सातवा मजला

Submitted by deepak.ks on 26 January, 2008 - 08:42

खुजे झाल्या सारखं वाटतय
ईथल्या इमारती जंगलात
जंगलातून वाट काढताना
पंख खुरडे अडकतील का रे

जो वरी पंखात बळ होते
छतावरुन पलिकडे गेलो
उंचत्या क्षणी ही गिधाडे
झडप घालतात ना रे

थोरांनी छोट्यांना दाबून ठेवणे
हे तर सहज झालयं
पक्षी ना मी झेपावलो तर
द्रूश्य विहंगम दिसेल का रे

धरतीच्या उरावर इमारती उंच उभ्या
अगदी खिळ्या सारख्या
थंड निरस पांढरी दगडे
सजीव होतील का रे

एकवटून सारे बळ पंखात
निघालोय हिरव्या पट्ट्याकडे
झाडातून वाट काढताना
पंख खुरडे अडकतील का रे....

गुलमोहर: