वाट

Submitted by coolKetan on 29 January, 2008 - 03:44

कसली बरं वाट पाहतो आहे मी
स्वतःलाच फसवून जगतो आहे मी
काय करायचय नी काय टाळायचंय
सगळंच तर कळतंय
कुठेतरी आत मात्र काहीतरी जळतंय
विझवायचं सोडून तेल ओततोय मी
कसली बरं वाट पाहतो आहे मी...

समोरच तर दिसताहेत आकाक्षांचे डोंगर
तिथेच तर जायचंय
एकटाच जाऊ म्हटलं तर तेही सलतंय
हातावर हात ठेवून कुणासाठी बसलोय मी
कसली बरं वाट पाहतो आहे मी...

शब्द, सुख, शब्दसुख, दुःख, वेड, दुःखवेड
मीच तर माझ्यासाठी आणलंय
तेवढंच कसंबसं पुरेल तिथपर्यंत पोहोचायला
उगाचच भागीदार शोधत बसलोय मी
कसली बरं वाट पाहतो आहे मी...

-
केतन

टीपः तशी ही बरीच जुनी आहे....पण बघा कशी वाटते

गुलमोहर: 

कुठेतरी आत मात्र काहीतरी जळतंय
विझवायचं सोडून तेल ओततोय मी..

Happy होतं असं कधीकधी!