हरीश्चंद्राची फॅक्टरी चित्रपटाची "ऑस्कर"साठी निवड

Submitted by rajasgauri on 23 September, 2009 - 07:39

या चित्र पटाला हा मान मिळाल्यावर काहीतरी करायला हवे असे सर्व म्हणाले,
नक्की काय करायचे हे मी विचारल्यावर मला आलेली ही एक ‍ईमेल :

This is what Non Indians do –

- Appoint a US distributor (that also means providing lot of prints of the film)

- Appoint a marketing firm which will arrange interviews on TV shows, radio interviews etc. (If you are not on Today, Good Morning America, Oprah, NPR you have no chance). Must have a good person associated with the film who will be able to speak good English.

- Create a buzz of the film by doing a special screenings for the film critics

- Send media package to each jury (there are close to one thousand)

- Arrange small shows in focus groups (in this case arrange shows in Non Marathi organizations)

If these efforts succeed and the film gets a nomination then

- Repeat the process all over again to get Oscar

- In addition, advertise in media elite magazines such as Variety, Billboard magazine, entertainment weekly, people magazine etc. advertise in Hollywood and other locations (Street billboards)

- Throw Hollywood parties

Cost to do all this will be around 1 million dollars. Only Amir Khan spent this kind of money when Lagan was the entry from India. He was able to do it because he had success in USA before the Oscar selection from India and he had collected more than a million in US screenings. This investment is easy to recover if the movie gets a buzz and then show it worldwide.

What will help Harischandrachi…..

- The movie has not been released in India on large scale. Only screened in small markets and film festivals to qualify for the selection. This buzz will generate revenue – ticket sales, TV and DVD rights.

- If lessons learned from Shwaas are followed, will not repeat the mistakes.

What happened with Shwaas:

- The movie was produced from the money collected from 6-7 individual investors. By the time movie was produced they had no money left.

- Arun Nalawade had come to A distributor and a BMM Advisors with his team in Pune. Mohan Ranade had offered them to distribute the movie in US (without seeing the movie) before it was released in India and offered what |Mr. Ranade offered other producers in the past. They did not like hisI offer and the movie was not shown in US when released in India. ( This was told by Mr. Ranade)

- Nobody from the team was able to speak good English. Arun Nalawade was the only cast member on the tour. In University of Pennsylvania some American Students that had taken Marathi as a second language in their curriculum (are you surprised?) asked him some questions and an interpreter has to do the job. Sandeep Kulkarni (doctor in the movie) could have done the job, but he was not part of the team.

- Donations were raised in India to support the marketing cost, Maharashtra and Union government pitched in as well.

- Producers decided to distribute the movie in Marathi Mandals through their personal contacts. Mukund Marathe was their lead.

- Producer’s did not trust the locals and insisted that they will not give DVD to anybody where movie could not be screened with a film. One of the person from their team went to the screening. So the movie was not screened in all Mandals.

- Marathi and other Indians did donate for the cause. About $100,000 were raised.

WHAT BMM or Marathi COmmunity in USA can really do:

- Screen in as many Mandals as possible. Producers have to agree to provide a DVD, otherwise not possible to cover all Mandals.

- Ticket sales will generate nothing. Donations from attendees is the only way.

- Screening through BMM is only one small way. All other means to reach Non Marathi and Non Indians has to be undertaken by a professional marketing team.

- So our part will be ‘extremely small’. We should not act as if we are doing a big favor to them.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ranade had offered them to distribute the movie in US (without seeing the movie) before it was released in India and offered what I offered other producers in the past. They did not like my offer and the movie was not shown in US when released in India.
>>>>>राजस्गौरी, इथे असं म्हटलंय की, I offered / my offer वगैरे , म्हणजे तुम्ही स्वतः ती ऑफर केली होती का?

With all due respect to राजसगौरी, तुम्ही जे काय वरती लिहिलंय ते अतिशय चुकीच्या माहीतीच्या आधारावर आणि कदाचित CalAA वरच्या आकसाने लिहिलंय असं वाटतंय.
तुमच्या पोस्ट वर तपशीलात उत्तर देतेच आहे मी पण 'श्वास' च्या कॅम्पेनची पिसं काढायच्या आधी निदान पूर्ण कॅम्पेन मधे काय काय नी कसं कसं केलं गेलं याची माहीती करून घेतली असतीत तर फार बरं झालं असतं.

What happened with Shwaas:
>>- The movie was produced from the money collected from 6-7 individual investors. By the time movie was produced they had no money left.<<
जेव्हा 'श्वास' बनवला गेला तेव्हा इतक्या ऑफबिट विषयासाठी पैसा उभा करणं किती अवघड होतं याची किंचित तरी कल्पना आहे का तुम्हाला?
>>- Arun Nalawade had come to A distributor and a BMM Advisors with his team in Pune. Mohan Ranade had offered them to distribute the movie in US (without seeing the movie) before it was released in India and offered what I offered other producers in the past. They did not like my offer and the movie was not shown in US when released in India.<<
निर्मात्याला येणार्‍या प्रत्येक ऑफरचा साधकबाधक विचार करून ती घेण्याचा वा नाकारण्याचा अधिकार असतो हे तुम्हाला मान्य नसावे.

