भारत महासत्ता बनेल ? चिन आडवा येतोय!

Submitted by राजे on 14 October, 2009 - 03:08

अब्दुल कलामांचं २०२० किंवा आपण प्रत्येक्ष अनुभवनारे आर्थिक बदल, सेवा क्षेत्रातिल आपलं योगदान, अटोमोबाईल कंपन्याची भारतात होणारी भरभराट, सॉप्टवेअर क्षेत्रातिल आपली कामगिरी, आणी इतर बरेच क्षेत्रात भारताने मागिल १०-१५ वर्शात केलेली कामगिरी बघता महासत्ता नाही तर किमान टॉप १० मध्ये तर नक्किच आपला क्रमांक लागेल व तो नेहमीसाठी अबाधीत (१ ते १० मध्ये) राहील. पण त्या साठी आजुन किमान १०-१२ वर्शे नक्कीच वाट बघावी लागेल.

चिनची पोटदुखी :
आताच पंतप्रधान अरुनाचल प्रदेशच्या प्राचार दौ-यावर गेल्यामुळे चिनने बरिच कुरबुर केली. म्हणे तो भारताचा भाग आहे हे अधिक्रुत रित्या केंव्हाच ठरले नाही. म्हणजेच त्यावर अपलाही अधिकार आहे हे चिनचे म्हणने. आणी आपले नेते सुद्धा भीगी बिल्ली सारखं मंद्रसप्तकातला कोमल "ग" धरुन सांगत सुटले कि अरुनाचल प्रदेश हा भारताचाच भाग आहे, मग चिन खोडी काढणार नाही तर काय ?
अरे असल्या क्रुत्यावर डरकाळी फोडुन सांगायच असतं.
"खबरदार! तो माझा प्रदेश आहे. वाकड्या नजरेनी पाहणा-यांचे डोळे काढल्या जातील" मग बधा पुन्हा कोणी अशी हिम्मत करेल का.
आत्ता पर्यंत फक्त पाकिस्तान आपली खोडी काढायचा, आपल्या संथ व अचेतन प्रतिकारामूळे नेपाळ मधिल माओवाद्या पाठोपाठ आता चिन सुद्धा आपली खोडी काढतोय. याला कारणीभुत आपलं सरकारच आहे.

भारत हा तरुणाचा देश आहे व सगळा तरुणवर्ग भारत्याच्या महासत्तेच्या दिशेने होणा-या वाटचालीत आपाअपल्या परिने योगदान देतच आहे. पण या योगदानचं योग्य फळ मिळण्यासाठी सरकारचंही योग्य सह्भाग व नियोजन असने तेवढच महत्वाचं आहे. जिथे खडसावुन बोलायला हवे तिथे खडसावायला शिकलेच पाहीचे आपल्या सरकारने. नाहीतर या तरुणानी मेहनतीने उभी केलेली सगळी उर्जा त्या पाक्या व चिन्यांसोबत लढता लढता संपायची, व महासत्तेचं स्वप्न, स्वप्नच राहायचा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताने युद्ध टाळावे. युद्धात पैशाची व जनसंपत्तीची अतोनात हानि होते. विशेषतः जे तरुण, हुषार, भारतप्रेमी, स्वाभिमानी लोक आहेत त्यांची.

पूर्वी मोठ्या युद्धांना राजे आधी स्वतः पुढे निघत व सैन्य त्यांच्या मागून. जसे छत्रपति शिवाजीमहाराज स्वतः रणांगणात उतरत, तसेच संभाजी महाराज सुद्धा. तर आता युद्ध झालेच, तर सर्व नेत्यांना, मंत्र्यांना, सर्वांना आधी समोर पाठवावे. काही नाही तर निदान जुनाट मतांचे, लाचलुचपत करणारे, हिंदूद्वेष्टे तरी आधी मारल्या जातील, मग तरुण लोक देशाचे संरक्षण करतील.

मला भारतीय तरुणांकडून फार फार अपेक्षा आहेत, नि फार फार विश्वास आहे की ते भारताला महासत्ता करतील.

पाकीस्तानशी युद्ध झालेच तर शक्यतो, त्यांच्या सेनापतीला, नेत्यांना सरळ लाच देऊन गप्प बसवा. कारण आपल्याला ते लोक भारतात यायला नकोत!

अमेरिकेकडे दुर्लक्ष करा. त्यांच्यासारखे बोलणे, वागणे वगैरे सोडा.

