Submitted by कौतुक शिरोडकर on 31 October, 2009 - 14:25
(जयंतरावाच्या प्रतिभाकणांना (http://www.maayboli.com/node/11580) लाभलेला एक फुकटस्पर्श.... टाळता येत नाही.... करणार काय ? माफी असावी.)
ना ईश्वरास जमले ना राक्षसास जमले
ते हट्ट बायकोचे ना पुरविण्यास जमले
कल राखता तिचे तो नवरा करी दवंडी
'ते दोन चार शालू ना या खिश्यास जमले'
अवगत अनेक होत्या भाषा तया, परंतु
भाषेत रूसण्याच्या ना बोलण्यास जमले
बस,पाहिले तिला अन् तेथेच थांबला तो
तेथून 'सेल'कर्त्या ना टाळण्यास जमले
दिन रात मॉल सारे फिरता तिच्याच मागे
एकातही विसावा ना शोधण्यास जमले
जी लाभली तया ती अमावस्या असावी
काळोख भाग्य झाले ना विझवण्यास जमले
गुलमोहर:
शेअर करा
हाहाहाहा...
हाहाहाहा...
(No subject)
शरद
शरद
हेहेहेहेहे.. ह ह पु वा..
हेहेहेहेहे.. ह ह पु वा..
जयंतदा..... आता बोला!
जयंतदा..... आता बोला!
काय बोलणार? गेलो बोलण्या, परी
काय बोलणार?
गेलो बोलण्या, परी झाकले मुख तिने
सांधणे तुटला जबडा, न डॉक्टरास जमले
मस्तच :)
मस्तच


(No subject)
मस्तच !!!!
मस्तच !!!!