>>- Nobody from the team was able to speak good English. Arun Nalawade was the only cast member on the tour. In University of Pennsylvania some American Students that had taken Marathi as a second language in their curriculum (are you surprised?) asked him some questions and an interpreter has to do the job. Sandeep Kulkarni (doctor in the movie) could have done the job, but he was not part of the team.<<
केवढा गोंधळ आहे तुमच्या डोक्यात. भाषेच्या मुद्द्याबद्दल म्हणायचं तर टिममधल्या बर्‍याच जणांचं इंग्रजीवर प्रभुत्व नव्हतं. पण तुम्ही कधी एखाद्या ब्राझिलियन किंवा जपानी फिल्ममेकर शी बोललायत का? त्यांनाही दुभाषी लागतो. बर तुमच्या पोस्टमधे मुळात सर्व काही नटांमुळेच होते असा मुद्दा दिसतोय. दिग्दर्शक संदीप सावंत तुमच्या खिजगणतीतही नाहीये. बर नटांनी फिल्मचं प्रमोशन करावं पण ते कुठे जिथे नटाला ओळखत असतात तिथे. मला संदीप कुळकर्णीच्या अभिनयाबद्दल कितीही प्रेम, आदर असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर तो चेहरा अनोळखी आहे हे विसरता कामा नये. जेव्हा अभारतीय प्रेक्षकांच्यात फिल्म प्रमोट करण्याचा संबंध येतो तेव्हा केवळ आणि केवळ दिग्दर्शक व निर्मात्याचीच गरज असते. अरूण तिथे होता तो अभिनेत्यापेक्षा निर्माता म्हणून.

>>- Donations were raised in India to support the marketing cost, Maharashtra and Union government pitched in as well.<<
यात काय चुकीचं केलं आम्ही?

>>- Producers decided to distribute the movie in Marathi Mandals through their personal contacts. Mukund Marathe was their lead. <<
तुमचा प्रॉब्लेम कळला. असो.. मुकुंद मराठे ही व्यक्ती आमची लिड नसून California Arts Association (CalAA) ही संस्था आमची लिड होती. मुकुंद आणि त्यांचे सहकारी हे CalAA चे प्रतिनिधी म्हणून आमचे लिड होते. आम्ही रानड्यांना वितरण न देता 'कला' ला दिलं. तेही केवळ ऑस्कर कॅम्पेनच्या काळातलं. त्याला खरंतर वितरण म्हणता येणार नाही कारण ती केवळ प्रमोशनल स्क्रिनिंग्ज होती. त्यांना आम्ही कुठलेही राइटस विकले नव्हते. वितरणासाठी इतर काही खूप वेगळे पर्याय मोकळे रहावेत यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आणि त्यात काहीही चुकीचे नव्हते.

>>- Producer’s did not trust the locals and insisted that they will not give DVD to anybody where movie could not be screened with a film. One of the person from their team went to the screening. So the movie was not screened in all Mandals.<<
पायरसी, चित्रपटाची डिव्हिडी नेटवर लोड करणे अतिशय सोपे असणे या सगळ्यामुळे निर्मात्यांनी विश्वास ठेवला नाही यात निर्मात्यांची चूक नाही. प्रत्येक ठिकाणी आमचा प्रतिनिधी असणं हे महत्वाचं होतं कारण ती ऑस्कर रन होती. स्थानिक पत्रकार, स्थानिक अभारतीय (वंशाने अभारतीय) यांनी तिथे येणं चित्रपटाबद्दल विचारणं, त्यांच्यामधे या चित्रपटाची माउथ पब्लिसिटी होणं हे महत्वाचं होतं. आणि अश्यांशी संवाद स्थानिक BMM प्रतिनिधी साधू शकत नाही अर्थातच. तुम्हाला पटो न पटो.

>>- Marathi and other Indians did donate for the cause. About $100,000 were raised.<<
मला या आकड्याबद्दल साशंकता आहे. मला चेक करावे लागेल.

WHAT BMM or Marathi COmmunity in USA can really do:
>>- Screen in as many Mandals as possible. Producers have to agree to provide a DVD, otherwise not possible to cover all Mandals.<<
साफ चूक. या मंडळांच्या इथल्या स्क्रिनिंग्जना स्थानिक अमेरीकन पत्रकार, अभारतीय film enthusiast आले नाहीत तर ह्या स्क्रिनिंग्जचा आर्थिक फायदा केवळ वितरकांना आणि थोडासा निर्मात्याला होईल. ऑस्करसाठी नाही.

>>- Ticket sales will generate nothing. Donations from attendees is the only way.<<
हरिश्चंद्राची फॅक्टरी वाल्यांनी अजून तरी आपली स्ट्रॅटेजी उघड केलेली नाही. त्यांचं फंड रेझिंग ते डोनेशन्स मधूनच करणारेत असं गृहित धरणं चुकीचं आहे.

>>- Screening through BMM is only one small way. All other means to reach Non Marathi and Non Indians has to be undertaken by a professional marketing team.<<
यामधे फारश्या मराठी NRIs ना काहीही माहीती नसतं. यासाठी चित्रपटाच्या धंद्यातली व्यक्ती लागते. हौशी नव्हे. बाकी यावर मला जास्त बोलायची इच्छा नाही.

>>- So our part will be ‘extremely small’. We should not act as if we are doing a big favor to them.<<
हे एक वाक्य मात्र लाख मोलाचं बोललात.

बाकी कॅम्पेनसाठी काय करावं लागतं यात तुम्ही जे काही लिहिलंय त्याबद्दल वाचून खूपच मजा वाटली. 'श्वास' च्या कॅम्पेन संदर्भात मांडलेल्या चुकीच्या मुद्द्यांना मी उत्तरे दिली आहेत. बाकी पूर्ण स्ट्रॅटेजी, ऑप्शन्स याबद्दल तपशीलात मी इथे काही मांडू शकणार नाही. याच वेळेला हे इथे लिहायचं कारण पूर्णपणे माझ्या लक्षात आलं आहे. अर्थात वेळ येताच आम्ही जे आणि जसं केलं त्याबद्दल परेशच्या टिमला माहीती देऊच. शेवटी कला बरोबर जायचं की BMM बरोबर की रानड्यांच्याबरोबर की अजून कोणाबरोबर हा त्यांचा निर्णय.
एक मराठी चित्रपट यशस्वी व्हावा हे महत्वाचं आहे मग तो कुणाचा आहे याने आम्हाला फरक पडत नाही. आम्ही फिल्ममेकर्सच असून. तेव्हा अश्या चित्रपटाची टिम कला बरोबर गेल्याने BMM किंवा इतर अन्य लोकांना का फरक पडावा? विचार करा.

