनुताईंच चित्रही.
एकदमचं मस्त बनुताई..... खूप
एकदमचं मस्त बनुताई.....
खूप क्युट..........
छान आहे.......
छान आहे.......
मस्त .
मस्त .
आज पुन्हा वाचली मस्तच आहे..!!
आज पुन्हा वाचली मस्तच आहे..!!
किती गो$$$$$$$$ड...
किती गो$$$$$$$$ड...:हहगलो:
Pages