Submitted by poojas on 1 February, 2008 - 04:27
जागृत नयनी स्वप्नं पाहते..
स्वप्नांचा मज छंद..
उभ्या जीवनी कधी मिळेना..
पूर्तीचा आनंद..
स्वप्नंफुलातील मधुकण वेचे..
मनातला मकरंद..
या पुष्पातून ..त्या पुष्पावर..
स्वप्नकळ्यांचा गंध..
भ्रमरछंदी मन कधी न टिकले..
एका स्वप्नं फुलावर..
स्वप्नसडा जो विखरुन गेला..
हुंगण्यास तो अनावर..
त्या स्वप्नांची अवीट गोडी..
अलौकीक माधुरी..
पूर्णत्वातील स्वप्ने काही ..
काही स्वप्ने अधुरी..
जरी अधुरी जीर्ण पुराणी
तरी तराणे नवे..
उमेद इच्छा सबुरी..
आणिक आकांक्षांच्या सवे..
अपूर्णतेचा शोध लावण्या..
मी ही मिलिंद व्हावे..
लाभून तृप्ती स्वप्नपूर्तीची..
सौख्ये विलीन व्हावे..!!!
गुलमोहर:
शेअर करा
स्वप्न
शेवटचं कडव छान आहे. आभारी आहोत.
आवडली
खूपच छान!
गोडी अपूर्णतेची :)
झक्कास ग!
लिखते रहो आम्ही वाचतोय
सुंदर
सुंदर कविता, अभिनंदन !!!