..

Submitted by मधुकर on 13 October, 2009 - 02:03

..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

वसंतदादा पाटील बहुधा चौथी पास होते..... डिग्री घेतलेल्यांची डिग्री तरी खरी का खोटी हे कसे ठरवणार........... गेल्या वर्षीच ठाणा की मुम्बईत कुणाच्या तरी डॉक्टरेट वरुन गदारोळ झाला होता.... किमान पात्रता सक्तीची केली तरी लोक एक्स्टर्नल बी ए, बी कॉम, एल एल बी अशा डिग्र्या कुठून तरी मिळवतीच... तुम्हा आम्हाला मात्र आपापल्या डिग्र्या कष्टानेच मिळवाव्या लागतील.. Happy

बाकी , लेख वाचून फार बरे वाटले..... मला वाटले होते शेवटी ' जास्त डिग्री असलेले लोक ब्राह्मण/ भाजपाचे आहेत आणि त्यांच्यामुळे बाकीचे दहावी पासच राहिले आहेत, किती ही सामाजिक विषमता .. वगैरे', असे काही तात्पर्य काढता की काय.. ! Happy

मधोबा, तुम्ही या राजकारणी लोकांच्या सोबत एकदा वावरून बघा. आणि मग बोला. तसेच इ क्यू (EQ Emotional Quotient )या मानसशास्त्रातील संकल्पनेचा जरा अभ्यास करा. औपचारिक शिक्षणाचा आणि व्यवहाराचा संबंध असतोच असे नाही. बहुधा तो नसतोच. उद्योग पती होन्डा यांचे एक वाक्य मला नेहमी आठवते 'शिक्षण तर हवेच पण पदवीला फारसा अर्थ नसतो.' जे आर डी टाटा यांचे शिक्षण फ्रेंच मधून झाले. पन त्याना पदवी काही कारणांमुळे घेता आली नाही. जे आर डी एका अर्थाने स्वतःच एक विद्यापीठ होते. त्याना आपल्याला पदवी नाही ही खन्त मात्र शेवटपर्यन्त वाटत असे. निदान ते तसे म्हणत :). तुम्ही एखाद्या नोकरीच्या उमेदवाराच्या इन्टरव्यू घ्यायला बसून बघा मग तुम्हाला हे डिग्री होल्डर किती पाण्यात असतात तेही कळेल. राजकारण्यांचे किस्से तर फार सांगता येतील मला. पण एक अनुभव सांगायचा मोह आवरत नाही..
भाउसाहेब थोरात नावाचे एक पुढारी नगर जिल्ह्यात आहेत . आता त्यांचे वय ८५ च्या आसपास आहे. कृषीमन्त्री बाळासाहेब थोरातांचे ते वडील . ते एकदा आमदारही होते. साखर कारखान्याचे ते चेअरमनही होते.म्हणजे आता टिपिकल टोपीवाला ग्रामीण पुढारी तयार झाला की नाही? ते बहुधा हायस्कूल पर्यन्त शिकलेले असावेत.दूध संघ, कुक्कुट पालन संघ वगैरे संस्थाही त्यांच्या आहेत.
१९९२ साली कुठल्याशा एका स्थानिक कार्यक्रमात मी त्यांच्या बरोबर होतो.त्यावेली (१९९२ साली म्हणतोय मी.) त्यानी त्यांच्या भाषणात सांगितले.की , ''मित्रहो , मी नुकतेच वीणा गव्हाणकर नावाच्या बाईंचे एक होता कार्व्हर हे पुस्तक वाचले. ते पुस्तक इतके चांगले आणि शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे की ते पुस्तक टेक्स्ट् बुक म्हणून शाळांतून लावले पाहिजे.'' त्यावेळे तसे ते पुस्तक नवे होते आणि नुकतेच गाजू लागले होते.मीही म्हटले असेल चांगले पुस्तक .या पुढार्‍याना अतिशयोक्ति करायची सवय असतेच.

