तो पहिला पाऊस आजही साक्ष देतो तुझ्या नि माझ्या प्रेमाची......
भिजलेल्या लाजर्या वेलीसारखे लवलवते हळूवार माझे मन
नि मला सावरणारा तुझा हात ,
सहवासातून फुललेले आपले प्रेम,
कळीचे फ़ूल होताना होणार्या हळूवार भावनेसारखे......
तो पहिला पाऊस आजही साक्ष देतो.............
एक आहेत तुझी नि माझी स्पंदने,
व्यतीत होणारा प्रत्येक क्षण फ़क्त दूर जाणार आपण याची आठवण देत आहे,
पण विरहसुद्धा पायरी आहे प्रेमाची.....
त्यागाची पवित्र भावना जाणवून देते हे प्रेम,
तो पहिला पाऊस आजही साक्ष देतो.............
माझे अस्तित्व कधीच मिसळून गेले तुझ्या अस्तित्वात,
नि मी हरवून गेले माझ्यापासून,
दूर गेलो कितीही तरीहि प्रेम तुझे माझे कमी होणार नाही,
प्रत्येक विरहाच्या क्षणाबरोबर वाढत जाईल ते,
तुझ्या सहवासातील त्या आठवणींवर मी जगेन,
जरी दूर तुझ्यापासून राहीन,
तो पहिला पाऊस आजही साक्ष देतो.................
दूर जरि तू नि मी जवळ असेल तुझे प्रेम,
तुझे अस्तित्व नि माझे मन,
आपण एकत्र पाहिलेली स्वप्ने नि त्या स्वप्नात भरलेले रंग,
तो पहिला पाऊस आजही साक्ष देतो................
i wrote this poem b4 2-3
i wrote this poem b4 2-3 yrs...bt some1 copied it from orkut..coz i wrote this in marathi kavita community of orkut..ata hi kavita "pahila paus"communitychya homepage var ahe..
pan ti pahun ase naka manhu..ki ti kavita dusrya konachi ahe..karan hi majhi kavita ahe..thanks..
छान ऐश्वर्या!!
छान ऐश्वर्या!!
मस्त आहे अगदी माझ्याच भावना
मस्त आहे अगदी माझ्याच भावना जणू तू लिहिल्यास.
पण विरहसुद्धा पायरी आहे
पण विरहसुद्धा पायरी आहे प्रेमाची.....
त्यागाची पवित्र भावना जाणवून देते हे प्रेम, >>>
अति सुंदर , असचं लिहीत रहा .....
छान आहे. पहिल्या पावसाच्या
छान आहे. पहिल्या पावसाच्या आठवणी व निर्माण झालेल्या भावना सुरेख व्यक्त केल्या आहेत.
असेच सुरेख लिहीत रहा.
pratisadabaddal aabhari
pratisadabaddal aabhari ahe..thank you so much..:)
छान, तरल.
छान, तरल.
सुरेख ! आवडली
सुरेख ! आवडली
खुप सुन्दर भावना व्यक्त
खुप सुन्दर भावना व्यक्त केल्या आहेस.. आवडली खुप!!
खुप सुन्दर भावना व्यक्त
खुप सुन्दर भावना व्यक्त केल्या आहेस.. आवडली खुप!!