शिवनेरी २

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

त्या वास्तूच्या सज्ज्यामधून दिसलेले दृष्य. सहज मनात विचार आला, जिजाबाईने बाल शिवबाला, शिवबा बघा बरं हा आपला मावळ. आपला व्हायला हवा असे म्हणत हेच दृष्य दाखवले असेल का ?

shivneri_260108_058.jpg

विषय: 

जिजाबाई आणि शिवबाने येथून हेच दृश्य पाहिले असेल हा फार थरारक विचार आहे. फक्त एकच शंका अशी की शिवाजी महाराज असा संवाद होण्याच्या वयाचे व्हायच्या आधीच पुण्यात आले ना? नक्की आठवत नाही, पुस्तक पुन्हा वाचायला पाहिजे.

दिनेश दादोजी कोंडदेवांचा वाडा पाहिला का?

अरे बोलायला वयाची काय गरज. आपण नाही का आपल्या मुलांना लहानपणी काय बोलतो ते त्यांना थोडीच कळते. लहानपणी कदाचीत जिजाऊ ने तसे म्हणले पण असेल.

स्वराज्याचे स्वप्न शहाजी आणि जिजाबाई दोघानी बघितले होते. त्याचा ध्यासच घेतला होता. त्या हेतुनेच तिने शिवाजी घडवला. अगदी लहानपणापासून तिने असा संवाद साधला असल्याची दाट शक्यता आहे.

असो दादोजींचा वाडा कुठे आहे ?

दिनेश तो तेथे जवळच आहे, जुन्नर मधे. मीही जुन्नर, शिवनेरी ला गेलो आहे पण हा वाडा लांबूनच बघितला आहे, तेथे नक्की काय आहे माहीत नाही.

केदार, पटले.

वास्तविक शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांच्या गुरूंचा वाडा या गोष्टी असलेल्या ठिकाणी एखादा काहीही माहीत नसलेला जरी गेला तरी त्याला कळाले पाहिजे की आपण कोठे आलो आहोत, पण या भागात तसे काहीच जाणवत नाही. किमान एखाद्या कंपनीने 'शिवाजी टूर' काढून शिवनेरी, जुन्नर, पुणे (लाल महाल वगैरे), राजगड, रायगड असे करत एखादा जाणकार गाईड वापरून सर्व माहिती दिली आणि नंतर एखाद्या थिएटर मधे पेटार्‍या तून पळण्याचा शो वगैरे त्यात घातला तर मला वाटते भरपूर प्रतिसाद मिळेल.

अमोल, आजच वाचल. भन्नाट आयडिया आहे "शिवाजीमहाराज टुर"ची. कारण दादोजींचा वाडा मलाही माहित नाही बर्‍याचदा जुन्नरल जाऊनहि.

दिनेश भाई,
फोटोत खालच्या बाजूला कोणते ' महाराज' दिसत आहेत? Happy
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....