वाचू वाचू म्हणता म्हण्ता ते पुस्तक माझे वाचायचे राहून गेले. ते पुस्तक गाजतच होते त्याच्या आवृत्यावर आवृत्या निघत होत्या. मी मात्र ते वाचत नव्हतो. पन त्या पुस्तकाचा विषय आला की थोरातांच्या भाषनाची आठवण यायची. ज्या अर्थी पुस्तक गाजतेय त्या अर्थी ते नक्कीच चांगले असले पाहिजे असेही वाटायचे. शेवटी २००० साली मी ते वाचले. आणि केवळ थक्क होऊन गेलो . कार्व्हरच्या आयुष्याने आणि थोरातांच्या गुण ग्राहकतेनेही. आश्चर्य म्हणजे पुणे विद्या पीठाने खरोखरच ते पुस्तक २००२ साली बी ए. ला टेक्स्ट्बुक म्हणून लावले. म्हनजे भाउसाहेब थोराताना जी गोष्ट १९९२ ला कळली ती मला २००० साली आणि विद्यापीठाला २००२ ला कळाली. माझ्या साहित्यप्रेमाचा अभिमान ही खाडकन उतरला. या मंडळींची विधानसभेतील व इतरही भाषणे ऐकण्याचा प्रसंग येतो तेव्हा थक्क होऊन जायला होते.
सगळेच अभ्यासू असतात असे नाही.पण इतर क्षेत्रातल्या सारखेच वेगवेगळ्या दर्जाचे लोक येथेही आहेत. औपचारिक शिक्षणाचा आणि त्यातल्या त्यात डीग्रीचा तर त्याच्याशी अजिबात संबंध जोडू नये.

माझ्या माहितीप्रमाणे--

विनायक निम्हण- डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग.
विकास दांगट पाटील- बी.ई. सिव्हिल
चंद्रकांत मोकाटे- ग्रॅज्युएट (कशात, ते माहिती नाही)
दीपक मानकर- एम.कॉम. (युनिवर्सिटीत यु.आर ही होता एकेकाळी)

माहिती जरा क्रॉसचेक करून टाकत गेलात तर बरे. मतदानाच्या दिवशीच नेमकी ही माहिती टाकून आपणांस काय साधायचे आहे?

इलेक्शन कमिशन च्या वेबसाईट्वर या मंडलीनी शिक्षणाबात केलेली प्रतिज्ञा पत्रे लोड केलेली आहेत . जिज्ञासूनी अवश्य पहावी.
येथे आधी क्लिका, नन्तर पुढे जा

http://220.225.73.214/pdff/affi.htm

साजिरा.

विनायक निम्हण
http://pune.nic.in/election/affidavits/209-%20Shivajinagar/VinayakNimhan...

दिपक मानकर

http://pune.nic.in/election/affidavits/210-%20Kothrud/deepak%20madhav%20...

<<दीपक मानकर- एम.कॉम. (युनिवर्सिटीत यु.आर ही होता एकेकाळी>> युनिवरसिटीचे नावही सांगुन टाका एकदाचे.

हे थोरात संगमनेरचे .त्यांचे 'अमृतमंथन' नावाचे आत्मचरित्र अत्यन्त वाचनीय आहे. अत्यन्त कडक, निर्व्यसनी. त्यांच्या समोर पचकन थुंकलेलं देखील चालत नाही त्याना.लगेच खरडपट्टी.
रंगनाथ पठारे यांची ताम्रपट कादम्बरी बहुतांश त्यांच्या जीवनप्रवासावरच आहे....

KTHM ही संस्था नाशिक मध्ये आहे. त्यातही एक थोरात होते पण ते मागच्या पिढीत. त्यांचे नाव आता मला आठवत नाही.

वसंतदादा पाटील बहुधा चौथी पास होते>> माझ्यासारखे कीतीतरी private college मधुन शिकलेली engineers त्यान्चे आजन्म ऋणी रहातील. त्यानी १९८३ साली private colleges ना परवानगी देली आणि अनेक मराठी मुलामुलीना engineer व्हायची सन्धी मिळाली. माझे बाबा सान्गतात त्यान्च्यावेळी फक्त ५ colleges होती, त्यामुळे महाराष्ट्रातल्या सरकारी नोकर्‍यान्मधे सगळे south indian भरती व्हायचे.(southमधे मात्र private professional colleges आधीपासुन आहेत.)politicians कडे vision हवी. पुस्तकी शिक्षण नसले तरी चालेल.

माझ्याकडे पण पदवी नाही Proud
म्हन्जे मी पण इलेक्शनला उभे रहायचे नाही की काय??? Angry
बिगारीपासून पुढील कोणत्या शिक्षणात राजकारणी बनण्यासाठीचे "राजकारण" वा "राज्यकारण" वा "समाजकारण" शिकवतात हे कळेल काय?

