Submitted by poojas on 22 January, 2008 - 15:57
सुचावे पुन्हा काही निर्माण व्हावे..
उरि गोठले ते ... फुटावे.. वहावे..
मुक्या आसवांचाच कल्लोळ व्हावा...
असे काहिसे मी... स्मरावे.. लिहावे..
वृथा गंजलेल्या विचारांस माझ्या ..
व्यथांनी जरा.. चेतवूनी पहावे..
अशी धार यावी की वज्राप्रमाणे....
प्रहारातले घाव.. सहजी सहावे...
जरी अंतरी आर्त असतील दु:खे..
तरी भान त्यांचे मनाला नसावे..
असावे जरासे मनोधैर्य अंगी..
की हरले तरी.. मी.. लढावे.. हसावे...!!!
गुलमोहर:
शेअर करा
अरेच्चा कविता इकडे कुठे ग?
असावे जरासे मनोधैर्य अंगी..
की हरले तरी.. मी.. लढावे.. हसावे. >>>>> आवडलं
वा पूजा!
वा पूजा! जरी अंतरी व्वा..
सुरेख
सगळी कविताच सुरेख लिहिली आहेस, पण त्यातही शेवटच कडव खूपच आवडल!
सुंदर कविता
सुंदर कविता.. आवडली
-मानस६
भिडलं...
आताच्या माझ्या मनःस्थितिला अगदी फिट्ट बसणारी रचना....खुप सुंदर गं..हरण्याचा विचारही करु नकोस्....जीत तुझीच आहे...:-)
थोडी उंबरठा ची आठवण झाली...गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळु दे...मात्र संपुर्ण कवितेला तुझा भाव छान आला आहे.
माझ्या आवडत्या कवीतांमध्ये तुझ्या कवीतेची भर झाली.
क्या बात....!
मस्त कविता.. आवडली !
शेवटचे कडवे अतिवसुंदर !!
सुरेख
सुरेख लय बद्ध!!!
उत्तम
सुचावे पुन्हा काही निर्माण व्हावे..
उरि गोठले ते ... फुटावे.. वहावे..
मुक्या आसवांचाच कल्लोळ व्हावा...
असे काहिसे मी... स्मरावे.. लिहावे..
वृथा गंजलेल्या विचारांस माझ्या ..
व्यथांनी जरा.. चेतवूनी पहावे..
या ओळी फार आवडल्या. चवथ्या कडव्याच्या पहिल्या ओळीत गडबड वाटली. चुभुद्याघ्या!
उत्तम रचना.
वाह...
सुचावे पुन्हा काही निर्माण व्हावे..
उरि गोठले ते ... फुटावे.. वहावे..
सुरूवातच ज्ज्जाम आवडली....
सुंदर...
लयदार
सुंदर कल्पना आणि लयदार मांडणी आहे, पूजा. शेवटचं कडवं अतिशय आवडलं.
सुरेख...
अशी धार यावी की वज्राप्रमाणे....
प्रहारातले घाव.. सहजी सहावे...>>>>
पुजा , सुंदर कविता...!!!
खुपच सही.... ओळ अन ओळ सही
खुपच सही....
ओळ अन ओळ सही उमटलीय!
मस्त. शेवटही छान.
मस्त. शेवटही छान.