Rajasgauri is absolutely correct in his or her assessment that lots and lots of money is needed to run a successful campaign to first get nominated and then to be in contention to win Oscar. I would not be surprised that around $1 million is needed for this. It is not an easy task to raise $1 Million from donations. And I agree that professional marketing help is needed when you are talking about some serious amount of money. But it is a chicken and egg story. Professional Marketing help does not come cheap and there are not many professional marketing consultants that would take on such assignments on contingency basis of getting paid IF the film wins Oscar. So what does a regional film from India from a state that is home to about 10 crore Maharashtrians do? Nothing? There are around 2.5 million Indian Americans in USA. a fraction of that will be Maharashtrians. If we really want to help a Marathi film, it is not impossible to raise $1 million. If all Indian Americans pitch in $1, we will raise $2.5 Million. It can be done. It needs concerted efforts by many on a full time basis to bring all Indian organizations together to support OUR film.

As to why Shwaas Producers selected CalAA for screenings in North America, as per my understanding, the Producers selected CalAA because of its sincerity in following its mission to "cherish art, through art, for art" and its highest standards of integrity and dedication. CalAA was willing to run the screenings as envisioned by the Producers and wherever possible arrange informal Q&A sessions after the screenings. CalAA did not represent that it was capable of or was going to raise the required amount of money for the Oscar campaign. It was doing its small bit in the whole jigsaw puzzle, and doing it quite well.

Also, the Marathi and other Indian donations did not add up to $100,000. There is order of magnitude difference between what was raised through donations and $100,000 with what was raised being much smaller.

But we have an opportunity to come together and help Harishchandraachee Factory on its quest to win the Oscar.

राजसगौरी मला विपु मधे सांगतात की मी एक फॅक्टस असलेलं आर्टिकल लिहावं. म्हणजे मराठी कम्युनिटी कशी मदत करू शकेल ते समजेल. मराठी कम्युनिटीने काय करावं यासाठी फॅक्टस असलेला लेख लिहायची गरज नाही. त्या फॅक्टस मी परेश मोकाशीच्या टिमकडे मांडणं जास्त गरजेचं आहे.

मराठी कम्युनिटीने काय करावं याबद्दल तपशीलात मी कॉमेंट करणं योग्य नाही कारण प्रत्येक चित्रपट वेगळा, त्याची कॅम्पेन स्ट्रॅटेजी वेगळी असते.

ह फॅ ची स्ट्रेटेजी परेश आणि टिम ठरवतील आणि त्याप्रमाणे NRIs कडून गोष्टी अपेक्षित धरतील किंवा धरणार नाहीत.

माझ्याकडून मराठी कम्युनिटीने काय करावे/ काय समजून घ्यावे याबद्दल इतकेच...
आजचा अमेरिकेतला बहुतांश मराठी NRI वर्ग हा मराठी चित्रपटावर प्रेम करणारा असला तरी हौशी आहे. चित्रपटाचा 'धंदा' ही गोष्ट खूप वेगळी आहे. तेव्हा हौसेपोटी असलेला उत्साह चांगला आहे पण तरी काही गोष्टी या त्या त्या धंद्यातल्या लोकांवरच सोडून द्याव्यात हे बरं.
१. ह फॅ ची टिम जे निर्णय घेईल त्याला सपोर्ट करणं. तुमचं त्यांनी ऐकलं नाही तर लगेच त्यांना मूर्खात काढू नका. (वरच्या उदाहरणात हेच आहे.)
२. त्यांना किती आणि कुठे मदत अपेक्षित आहे ती समजून घ्या आणि ती करा. जास्तीच्या गोष्टी करताना त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय आणि त्यांच्या परवानगीशिवाय करू नका.
३. तुम्ही अमेरीकेत रहाता परंतु तुम्ही त्या धंद्यातले नाही. ह फॅ ची टिम भारतात असली तरी त्या धंद्यातली आहे. तेव्हा त्यांना नको इतकं शिकवायला न जाता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची टिम बनून मदत करायचा विचार करा.
४. स्वतःच्या आर्थिक फायद्यापेक्षा चित्रपटाला ऑस्करच्या दृष्टीने होणारा फायदा याला महत्व देणे.
५. स्वतःच्या प्रसिद्धीपेक्षा चित्रपटाला ऑस्करसाठी प्रसिद्धी मिळणे हे महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा. (हा ही अनुभव घेतलाय आम्ही)

या आणि अश्या मुद्द्यांवर आम्हाला CalAA इतर कोणाहीपेक्षा योग्य वाटली म्हणून आम्ही त्यांच्याशी हात मिळवला.

पी आर आणि फिल्म कॅम्पेन वरती भरपूर लिहिता येइल. पण इथल्या बहुतेक पोस्ट्स इंग्रजीत असल्यामुळे मुद्दामून लिहिणार नाही!!!

मराठी फिल्मबद्दल इंग्रजीतून (स्वतः अगदी एक्स्पर्ट असल्याचा आव आणून) चर्चा करणार्‍याचा निषेध!!!

मराठी फिल्मबद्दल इंग्रजीतून (स्वतः अगदी एक्स्पर्ट असल्याचा आव आणून) चर्चा करणार्‍याचा निषेध!!!<<
दिग्दर्शक/ मुकुंद मराठे यांना पण या निषेधात ओढलं गेलं म्हणून एक स्पष्टीकरण.

