काम संगणक अभियंत्याचे

Submitted by वर्षा_म on 16 September, 2009 - 03:32

ऑफिस मधे आल्या आल्या पहिले काम
मेल चेक केल्याशिवाय नाही मनाला आराम

चहा घेत घेत मग गप्पा हानायच्या
वेळच मिळत नाही अशा बोंबा मारायच्या

अजून कशी इनक्रिमेंटची मेल नाही बुवा
काम केले नाही तरी पगार मात्र हवा

काम सुरु करण्यापूर्वी होते मिटींगची वेळ
निश्कर्ष काही न काढता संपून जाते वेळ

मिटींग मधे ठरले आता कामाला सगळ्यांनी लागायचे
डेड्लाईन पुर्वीच प्रोजेक्ट कंप्लिट मात्र करायचे

फोन करुण बायकोला सांगू उशिर आज होईल
तूझ्या वाढदिवसाला मात्र रजा नक्की घेईल

वेळ झाली जेवायची सांगायला मित्र आला
चला काहीतरी देउ या गरीब बिचार्र्या पोटाला

जेवताना गप्पा काय तर शेडुल टाईट आहे
या महिण्यात मला बाबा खूप काम आहे

कामाला सुरुवात करता यांना आठवते शेअर मार्केट
आज हा काढला तर होइल भरपूर प्रोफिट नेट

हा का तो करत तास निघून गेला
काय करु विचारायला मित्राला फोन केला

निर्नय घेता घेता मार्केट बंद झाले
उद्या पाहु करत ते विचारच बंद केले

आता मात्र चार वाजले करु कामाला सुरुवात
पण काय करावे खूप आळस आहे अंगात

चला पहिले गरम गरम चहा घेउ
आणि फ्रेश होउन कमाला सुरुवात करु

कामाला सुरुवात करता करता वाजतात सहा
बॉस सांगतो सगळे आधी रिपोर्ट लिहा

रिपोर्ट मधे काय लिहायचे पडला मोठा प्रश्न
काम न करता पगार घेताना नाही पडत का प्रश्न

गुलमोहर: 

शिर्षक बिनकामाचे संगणक अभियंते हव होतं . Lol
ह्या कवितेवरुन केदारने लिहिलेली म्हण आठ्वली.
रिकामा सुतार ......... Lol

सही!!!!!!!!:स्मित:

असे सुखाचे प्रोजेक्टस फक्त नशिबानच मिळतात!
नाहीतर आहेचे - रात्री २-३ पर्यंतच काम.. शनीवार रविवारीही!

माहीत नाही development project मधे कधी टाकतील.. वेळ आहे तोवर मजा करून घ्या!

वर्षम छान जमलंय अगदी .. तंत त त .. तंतोतंत ..
सुंदर निरिक्षण आहे .. Happy

अजून कशी इनक्रिमेंटची मेल नाही बुवा
काम केले नाही तरी पगार मात्र हवा >> Rofl

रिलीज आला रिलीज आला म्हणता हवा झाली टाईट,
ओवरटाईम करा आता बसेल नाहीतर फाईट,,

रिलीज आला रिलीज आला म्हणता हवा झाली टाईट,
ओवरटाईम करा आता बसेल नाहीतर फाईट,,

आवडले .. धन्यवाद सुहास Happy

वर्षा, सही ...अगदी मर्मावर बोट ठेवलंस ..
कामाला सुरुवात करता करता वाजतात सहा
बॉस सांगतो सगळे आधी रिपोर्ट लिहा....

एका दिवसाच्या कामाची सात भाग करणे .....आणि रिपोर्ट भरणे !
Lol

नशीबवान आहात..माझ्या नशिबाने मला कधीही असे सुखाचे प्रोजेक्ट मिळाले नाही Sad
इन्टर्नेट ही बंद्..समोर च मॅनेजर बसलेला..रिपोर्ट मध्ये लिहायला इअतकं काही असायचं पण लिहायलाही वेळ नसायचा.
अशा वेळी testing/maintenance project मिळावा असं फार वाटायचं Happy

जरा धूर यायला लागलाय वर्षा ...काही जळतेय का?
एका तासाचे काम करूनही काहीजण कंपनीला प्रॉफिट मिळवून देतात ...

शेवटी संगणक क्षेत्रातल्या कंपन्या या आमच्या सारख्यांनी केलेल्या या एका तासाच्या कामातुनच दर वर्षी लाखो-करोडो डॉलर कमावतात ना !
कमावायचे डॉलरमध्ये आणि वाटायचे रुपयांनी, या मिळणरया काही रुपयात आमचं मात्र आज सार सुख सामावलेल आहे ....
Happy

छानच लीहीले

फोन करुण बायकोला सांगू उशिर आज होईल
तूझ्या वाढदिवसाला मात्र रजा नक्की घेईल

ईथे तुही सुटली नाही गं Biggrin

फोन करुण नवर्‍याला सांगू उशिर आज होईल
तूझ्या वाढदिवसाला मात्र रजा नक्की घेईल

हेहे Proud