>>>>>''मित्रहो , मी नुकतेच वीणा गव्हाणकर नावाच्या बाईंचे एक होता कार्व्हर हे पुस्तक वाचले. ते पुस्तक इतके चांगले आणि शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे की ते पुस्तक टेक्स्ट् बुक म्हणून शाळांतून लावले पाहिजे.''
थोडे विषयान्तर, पण....
हूडा, ९० च्या आधीच, मी लायब्ररीतून आणून हे पुस्तक वाचले होते, तेव्हाच वडीलान्नी देखिल वाचले, ते पुस्तक वाचल्यावर त्यान्नी त्यान्चे आत्मचरित्र लिहायचा बेत रद्द केला! (खर तर सुरवातीपासूनची सर्व कागदपत्रे/पत्रव्यवहार त्यान्नी येवढ्याकरताच जपुन ठेवला होता, तो त्यान्नी चक्क जाळून टाकला! )
कारण विचारले असता म्हणाले की येवढ्या कष्टातून वर आलेल्या येवढ्या थोर व्यक्तिच्या चरित्रान्पुढे आपली कर्मकहाणी म्हणजे किस झाडकी पत्ती!
असो.
विषयान्तर समाप्त

माझ्या मते, या विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातूनसुद्धा पहाता येईल.

औपचारिक शिक्षण आणि व्यवहाराचा अर्थाअर्थी फारसा संबंध नसतो हे खरंय. पण आपल्याकडे शिक्षणाबाबत आधीच इतकी उदासीनता आहे. ती पाहता जनतेचे प्रतिनीधी म्हणून निवडून जाणार्‍यांसाठीतरी किमान शैक्षणिक पात्रता असणे यासाठीसुद्धा गरजेचे वाटते की "ही नेते मंडळी न शिकता सुद्धा एवढी पुढे गेलीत मग शिक्षणाची गरजच काय? कुठे अडतं त्यावाचून? कशाला त्यासाठी इतकी वर्षं फुकट घालवा?" असा विचार लोकांमधे बळावू नये.

शिक्षण आवश्यकच आहे.

"क्षमा करा, पण एच. आर. म्हणून बोलायचे झालेच तर १२ वी. बेसिस वर ऑफीस बॉय ही एक मेव नौकरी देतो आम्ही. " मंत्र्यासारखे एवढे अतिमहत्वाचे खाते सांभाळणारे १०-१२ वी शिकलेले, हे काही पटलं नाही बुवा.

प्रत्येक पदा साठी, मग ते लहान असो के मोठे किमान शैक्षणिक अरहता ठरवुन दिलेली आहे.
शिक्षकः १२ वी.डि. एड, पदवी बि.एड.
ग्रामसेवः १० वी नंतर दोन वर्शाचा दिप्लोमा.
बाबू : १२ वी पास व एम्.एस. सी. आय. टी. / टायपींग
अशे सगळयाच कामासांठी / जबाबदा-यासाठी ( मुद्दाम नौकरी म्हणत नाही) संबधित शिक्षण आवशय्क आहे. मात्र मंत्र्यासारक्या खात्याला शिक्षण महत्वाच नाही, हे काही पटत नाही.

एकंदरीत काय तर खालुन वर पर्यंत सगळयाच नौक-यासाठी शैक्षणिक अरहत ठरवुन दिलेली आहे, कारण संबधीत जबाबदारी पार पाडण्यासाठी शिक्षणाची गरज असते. मात्र मंत्री पदासाठी नसते. असेच मनावे लागेल.

<<वसंतदादा पाटील बहुधा चौथी पास होते....>> जुनं सोडा कि राव, तो काळ वेगळा होता. तेंव्हाची तुलना आजच्या काळाशी होऊच शकत नाही.
१९७०-७५ पर्यंतच शिक्षक पदासाठी ७ वी पास शिक्षण पुरे होते. माझे वडिल ७ वी होते, बदली ऩको म्हणुन पोस्ट खात्यातिल नौकरी सोडली, मग बोलावुन बोलावुन शिक्षकाची नौकरी दिली त्याना. आज त्याच नौकरी साठी लागणारी अरहता वेगळी आहे. सामान्य लोकाना सामान्य कामाची जबाबदारी देताना शिक्षणाची अट, व ह्या मंत्र्याना एवढ्या मोठ्या कामाची जबाबदारी देताना मात्र शिक्षणाची अटच नाही. खरच नाही पटत.

मग काय गरीव व सामान्य लोकाना लुबाडन्यासाठी व शिक्षण सम्राटाचे खिसे भरण्यासाठी ही शिक्षणाची
अट आहे का ? १५ वर्श आमचे पालक जिवाच रान करुन पैसे घालतात शिक्षणासाठी, आणि रक्ताच पाणि करुन पदव्या घेणारे आम्ही........ आमची तर ही लुबाडनुकच होत आहे, काय म्हणता, हाय की नाय ?