मोहन रानड्यांच्या मूळ पोस्ट मधे मुकुंद यांचा नावानिशी उल्लेख असल्याने, माझ्या विनंतीवरून मुकुंद यांनी इथे पोस्ट टाकले आहे. अन्यथा ते इथे नेहमी येतही नाहीत.
इंग्रजीतून पोस्ट लिहिणे हे सुरूवातीला एखाद दुसर्‍या पोस्टपर्यंत निषेध करण्याएवढे नक्कीच नसते. वारंवार सांगूनही जर ती सवय बदलली नाही तर निषेध ठिके.

तसेच ते आमच्या कॅम्पेनचा काही प्रमाणात भाग होते त्यामुळे त्यांनी एक्स्पर्ट म्हणून काही गोष्टी सांगितल्या तर त्यात चुकीचे काही नाही.

नीधप, माझा निषेध हा ज्या व्यक्तीने बीबी सुरू केला त्याचा आहे. फिल्म कँपेनिंग हा अतिशय एक्सपर्ट विषय आहे. आणि राजसगौरी हे फिल्म पी आर शी संबंधित नसावेत असे वाटते.

मुकुंद मराठे याचे पोस्ट वाचलेले नाही/ (नेहमीची सवय) आता निवांत वाचेन. Happy

बाकी, तू फॅक्टस असलेला लेख कधी लिहितेयस??

Priya all,
Mee haa dhaagaa suroo kela, tevha tyaacaa kaahII bhaag post jhaalaa nasaavaa.
nantar mee he paaihlae naahee.
he savra bhashya maajhee naahi. mee he kaaya Asate he samajaoon gheta Aahe.
Ardhavat post kelelya maahiteemuLe koNache garsamaj Jhale Asalyaas kshamasva.
malaa deonaagaree yunikoDmadhye lihiNyaachi savay naahee.
Aalelee email English Asalyaane tasheecha post kelee.
Aso.
yaa dhaagyaamuLe malaa maaihtee miLalee. Dhanyavaad.
sadyaa mee pravaasaat Aahe. mukkaamaalaa pohochalyaavar savaD Jjaalee kee pratyekaalaa pratisaad deNyaacha prayatna karen.

Aaaj mee maooL dhaagyaat bhar ghatalee Aaahe. puThache taree gairsamaj nasaaveta.
maayaboleevar vichaarmanthan hote , tase te vhaave haa dhaagaa nirmaaN karanyaachaa hetoo.

राजसगौरी,
तुम्ही मी दिलेली उत्तरे मोहन रानड्यांना पाठवा. आणि अशी दिशाभूल करणार्‍या, खोटी माहीती असलेल्या मेल्स पाठवणे बंद करा असं त्यांना सांगा.

needhapa,
you are being targeted.
least you can do is ,give them best wishes !!!

<<तुम्ही अमेरीकेत रहाता परंतु तुम्ही त्या धंद्यातले नाही. ह फॅ ची टिम भारतात असली तरी त्या धंद्यातली आहे. तेव्हा त्यांना नको इतकं शिकवायला न जाता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची टिम बनून मदत करायचा विचार करा.>>
मुद्दा चांगला आहे, पण प्रत्यक्षात उतरणे कठीण.
"तेव्हा त्यांना नको इतकं शिकवायला न जाता'' हा भाग कठीण आहे. आपल्याला माहित नाही असे या जगात काहीच नाही असे बर्‍याच जणांचे मत असते. त्यामुळे जे काय करायचे ते अगदी मी सांगतो तस्सेच करायचे, असे बर्‍याच जणांना वाटते. तसे ते मदत करणारे असतात, पण हे असे असते.

माझ्यासारखे जे असतात, ज्यांना पटते की अमुक बाबतीत आपल्याला काही कळत नाही, ते मदत करणारे असतील असेहि नाही, आणि गेले करायला मदत तर ते एव्हढे कुचकामी की त्यापेक्षा नको ते.

मला वाटते, अनेक मराठी नटनट्या हिंदी सिनेमातून भरपूर पैसे मिळवतात. त्यांच्याकडून नाही का देणग्या मिळवता येणार, मराठीसाठी, चित्रपटासाठी? NRI च कशाला पाहिजेत? खरे तर अमेरिकेतले लोक आता दरिद्री झाले आहेत, त्यांच्यापेक्षा भारतातल्या लोकांकडेच जास्त पैसा आहे. शिवाय भारतातल्या लोकांनाहि महाराष्ट्राबद्दल अभिमान असतोच ना? (का फक्त NRI नाच असावा अशी अपेक्षा?)

असो, तुम्हाला हेहि माहित असेलच, मी आपले परत लिहीले एव्हढेच.

<<पी आर आणि फिल्म कॅम्पेन वरती भरपूर लिहिता येइल. पण इथल्या बहुतेक पोस्ट्स इंग्रजीत असल्यामुळे मुद्दामून लिहिणार नाही!!! >>

तुम्ही पण फाड फाड के विंग्रजित लिवा ना!! नाहीतर मराठीत लिहा. कुणितरी त्याचे भाषांतर करून देइल बाकीच्यांना.

<<मराठी फिल्मबद्दल इंग्रजीतून (स्वतः अगदी एक्स्पर्ट असल्याचा आव आणून) चर्चा करणार्‍याचा निषेध!!!>>

तुमच्या निषेधाचे खरे नि एकच कारण म्हणजे "इंग्रजीतून लिहीले" म्हणूनच ना?
कारण एक्स्पर्ट असल्याचा आव आणून मायबोलीवर बरेच लोक लिहीतात, त्याने खरे तर करमणूकच होते.
नाहीतरी कुठल्याहि विषयावर माहिती हवी असेल तर मायबोली वर मिळेल असे कुणाला वाटते बरे?