बाकी सर्व मस्त चालले आहे. २०२० पर्यंत नक्की महासत्ता होऊ शकेल.

माझ्यामते परराष्ट्रखाते अन सैन्यदलात धनू-वृश्चिक राशीचे मन्गळप्रधान लोक बसवा! Wink प्रश्न चुटकीसरशी सोडवले जातील Proud
चिनची कटकट कायमची थाम्बविण्यासाठी राहू शान्त करुन घ्या! जोडीला शनीमाहात्म्याचे पारायण आवश्यक!
नक्षलवाद्याना प्रश्न सोडविण्यासाठी दोन चार "अहिन्सावादी महात्मे" त्या एरियात सोडून द्या! जोडीला पन्चमुखी हनुमानावर अभिषेक करा.

(विसु. आमचे येथे सर्व धार्मिक कृत्ये गरजेनुसार करवुन दिली जातील)

मी मोठ्या गंभीरपणे लिहायला सुरुवात केली, पण इतरांचा मूड काही वेगळाच दिसतो आहे. तर मग वाचा:

नागपूरच्या डॉक्टरांना, तसेच इतर ठिकाणच्या निरनिराळ्या व्यावसियिकांना यज्ञाला बसवा. भारतातील संगणक प्रणालिकार, ज्यांच्याशिवाय अमेरिकेचे व्यवसाय चालत नाहीत, त्यांना आंतर्जालीय यज्ञ करण्याची प्रणाली लिहायला सांगा! नंतर अमेरिकेतले जे सगळ्यात घाणेरडे प्रकार असतील त्याची तंतोतंत कॉपी मारून तसे जीवन जगा! (शेवटचे सांगायला नकोच म्हणा, सध्या ज्या वेगात चालू आहे, तो वेग पहाता, भारत अमेरिकेहून पुढे जाईल. )

जर अमेरिकेसारखा देश चीनचं काही वाकडं करु शकला नाही , तर भारताच्या प्रगतीत चीन कसा काय आडकाठी घालु शकेल ?
आपल्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आपले तुंबडीभरु पुढारी .
असा एखादा मंत्र , यंत्र , तंत्र आहे का जेणे करुन सगळे पुढारी फक्त आणि फक्त भारताचचं भलं करतील व आपल्या तुंबड्या भरणे सोडतील ? Sad

<<असा एखादा मंत्र , यंत्र , तंत्र आहे का जेणे करुन सगळे पुढारी फक्त आणि फक्त भारताचचं भलं करतील व आपल्या तुंबड्या भरणे सोडतील ?>>

आहे, पण तो त्या पुढार्‍यांच्या खुर्चीत दडलेला आहे. म्हणूनच कित्येक वेळा पुढारी बदलले तरी तो मंत्र सापडतच नाही! कारण एकदा खुर्चीवर बसले की त्यांना तो मंत्र दिसणार कसा?

एक कळकळीची सूचना, श्री१२३. तुम्ही अमेरिकेत रहाता. तुम्हाला भारताबद्दल टीकात्मक लिहायची परवानगी नाही. अमेरिकेचे सगळे घाणेरडे जेव्हढे आहे, तेव्हढे सगळे, भारतीय लोक अहमहिकेने घेतील, पण सत्य सांगितलेले त्यांना आवडत नाही!

आता लवकरच इथे काही तरुण भारतीय इथे येऊन तुम्हाला तसे सांगतीलच, वर तुम्ही फट्टू आहात असेहि लिहीतील! स्वानुभव हो! तेंव्हा कातडी गेंड्याहून घट्ट नसेल, तर इथे भारताबद्दल खरे बोलू नका!

लालू शी सहमत. 'टॉप १० मध्ये यायचे' म्हणजे नक्की काय? ५० % मिळवणार्या विद्यार्थ्याने ७०% कसे मिळतील हे पहावे. ९०% ची अपेक्शा करणे अतिशयोक्ती. १-२ विषयात पैकी च्या पैकी आणि १-२ विषयात नापास असले तरी निकाल नापास हाच असतो. आगोदर या नापास विषयात पास व्हावे. मग पुढचा विचार करावा.

