उद्या मी नसेन तरी

Submitted by वर्षा_म on 28 October, 2009 - 05:01

उद्या मी नसेन तरी कुणाचे काही बिघडणार नाही
माझ्यावाचुन कुणाचेही काम अडणार नाही
दोन दिवस लोक माझ्याविषयी बोलतील
पुर्वी वाईट म्हणनारेही चांगली होती म्हणतील

दहा दिवस घरातलेही सुतक पाळतील
मग हळुहळु आपल्या कामाला लागतील
काही दिवस जयंती पुण्यतिथी ठेवतील लक्षात
नंतर माझी आठवण फक्त पित्रुपक्षात

भिंतीवरचा फोटो आता जुना वाटु लागेल
नविन furniture बरोबर जरा odd च वाटेल
दिवानखान्यातून आता त्याला आतल्या खोलीत हलवतील
हळुच कुनीतरी त्याला अडगळीत टाकतील

गुलमोहर: 

दक्षिणा अगदी बरोबर बहुतेक करून नगर औरंगाबादला असे शब्दप्रयोग वापरतात - मी जाईल, मी करेल, खाईल....
आपल्या राज्यात सगळीकडे वेगवेगळी धाटणी आहे मराठि भाषेची सगळ्या खटकतात का तुला ?
आणि वर्षा कुणासठिहि आपण originality सोडु नये असं मझं प्रामाणिक मत आहे
आणि तसंही नगर औरंगाबादची भाषा कही इतकी वाइट नाहि
प्लिज राग मानु नका मैत्रिणिंनो

दक्षिणा अगदी बरोबर बहुतेक करून नगर औरंगाबादला असे शब्दप्रयोग वापरतात - मी जाईल, मी करेल, खाईल....
आपल्या राज्यात सगळीकडे वेगवेगळी धाटणी आहे मराठि भाषेची सगळ्या खटकतात का तुला ?
आणि वर्षा कुणासठिहि आपण originality सोडु नये असं मझं प्रामाणिक मत आहे
आणि तसंही नगर औरंगाबादची भाषा कही इतकी वाइट नाहि
प्लिज राग मानु नका मैत्रिणिंनो

मला कविता खरच खुप भावली. मी येथे थोडी नविनच आहे, पण तरी सांगते, कविता अधुरी वाटते. म्हणजे शेवटच कड़व वाचताना असे वाटते पुढे काही तरी आहे.

भरलेल्या "मायबोलीवर" अशी कविता करु नये >>> Rofl

सारंगी Happy

अनामिका खरच मी ही विचार करेल यावर. Happy

प्रतिसादासाठी धन्यवाद Happy

मी जाईल, मी करेल /करील, खाईल....
हे शब्द फक्त औरंगाबादकडेच वापरतात असे नाही तर हे शब्द सार्वत्रीक वापरात आहे.
जन पळभर म्हणतील की म्हणतीन..??
म्हणतील आणि म्हणतीन दोनही बरोबरचं.
पण आपण लिहीतांना शक्य तेवढे - जास्तीत लोकांची जी भाषा ती प्रमाण भाषा - समजुन लिहीने श्रेयस्कर असे मला वाटते. Happy

.

.

.

सही!

अगदी बरोबर ओळखलत मला.. मी नगरीच आहे..>>>>>

मग अज्जिबात बदल करू नकात तुमच्या शब्दान्च्या अस्सल ढन्गात
कुणितरी पुण्या- मुम्बईत बसून सान्गावे की कानाला खटकतेय वगैरे ; आणि आपण "जी हुजूर....जी हुजूर!!" करावे ???? अशाने का मराठी भाषेचे सन्वर्धन होणार आहे ??

............................................................................................
जन पळभर म्हणतील हाय हाय!>>>>>१०० % सहमत!!

Pages