Happy Light 1

>>least you can do is ,give them best wishes !!!<<
नक्की कोणाला?

ह.फॅ. च्या टिमला मी प्रत्यक्ष शुभेच्छा दिलेल्या आहेतच. वरच्या माझ्या पोस्टस मधेही मी त्यांच्यासाठी शुभेच्छाच व्यक्त केल्यात. नुसत्या शुभेच्छाच नव्हेत तर आमच्याकडून गरज पडेल ती मदत आम्ही करूच.

मोहन रानडे यांच्या असल्या खोटारड्या वक्तव्यांबद्दल शुभेच्छा द्याव्यात अशी काही गरज नाही.

राजस गौरी , तुमच्या पोस्ट मधील माहिती कुठल्या आधारे आहे ? तुम्हाला ही आलेली मेल कुणा कडून आली आहे ? आणि त्या व्यक्ती ला आपण एवढे महत्व का द्यावे ?
"हरीश्चंद्राची फॅक्टरी" या चित्रपटाला ऑस्कर साठी कशी मदत करावी या साठी मायबोली हे माध्यम निवडलेले आहे तर, त्यात ( समस्त ) मायबोलीकर कसे मदत करू शकतील ही चर्चा करू, उगीचच "श्वास" च्या टीम ने काय चुका केल्या हे आत्ता जाहिर पणे सांगण्यात काय अर्थ आहे ? त्यांना जे जमले ते त्यांनी केले.
तुम्हाला हि जी काही "आतली माहिती" आहे ती "ह फ " च्या टीम ला द्या. त्याचा निदान त्यांना फायदा होईल.
तळ टीप : तुमचे पोस्ट इंग्लिश मध्ये असल्याने पूर्ण वाचू शकत नाही , आम्ही मराठी वाचायला इथे येतो/येते.

मला नीपध कडुन अश्याच सहकार्याची अपेक्षा होती, बाकी ज्याचे करावे भले, ... हाच जगाचा न्याय आहे.

<<मराठी फिल्मबद्दल इंग्रजीतून (स्वतः अगदी एक्स्पर्ट असल्याचा आव आणून) चर्चा करणार्‍याचा निषेध>>
पण तुमच्या मराठी वाक्यात 'फिल्म' असा इंग्रजी शब्द आहेच. म्हणजे तुम्हाला चित्रपट असा मराठी शब्द माहित असेलच, बर्‍याचजणांना कळतो तो. तो नाही वापरला तुम्ही! याचा अर्थ मी असा घेतो की काही इंग्रजी शब्द लिहिण्यात आले तरी ते तुम्हाला चालतील, फक्त देवनागरीतून लिहा. असेच ना?

जसे राज ठाकरेने मुंबईत सर्व पाट्या मराठीत लावा याचा अर्थ ' The premier auto parts store" असे न लिहिता, "धी प्रिमियर ऑटो पार्ट्स स्टोअर" असे लिहायचे, असे ठरवले तसे. ठीक आहे. तसे लिहू.
<<तुमचे पोस्ट इंग्लिश मध्ये असल्याने पूर्ण वाचू शकत नाही ,>> तुम्ही पण वरचे वाचा.

असो.

<<"हरीश्चंद्राची फॅक्टरी" या चित्रपटाला ऑस्कर साठी कशी मदत करावी या साठी मायबोली हे माध्यम निवडलेले आहे तर, त्यात ( समस्त ) मायबोलीकर कसे मदत करू शकतील ही चर्चा करू, "

उत्तम विषय.

माझ्या मनात आलेले स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असे:
१मिलियन डॉ. = फक्त ५ कोटी. पण ज्याप्रमाणे भारतात लाचलुचपत आहे (असे काही लोक म्हणतात, मलाहि त्याचा अनुभव भरपूर ठिकाणी आला होता, पण ते अपवादात्मक, असे मला सांगण्यात आले) त्यापेक्षा जास्त लाचलुचपत अमेरिकेत आहे. राजकारणी, ऑस्करवाले सगळिकडे लाचलुचपत अस्ण्याची शक्यता मोठी आहे. तेंव्हा २ मिलियन म्हणजे फक्त १० कोटी ची तयारी ठेवा.

आता पहिले काम पैसे उभे करणे. शरद पवार, इतर मंत्रि, पुढारी, मुख्य म्हणजे बाळ ठाकरे, जे कोण महाराष्ट्र सरकारच्या खजिन्यातून अमेरिकेला २५ लाख रु. देणार होते ते, लता मंगेशकर, आशा भोसले, माधुरी दिक्षित, इ. लोकांकडे मागितलेत तर हसत हसत मिळतील. त्यांनाहि अभिमान असणारच ना मराठी चित्रपटाला अमेरिकेचे ऑस्कर मिळाले तर.

आणि सुखासुखी दिले नाहीत, तर संभाजी ब्रिगेडला सांगा, हरिश्चंद्र क्षत्रिय होता नि त्याला दान मागणारा बामण. की ते लग्गेच जाळपोळ, हाणामारी करून तेव्हढे पैसे उभे करतील. वाटल्यास राज ठाकरेला हाताशी घ्या, त्यालाहि गुंडगिरी चांगली जमते, नि राजकारण जमेनासे झाले असेल तर हा उद्योग बरा त्याला. पण त्यांचे जे काय 'कमिशन' असेल तेहि त्यातूनच वळते करून घ्यायला सांगा.

असे केले म्हणजे NRI ची गरजच नाही!!! म्हणजे त्यांनी तुमच्या विपण क्षेत्रातील (ज्याला मराठीत मार्केटिंग) म्हणतात, त्या ज्ञानाचा अपमान करण्याचा हि प्रश्न येत नाही.