महासत्ता कशासाठी? अमेरिका आज जगातील महासत्ता आहे, म्हणजे सर्व सुखे हात जोडुन उभी आहेत कां ? अमेरिकेला कसलाच धोका नाही अशी समजुत आहे कां ? जगातील एकमेव महासत्ता असतांना देखील ९-११ झालेच नां? पुन्हा असे काही होणार नाही याची काही शाश्वती? अमेरिका पाकला अगदी भरघोस मदत करते, पण अमेरिकेचा मत्सर करणार्‍यांचे सर्वात जास्त प्रमाण पाक मधेच आहे.

मला भारत महासत्ता बनावे असे काहीही वाटत नाही. सर्व ११५ कोटी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण दिले तरि खुप झाले, ते कधी होणार? ३५% लोकं उपाशी असतांना महासत्ता बनायची स्वप्ने कशी बघु शकतो ?

सरक्षणाच्या क्षेत्रात परिस्थिती १९६२ पेक्षा खुप वेगळी आहे, पण तुलनात्मक दृष्ट्या आपण आजही चिनच्या जवळपासही नाही आहे.

१०-१५ वर्शात केलेली कामगिरी बघता महासत्ता नाही तर किमान टॉप १० मध्ये तर नक्किच आपला क्रमांक लागेल व तो नेहमीसाठी अबाधीत (१ ते १० मध्ये) राहील. पण त्या साठी आजुन किमान १०-१२ वर्शे नक्कीच वाट बघावी लागेल. >>>

हा १०-१२ वर्षांचा कालावधी मला तरी फारच कमी वाटतो. प्रगती झालीय यात शंका नाही, पण अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून साधारण २०० वर्षे लागलीत या स्थानाला यायला. सध्या भारतात आयटीमध्ये नोकरी करणारी जनता फक्त <१% आहे. आयकर भरणारेही अगदी कमी आहेत. ६०% शेतीवर/गावात जगणारी जनता रोज २० रु. पेक्षा कमीवर जगते असं माबोवरच कुठेतरी वाचलेय, नक्की आठवत नाही. शेतीसाठी पाण्याची सोय नाही. या वर्षी पाऊस कमी झाला तर सगळयांचे धाबे दणाणले.
लोकसंख्येची स्थिती वाढता वाढता वाढे अशी आहे. रस्ते कमी आणि गाड्या जास्त- नॅनोनंतर अनेक उत्पादक छोट्या गाड्या बनवायला तयारच आहेत. गाड्या कुठे हवेत चालवणार का? मुंबईला आमच्या बिल्डींगबाहेर पडून कोपर्‍यापर्यंत गेलं की पहिला ट्रॅफिक जाम लागतो आणि नंतर अनेक लागतात. नक्षलवाद आणि आतंकवाद यावर अजून काहीही ठोस उपाय सापडला नाहीये. धान्य, भाज्या आणि दूध यांचे भाव आकाशाला भिडलेत.

बहुतेक सगळे पुढारी खा खा पैसे खातात. आणि त्यांचीच पोरंटोरं परत उभी राहतायेत. गावाकडे गेलं की रस्ताच्या कडेच्या झोपड्या/भिकारी, त्यांचे खोल गेलेले डोळे आणि पोटं बघून यांच्यापर्यंत 'प्रगती' कधी येणार असं वाटतं.

उगाच आपला देश म्हणून वा वा करू नका. देशाबद्दल अभिमान आणि प्रेम असणे साहजिकच आहे, पण सत्य परिस्थिती जाणून घ्या. मी जे काय लिहिलंय ते डोळ्यांनी दिसलेलंच लिहिलंय. आणि त्यावर 'तुम्ही आम्ही काय केलंय हे विचारु नका, कारण काय केलं की हे सगळं अचानक सुधारेल हे कुणालाही सांगता येईल असं वाटत नाही.

मला भारतात १०-१२ वर्षांत इतकी सुधारणा होईल असे वाटत नाही, बरीच वर्षे लागतील.

उदयशी सहमत- सर्व ११५ कोटी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण दिले तरि खुप झाले, ते कधी होणार? ३५% लोकं उपाशी असतांना महासत्ता बनायची स्वप्ने कशी बघु शकतो ?>>

आणि झक्कींशी पण- नंतर अमेरिकेतले जे सगळ्यात घाणेरडे प्रकार असतील त्याची तंतोतंत कॉपी मारून तसे जीवन जगा! (शेवटचे सांगायला नकोच म्हणा, सध्या ज्या वेगात चालू आहे, तो वेग पहाता, भारत अमेरिकेहून पुढे जाईल. )