पुण्यातून...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

रंगीबेरंगी चे सभासदत्व सुरुवाती पासून आहे. पण आत्ता लिहावसं वाटत आहे. निमित्त Superbowl XLII चं. आत्ताच पुण्यातले पुणेकर वर मुकुंदने अश्विनी ची "समजुत" काढलेली वाचली :o)

Jan 13, 2008 ला Bloomington, IL मधला गाशा गुंडाळुन पुण्यात परतलो. तेव्हा Packing आणि कन्येला सांभाळण्यात NFL वर जरा दुर्लक्ष झालं. पुण्यात आल्यावर playoffs चे निकाल internet वर वाचले. Superbowl बघायला मिळतो, असं नात्याने मागे एकदा सांगितले होते. म्हणुन ESPN, STAR च्या websites वर programming schedule बघितले. पण दोन्ही channels वर Superbowl चा उल्लेख फक्त बातम्यां मधे होता. मग परवा Ten Sports वर कुठली तरी क्रिकेट match बघत होतो. तिथे Superbowl ची जाहिरात झाली. सोमवारी पहाटे साडे चार वाजता गेम दाखवणार असल्याचं कळलं. मग काय, ४:३० चा गजर लावला. तसा नसता लावला तरी चाललं असतं. अनया मुळे जागा झालोच. तिला तिचा "4:30 am snack" (म्हणजे दूध :o)) दिल्यावर लगेच झोपली पण. मी काही परत झोपणार नव्हतो. बाहेर जाऊन TV लावला. Jordin Sparks राष्ट्रगीत म्हणायला उभी राहिलीच होती!

Eli Manning च्या Giants तब्बल १० मिनिटे खाल्ली पहिल्याच possession मधे. Half time ला स्कोअर Patriots ७-३ Giants. मग माझी office ला जायची तयारी चालु केली. ८ वाजता बाहेर पडता पडता Pats ने lead घेतला 14-10. Office मधे जाऊन आधी CNN वर बघितलं तर एक सुखद धक्का मिळाला! Happy

मला वाटतंय Giants deserved the win! Pats जरा complacently खेळले. Overall, it was a good Championship game!

चला, Superbowl च्या निमित्ताने रंगीबेरंगी मधे लिहायला सुरुवात तरी झाली. :०)

विषय: 
प्रकार: 

Eli Manning च्या Giants तब्बल १० मिनिटे खाल्ली पहिल्याच possession मधे.

जास्तीत जास्त वेळ आपल्या संघाकडे जर चेंडू राहिला, तर प्रतिपक्षाला टचडाऊन करायला कमी संधी मिळते.
नि त्यांचे डिफेन्सचे लोक लवकर दमतात. त्याचा फायदा शेवटच्या १५ मिनिटात दोनदा टचडाऊन करायला झाला. बिल पार्सेल ह्या अत्यंत प्रसिद्ध कोचची ही पद्धत आहे. सध्याचे पॅट्स नि जायंट्स चे कोच हे त्याचेच शिष्य.

पण शेवटपर्यंत मॅनिंग नि त्याचे लोक लढत राहिले. नि स्ट्रेहॅन नि त्याच्या लोकांनी ब्रेडी आणि कंपनीला पूर्णपणे निष्प्रभ केले.

>>जास्तीत जास्त वेळ आपल्या संघाकडे जर चेंडू राहिला, तर प्रतिपक्षाला टचडाऊन करायला कमी संधी मिळते.

हे आपलं उगीचच! पहिल्या दहा मिनीटात टचडाऊन करता आला नाही, फील्ड गोलवर समाधान मानावे लागले हे खरे कारण. Happy

असो. पेट्रीयटसच्या पराभवाची खरी कारणे अशी:
१) टॉम ब्रेडीचा दुखावलेला घोटा
२) Gisele Bundchen ची उपस्थिती

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे...

३) Bill Belichick ने घातलेला नवा लाल स्वेटशर्ट Happy

वा.. छान लिहिले आहे..

पेट्रियट्सना त्यांच्या पापाची फळे भोगायला लागली.. Happy