किंवा दुसर्‍या शब्दात, आपण NRI ना इक्वेशनमधून वगळूनच टाकू. म्हणजे ते कठिण कॅलक्युलस आपोआप निघून जाईल.

दुसरे कामः एखादी अमेरिकेतील संस्था शोधा ज्यांनी ऑस्कर मिळवून देण्याचे काम केले आहे. कशासाठी? त्यांच्या मार्केटिंग किंवा धंद्यातील अक्कल यासाठी नव्हे, तर, त्यांना बरोबर माहित आहे, लाच कुणाला नि कशी द्यायची. एक प्रकारचे स्थानिक सल्लागार म्हणून.
तुम्हाला जर तेहि कळत असेल (म्हणजे लाच कुणाला नि कशी द्यायची) तर अर्थात गरज नाही, पण हाताशी असावी म्हणून.

पुढे काय करायचे ते तुम्हाला माहित आहेच.

तेंव्हा शुभेच्छा.
Happy Light 1

मला पूर्ण वाचून असे वाटले नाही की इथे कोणी नीधप वर शरसंधान करण्याचा प्रयत्न करते आहे. श्वास वर टीका करणे वेगळे (कारण टीम एफर्ट वेगळा विषय आहे) आणि नीधप वर करणे वेगळे. किमान मूळ बाफ चालू करणार्‍या व्यक्तीचा हा उद्देश नसावा (ही अपेक्षा)
तेव्हा नीधप ने दिलेली उत्तरे ही त्यांचा (नीधप आणि आरोप करणारे) वैयक्तिक प्रश्न आहे असं समजून ते सोडून देऊया.. आणि मूळ विषयाकडे वळूया.

देवनागरी लिहीण्याबद्दल जे बोलले आहेत त्यांच्यासाठी, मायबोलीवर देवनागरी लिहीण्याचा आग्रह जरूर आहे, पण सक्ती नाही. आपल्याला जर येऊन वाचायचे नसेल तर वाचू नका, त्याचीही सक्ती नाही, पण उगाच जिकडे तिकडे, तुम्ही देवनागरी लिहीत नाही तर आम्ही वाचणार नाही हे सांगत हिंडायची जरूर नाहीये.

मी देवनागरीत लिहीतो, पण सक्तीने नाही, मला आवडतं म्हणून, तसंच प्रत्येकाला ठरवू द्या... झक्की, वेल सेड अबाउट राईटींग इन मराठी. Happy

तर ज्यांना शक्य आहे त्यांनी , वरील विषयाच्या अनुषंगाने, काय काय करावे लागते हे सांगितले तर एक एक मुद्दा घेऊन चर्चा करता येईल

अहो मी सांगितले ते खरे आहे, भाषा सोडा, पण मुद्दा व्यवस्थित आहे की आधी महाराष्ट्रातल्या लोकांना पिळलत तर दोन मि. डॉ. सहज मिळतील. मग काय? पैसे घेऊन इकडे यायचे, ऑस्करवाल्यांना भेटायचे नि आपले मार्केटिंग नि चित्रपट धंद्यातले ज्ञान वापरून ऑस्कर घेऊन घरी जायचे. हाकानाका!!
NRI ची गरज नाही नि चर्चा पण नको.

आपल्याला जर येऊन वाचायचे नसेल तर वाचू नका, त्याचीही सक्ती नाही, पण उगाच जिकडे तिकडे, तुम्ही देवनागरी लिहीत नाही तर आम्ही वाचणार नाही हे सांगत हिंडायची जरूर नाहीये.>> हे तर मायबोलीच्या फूटरमधे टाकून ठेवायला हवय. उच्छाद मांडलाय अगदी.

झक्की,
१. आमच्या टिमने पैसे जमवण्यासाठी एका 'क्ष' पद्धतीने प्रयत्न केले. ते आणि तसेच प्रयत्न हरिश्चंद्राची फॅक्टरी करणार आहे हे गृहीत धरणं चुकीचं वाटत नाही का? त्यांची पैसे उभे करण्याची पद्धत वेगळी असू शकते. जोवर ते याबद्दल काही अधिकृत विधान करत नाहीत तोवर आपण कोणीही त्यावर काहीच बोलणं योग्य नाही.

२. केवळ आणि केवळ NRIs कडूनच पैसे उभे करण्यासाठी मदत मागितली गेली असा काही तुमचा समज असेल तर तो खोटा आहे.

>>असे केले म्हणजे NRI ची गरजच नाही!!! म्हणजे त्यांनी तुमच्या विपण क्षेत्रातील (ज्याला मराठीत मार्केटिंग) म्हणतात, त्या ज्ञानाचा अपमान करण्याचा हि प्रश्न येत नाही.
किंवा दुसर्‍या शब्दात, आपण NRI ना इक्वेशनमधून वगळूनच टाकू. म्हणजे ते कठिण कॅलक्युलस आपोआप निघून जाईल.
दुसरे कामः एखादी अमेरिकेतील संस्था शोधा ज्यांनी ऑस्कर मिळवून देण्याचे काम केले आहे. कशासाठी? त्यांच्या मार्केटिंग किंवा धंद्यातील अक्कल यासाठी नव्हे, तर, त्यांना बरोबर माहित आहे, लाच कुणाला नि कशी द्यायची. एक प्रकारचे स्थानिक सल्लागार म्हणून.
तुम्हाला जर तेहि कळत असेल (म्हणजे लाच कुणाला नि कशी द्यायची) तर अर्थात गरज नाही, पण हाताशी असावी म्हणून.<<
NRIs हे अमेरिकेत रहातात म्हणून ते म्हणतील ती पूर्वदिशा असं समजून काम केलं गेलं तर वाट लागायला वेळ लागणार नाही. ज्या त्या धंद्याची जी ती गणितं असतात ती त्यातल्या माणसाला कळतात. यामधे तुम्हाला इतकं झोंबण्यासारखं काय आहे की तुम्ही अशी उपरोधिक बडबड करावीत?
कुठेही काही चर्चा चालली असेल तर जाऊन बोलत सुटायचं बाकी काही नाही. म्हणजे कोणालाही खरोखर उपयोग होईल अशी चर्चा होऊ नये असं दरवेळेला कशासाठी?
तुम्ही NRIs च्या वतीने बोलताय तर मग मी विचारते त्या प्रश्नाचं उत्तरही द्या. ऑस्कर कॅम्पेन बद्दल जे काय तुमचे वाचीव समज गैरसमज असतील त्यालाच प्रमाण मानून चाललं तरच तुम्ही (म्हणजे NRI) मदत करणार का? तुमच्या वरच्या वक्तव्यातून तसंच दिसतंय. इथे तुमच्या इगोपेक्षा चित्रपटाचं यश महत्वाचं आहे.

मिलिंदा,
>>मला पूर्ण वाचून असे वाटले नाही की इथे कोणी नीधप वर शरसंधान करण्याचा प्रयत्न करते आहे. श्वास वर टीका करणे वेगळे (कारण टीम एफर्ट वेगळा विषय आहे) आणि नीधप वर करणे वेगळे. किमान मूळ बाफ चालू करणार्‍या व्यक्तीचा हा उद्देश नसावा (ही अपेक्षा)<<
माझ्यावर वैयक्तिक शरसंधान केले जातेय हा माझा दावाच नाहीये. बाफ चालू करणार्‍या व्यक्तीच्या उद्देशाबद्दल मला काही म्हणायचं नाहीये पण वरची मेल ज्यांनी लिहिलेय त्यांचे हेतू नक्कीच साफ दिसत नाहीत आणि त्यांची माहीतीही चुकीची आहे. त्यांच्याबरोबर न जाता दुसर्‍या संस्थेबरोबर आम्ही गेल्याने झालेल्या आर्थिक नुकसानाची चिडचिड मला त्यात दिसतेय. चुकीची माहीती पसरवून दिशाभूल करण्याचा हेतू दिसतो.
त्याने मला वैयक्तिकरित्या वा 'श्वास' च्या टिमला काहीच फरक पडत नाही आता पण ज्या NRIs ना खरोखर मदत करायची इच्छा आहे त्यांच्या डोक्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यासाठी मी एवढा वेळ इथे बोलतेय.
तुला ते केवळ वैयक्तिक भांडण वाटले असेल तर मग मुश्कील आहे.

>>आपल्याला जर येऊन वाचायचे नसेल तर वाचू नका, त्याचीही सक्ती नाही, पण उगाच जिकडे तिकडे, तुम्ही देवनागरी लिहीत नाही तर आम्ही वाचणार नाही हे सांगत हिंडायची जरूर नाहीये.>> हे तर मायबोलीच्या फूटरमधे टाकून ठेवायला हवय. उच्छाद मांडलाय अगदी.<<<
असंच एक फूटर झक्कींसाठी टाकून ठेवा म्हणजे जिथे तिथे वाकडंतिकडं बोलत फिरणार नाहीत. त्यांचा उच्छाद काय कमी नाहीये.

नीधप, तुला मेल केले आहे. इथे 'शरसंधान' हे वाक्य तुझे नव्हते आणि त्यामुळे माझे पोस्ट पण तुला लागू होत नाही. तू ते स्वतःवर का ओढवून घेते आहेस हे कळले नाही.

राहता राहिला मदतीचा प्रश्न, तर ज्या व्यक्तीने मेल केलं त्यांचा उद्देश मला माहिती नाही, आणि तुम्हांला श्वास तिकडे नेलात तेव्हा काय अडचणी आल्या त्या मी अनुभवलेल्या नाहीत, सो, एका अर्थी हा तुमचा (श्वास टीमचा) आणि मेल कर्त्याचा वैयक्तिक मामला आहे. यात मी काहीही चुकीचं बोललो नाही. तू त्या शंकांचं निरसन करु नयेस असा याचा अर्थ होत नाही (किंबहुना केलेस तर आनंदच आहे), पण म्हणून बाफ चा मूळ विषय वेगळा असताना त्यावर नस्त्या भांडणांनाही अर्थ नाही.

पण म्हणून बाफ चा मूळ विषय वेगळा असताना त्यावर नस्त्या भांडणांनाही अर्थ नाही.<<
नसती भांडणं करणार्‍यांची नावंही टाकशील का? म्हणजे निरर्थक बोलणारे गप्प बसतील.

बाकी अश्या दिशाभूल करणार्‍या जाहीर विधानांना जाहीरपणेच उत्तर देणे मला गरजेचे वाटले.

मूळ विषय NRIs काय करू शकतात हा असेल तर त्यावर मी काही मुद्दे मांडलेत. स्वत:चा इगो प्रॉब्लेम करून त्या मुद्द्यांना तिरकस उत्तरे इथे आली. बाकी काही दिसलं नाही.

जाउदेत..

हरीश्चंद्राची फॅक्टरी" या चित्रपटाला ऑस्कर साठी कशी मदत करावी या साठी मायबोली हे माध्यम निवडलेले आहे तर, त्यात ( समस्त ) मायबोलीकर कसे मदत करू शकतील ही चर्चा करू, उगीचच "श्वास" च्या टीम ने काय चुका केल्या हे आत्ता जाहिर पणे सांगण्यात काय अर्थ आहे ? त्यांना जे जमले ते त्यांनी केले.
-------------------------------------------------------------------------------
अगदी बरोबर!
आपल्या चित्रपटाची ऑस्कर साठी निवड झाल्यावर प्रत्येक टीम नक्कीच प्रयत्नाची शर्थ करणार आणि तशीच "श्वास" आणि जे जे चित्रपट निवडले गेले त्या सगळ्यानी केली असणार. उद्या तुम्ही "तारे जमीं पर" आणि "लगान" साठी आमीर खान ने काय चुक केली हेही लिहिणार का? त्यांचे तर बजेट आणि संपर्कही आपल्या कुठल्याही मराठी चित्रपटांपेक्षा नक्कीच जास्त असणार!

"श्वास" आणि "तारे जमीं पर" या दोन्ही चित्रपटांच्या वेळेस त्यांच्या सुंदर विषयामुळे मला आशा होती की हे चित्रपट किमान नामांकित तरी होतील पण चित्रपटाच्या गुणवत्तेबरोबर ही इतर आर्थिक गणितेही असतात हे विसरलो. असो.

हरिश्चन्द्राची फॅक्टरी ला मनःपुर्वक शुभेच्छा!

<<असंच एक फूटर झक्कींसाठी टाकून ठेवा म्हणजे जिथे तिथे वाकडंतिकडं बोलत फिरणार नाहीत. त्यांचा उच्छाद काय कमी नाहीये.>>
माफ करा. पण मी सुचवले त्यात गैर काय आहे? माझे मुद्दे मला रास्त वाटतात, की
महत्वाच्या गोष्टी दोन -
एक: पैसे,
दुसरे: ऑस्कर वाल्यांचे लक्ष वेधून घेणे, त्यांना आपला चित्रपट चांगला आहे हे पटवून देणे.

मी माझ्या परीने मार्ग सुचवले.

पैसे भारतातच जास्त मिळतील, इथे मागायलाच नको.

दुसरे: <<ऑस्कर कॅम्पेन बद्दल जे काय तुमचे वाचीव समज गैरसमज असतील त्यालाच प्रमाण मानून चाललं तरच तुम्ही (म्हणजे NRI) मदत करणार का?>>
लोकांना असेच अनुभव आलेले आहेत, निरनिराळ्या प्रोजेक्ट्स मधे. म्हणूनच त्यांना तुमच्या प्रयत्नात फारसे स्थान असू नये, नसले तरी चालेल असेच मी सुचवतो आहे. हे तुम्ही ऐकलेच पाहिजे असे नाही. पण एकवार तरी यावर विचार करा. त्यापेक्षा

माझ्या इतर अनुभवावरून असे वाटते की एखाद्या गोर्‍या माणसाला बरोबर ठेवले की या गोर्‍यांच्या देशात जरा त्यांचे लक्ष आपल्याकडे जाते. शक्यतो एखादा यहुदी घ्या. त्यांचेच सगळे राज्य आहे. माझ्या अनेक प्रोजेक्ट्स वर अशी कामाची माहिती नसली तरी, नुसतीच चांगली दिसणारी, ज्यांची निवड समितीत ओळख आहे अशी माणसे असत. त्याच्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागत. या व्यवहाराला भारतात लाच म्हणतात, इथे कन्सल्टिंग म्हणतात.

बाकी मी काय दगड धोंड्याची मदत करणार? सुचवणे आपले काम, ऐकणे न ऐकणे तुमच्या कानी!

<<असंच एक फूटर झक्कींसाठी टाकून ठेवा म्हणजे जिथे तिथे वाकडंतिकडं बोलत फिरणार नाहीत. त्यांचा उच्छाद काय कमी नाहीये.>>
अहो माफ करा, वाकडे तिकडे लिहीले म्हणून. पण आता चौथ्यांदा प्रयत्न करतो.

पण प्रथम एक लक्षात घ्या की मी माझे मत मांडले नि तुम्हाला ते नाही पटले तर त्याचा अर्थ मी कुणावर टीका करतो आहे असा होत नाही, निदान उद्देश तरी तसा नसतो, भाषा असेल वेडीवाकडी. कुणि काही सुचवले तर तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतात असे नसते. तुम्हाला एव्हढा त्रास का होतो?

तर जर इथे आपण ह फॅ ला ऑस्कर कसे मिळेल याची चर्चा करणार असू, तर माझे मतः
महत्वाच्या गोष्टी दोनः
एकः पैसे
दोनः ऑस्कर समितीस पटवून देणे की आमचा चित्रपट ऑस्कर मिळावे एव्हढा चांगला आहे.

माझी मते अशी:

भारतात १० कोटी जमणे सहज शक्य आहे. आहेत महाराष्ट्रियांकडे तेव्हढे पैसे. नि तिथल्या तिथे हे काम चांगले होईल.
दोनः अनेक यशस्वी प्रोजेक्ट्स च्या अनुभवावरून एक लक्षात येते की आपल्या चमूत, कामाची, विषयाची फारशी माहिती नसली तरी चांगली दिसणारी, बोलणारी, नि मुख्यतः निवड समितीशी ओळख असणारी काही माणसे हवीत. त्यासाठी गोरी व यहुदी धर्माची लोकं हवी. त्यांना पैसे द्यावे लागतीलच. त्याला लाच म्हणा नाहीतर कन्स्ल्टिंग फी म्हणा.
उगाच काळ्या लोकांना नि स्लमडॉग ला ऑस्कर मिळाली म्हणजे वर्णद्वेष नाही असे समजू नका!

तर या सर्व भानगडीत NRI लोकांची गरज व महत्व काहीच नाही! मग त्यांना वाटले तर करतील मदत. पण तुम्ही पण त्यांना त्यांची जागा दाखवू शकता.

असे आपले माझे मत आहे हो. तुम्हाला हे सगळे माहित असेलच. पण मी आपले सुचवले झाले. त्याचा फार त्रास होऊ नये अशी आशा आहे.
शुभेच्छा!